।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
हिंदू धर्मात कुंकवाला का आहे इतकं महत्त्व ? – Why is kunku so important in Hinduism?
हिंदू धर्मात विविध प्रकारच्या रुढी, परंपरा पाळल्या जातात… हिंदू धर्मात कपाळावर कुंकू लावण्याला खूप जास्त महत्त्व आहे. लग्नात विविध प्रकारचे विधी असतात. असाच एक विधी आहे, ज्यामध्ये वर वधूच्या कपाळावर कुंकू (सिंदूर) लावतो. या विधीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे…
आज या विधीची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचं महत्त्व काय आहे, याबद्दल जाणून घेऊया…
प्राचीन काळात हळद आणि केशरपासून सिंदूरची निर्मिती केली जायची… कालांतराने, सिंदूरची रचना बदलली आहे आणि आता ती सिंदूर पावडरपासून बनविलं जातं. सिंदूरचा लाल रंग प्रेम, उत्साह आणि स्थिरता दर्शवितो, त्यामुळे तो हिंदू विवाहासाठी एक योग्य प्रतीक आहे, असं मानलं जातं…
वधूच्या भांगेत लग्नाचं प्रतीक म्हणून वराकडून कुंकू भरलं जातं… वर वधूबद्दल असलेला आदर, स्नेह आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी तिच्या भांगेत कुंकू भरतो असं या विधीचं महत्त्व मानलं जातं. कुंकू हे कपाळावर, भुवयांच्या मध्यभागी लावलं जातं. तिथे तिसरा डोळा किंवा अज्ञाचक्राचं स्थान आहे असं मानलं जातं. कुंकू लावल्याने हे चक्र जागृत होण्यास मदत होते, असं म्हटलं जातं. हे चक्र एखाद्या व्यक्तीच्या विवेकबुद्धी आणि समजूतदारपणाशी संबंधित असतं…..*
हिंदू पौराणिक कथांमध्ये, कुंकूवाला खूप महत्त्व आहे… पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाची पत्नी पार्वती तिच्या पतीबद्दलच्या भक्ती आणि आपुलकीचं प्रतीक म्हणून तिच्या कपाळावर कुंकू लावत असे. कुंकू भगवान शंकराला आवडतं, त्यामुळे ज्या स्त्रिया त्यांच्या कपाळावर कुंकू लावतात त्यांना दीर्घ आणि आनंदी वैवाहिक जीवन मिळतं, असंही मानलं जातं
वधूच्या भांगेत कुंकू भरण्याची कृती हीदेखील आशीर्वाद मानली जाते… हे जोडप्याला गूड लक व समृद्धी देतं. तसंच दुष्ट आत्म्यांपासून जोडप्यांचं संरक्षण करतं. म्हणून कुंकू हे केवळ प्रेम आणि भक्तीचं प्रतीक नाही तर नवविवाहित जोडप्यासाठी सुरक्षा आणि आशीर्वादाचा स्रोतदेखील आहे…
लग्नात तर भांगेत कुंकू भरलं जातंच.. पण दैनंदिन जीवनातही स्त्रिया त्यांच्या कपाळावर कुंकू लावतात. आजच्या बदलत्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत टिकून आहे. पण कुंकू लावण्याच्या पद्धतीत बदलत्या काळानुसार बदल होत गेलेत, हेही तितकंच खरं आहे. अलीकडे कुंकवाच्या जागी लाल गंध व टिकल्या वापरल्या जातात. पण त्याचा संबंधही मांगल्य व सौभाग्याशी आहे. त्यामुळे पद्धत बदलली असली तरी आपली संस्कृती अद्यापही जपली जाते आहे..