विठ्ठलाच्या कानात मासा का असतो ?

विठ्ठल ,विठू माउली,विठ्ठल रुक्मिणी , । Vitthalachya Kananat Masa Ka Asto ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

“विठ्ठल ” हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा तर दशावतारातील नववा अवतार मानले आहे. पंढरपूर येथील विठ्ठलमंदिर तेराव्या शतकापासून उभे असल्याचे पुरावे सांगितले जातात.

विठ्ठलाची मूर्ती ही संपूर्णतः वालुकाश्म दगडाची आहे. भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठल त्याची वाट पाहात उभा असल्याची आख्यायिका सांगितली आहे. याबाबत सुंदर कथादेखील सांगितली जाते. डोक्यावर उंच मुखवटा आहे त्यालाच शिवलिंग असे संबोधले जाते.

विठ्ठलाच्या पायावर मुक्तकेशी दासीची बोटे उमटली आहेत. याबाबत असे सांगितले जाते की, मुक्तकेशीला आपल्या सौंदर्याचा गर्व होता. परंतु विठ्ठलाचे पाय तिला एवढे नाजूक लागले की तिने विठ्ठलाच्या पायावर बोटे ठेवताच पायवाटे रक्त वाहू लागले. यावरून तिचा गर्व क्षणातच उतरला. तसेच विठ्ठलाच्या छातीवर भृगुरुषींनी लाथ मारल्याचीही खूण आहे.

विठ्ठलाच्या कानात मासा असण्याचीही कारणे सांगितली आहेत. हे मासे विकार विसरण्यासाठी सांगतात. मुळात मानवी शरीराला नऊ छिद्रे असतात, पैकी कान हा असा अवयव आहे की तो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही. हे केवळ समाधीमध्येच शक्य असते. मासा हे आपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. (आपतत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्त पाचक रस ) त्यामुळे जोपर्यंत आपतत्वावर विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वपर्यंत पोहोचू शकत नाही. हे साध्य केले तरच समाधीत जाऊन ध्वनिवर नियंत्रण मिळवता येते. म्हणजेच आपले कान बंद करणे सोपे जाते. आणि याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या आणि रुख्मिणीच्या कानातही मासा असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )