।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
पारायण केल्याने काय होतं ?
सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेल व अनेकदा कानावरही पडला असेल… खास करून दत्तजयंती, स्वामी समर्थ प्रकट दिन, गजानन महाराज प्रकट दिन या वेळी पारायण हमखास केले जाते…..
काय असते पारायण ? ते का करावे ? त्यामुळे काय मिळत ? आणि विशिष्ट संत चरीत्रांचेच का करावे….?
पारायण सात दिवसांचे केले जाते. यावेळी या सात दिवसांत, एकवेळ ठरवून वाचन करणे… (म्हणजे आज सकाळी सातला पारायणास बसलो तर उद्याही त्याच वेळी सुरूवात करणे होय.) नंतर येते एकभुक्त रहाणे व एकधान्य खाणे, म्हणजे आज सायंकाळी उपवास सोडताना जर मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल तर सातही दिवस तेच खावे…..
या नंतर पायात चप्पल न घालणे, सातही दिवस काया, वाचा, मने ब्रह्मचर्याचे पालन, साध्या चटईवर वा कांबळ्यावर, सतरंजीवर झोपणे, खोटे न बोलणे, संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रीत करणे, दुसऱ्यांच्या अंथरूणावर, पलंगावर न बसणे… इ. ह्या नियमांचे पालन करणे, यात परायण म्हणजे दक्ष रहाणे म्हणजेचं पारायण होय….!
काय मिळतं…?
तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणांस काय हवे होते ते आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय…..
बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते तसे भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो… आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे. पण तेही नियमात राहून, कासवा प्रमाणे सर्व अहंकार, गर्व, या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण..!
मग जेव्हा लहान मुल पोळी लाटतं, पण आई कौतूकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते तसा ईश्वरही आपली दखल घेतोच…!
म्हणून करावे पारायण