
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
ॐ नमः शिवाय
करिदिन
भारतीय संस्कृतीमध्ये करिदिन हा अशुभ दिवस मानला जातो. करिदिन दिवशी काही नियम आणि उपाय पाळले तर अशुभता कमी होते. मकरसंक्रांत तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी करिदिन पाळला जातो व असे म्हणले जाते की करिदिनच्या दिवशी आपण वादविवादापासून दूर राहिले पाहिजे. वर्षातून एकूण सात दिवस करिदिन पाळला जातो. करिदिन या शब्दाचा विग्रह केला तर दोन शब्द दिसतात करी म्हणजे अशुभ आणि दिन म्हणजे दिवस म्हणूनच मराठीमध्ये करिदिनाला अशुभ दिवस असे संबोधले जाते. एकूण सात करिदिन दिवसांपैकी एक करीदिवस मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असतो
७ महत्वाचे करिदिन – करिदिन हा पंचांगात मधील एक अशुभ दिवस असतो. करिदिन एकूण ७ आहेत. ते असे :-
१ भावुका अमावस्येनंतरचा दुसरा दिवस
२. दक्षिणायनारंभानंतरचा दुसरा दिवस (याला अयन करिदिन म्हणतात.)
३. उत्तरायणारंभानंतरचा दुसरा दिवस (याला अयन करिदिन म्हणतात.)
४. चंद्रग्रहण वा सूर्यग्रहण यानंतरचा दुसरा दिवस
५. कर्क संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस
६. मकरसंक्रांतीनंतरचा दुसरा दिवस (हा दिवस किंक्रांत या नावाने परिचित असतो.)
७. होळीनंतरचा दुसरा दिवस.
करिदिन विषयी पौराणिक कथा
फार वर्षांपूर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशी भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती किंक्रांतीला खाल्ली जाते.
करिदिनला काय करावे काय करू नये
- चांगल्या कामाची सुरवात करू नये.
- लांबचा प्रवास टाळावा.
- देवीचा पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा.
- घरात वादविवाद टाळा, मन शांत ठेवा. शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे.
- कुलदैवताचे व देवाचे पूजा तसेच नामस्मरण करावे. नामजप करावा.