मागेल त्याला शेततळे योजना २०२३

Magel tyala Shettale Yojna २०२३ मागेल त्याला शेततळे योजना २०२३ ,शेततळे,शेततळं

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

शेततळे योजना 2023

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे, त्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली. हि योजना शासनाची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे, या योजनेंतर्गत राज्यातील पाणी टंचाई ग्रस्त, संकटग्रस्त जिल्ह्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल, या मध्ये जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी इनलेट आणि आउटलेटसह प्रकारामध्ये किमान 15 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल आणि तसेच इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान 20 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल, मागेल त्याला शेततळे योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा शासनाचा निर्णय आहे.

शेततळे योजनेची उद्दिष्टे

पर्जन्यमान नेहमीच अनिश्चित असते आणि मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पावसाळा अनिश्चित झाला आहे, त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, त्याचबरोबर जमिनीतल्या पाण्याची पातळी खोल गेलेली आहे, तसेच बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी नसतात, असे शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर किंवा बोर वेल वर अवलंबून असतात, पावसाच्या पाण्यात पडलेला खंड आणि पाण्याची टंचाई तसेच पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासना कडून केला जात आहे. शेततळयांमुळे शेतकऱ्यांना पावसाच्या खंडित कालावधीत फायदा होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल

मागेल त्याला शेततळे या योजनेची कार्यपद्धती २०२३

दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या निधीमध्ये रुपये 10,000/- कोटी एवढ्या एकूण रकमेची तरतूद महामंडळाच्या स्थापनेच्या तारखेपासून पंचवीस वर्षाच्या कालावधीत योग्य हप्त्यांमध्ये विभागून देण्यात येईल अशी सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
जलसंधारण विभागामार्फत राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान, नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम तसेच राज्यातील दुष्काळी भागांमध्ये शाश्वत संरक्षित सिचन व्यवस्था करण्यासाठी विभागवार पाच वर्षाचे आराखडे तयार करून व त्यानुसार जिल्हावार नियोजन करून पाझर तलाव, बंधारे, साठवण तलाव यांचे टप्प्या टप्प्याने बांधकाम करण्याचे नियोजन असून अशा कामांना महामंडळाच्या मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्याच प्रमाणे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील गावे, टंचाईग्रस्त गावे यांना देखील प्रधान्य देण्यात येणार असून शिवाराकडून शेतीकडे तसेच इस्राईल पद्धतीचा अवलंब करण्याबाबत देखील नियोजन करण्यात येणार आहे.

शेततळ्याच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष :- शेततळे हि योजना कृषी विभागा मार्फत पाणलोटाचा उपचार म्हणून आधीपासून राबविण्यात येत आहे त्या प्रमाणे जागेच्या निवडीबाबत निकष सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे असतील
ज्या जमिनीतील पाणी पाझराचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी, काळी जमीन ज्यामध्ये चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्या साठी योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी
मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळ्या साठी निवडू नये
टंचाई ग्रस्त गावतील लाभक्षेत्रात शेततळी घेण्यात यावी, त्यासाठी जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय आणि अटी लागू राहतील
ज्या ठकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्क्यांच्या आत आहे, त्या ठिकाणी शेततळी घेण्यात यावीत, नाल्यात किंवा ओहाळाच्या प्रवाहात शेततळे घाण्यात येऊ नये
इनलेट / आउटलेट सहित शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील
सभोवतालच्या जमिनीत दलदल व चिबड होईल तसेच शेततळे व त्यातून पाणी पाझरून लगतच्या शेतकऱ्यांच्या स्थावर मालमत्तेचे नुकसान होईल अशी जमीन शेततळ्यासाठी निवडण्यास येऊ नये
शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुषीने व विनामूल्य द्यावयाची आहे.
कामाचा आदेश मिळाल्या नंतर लाभार्थ्यांनी 30 दिवसात काम सुरु करावे आणि तसे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी कळवावे.
शेततळी बांधण्याचा कार्यक्रम लाभार्थ्याने स्वतः किंवा माजुराव्दारे, अन्य पर्यायी साधनांच्या सहाय्याने पूर्ण करवयाचा आहे. परंतु याकरिता मशीन उपलब्ध करून घाण्याची जबाबदारी सबंधित लाभार्थ्याची स्वतःची राहील
मागेल त्याला शेततळे योजना अंतर्गत शेततळे खोदकामासाठी सबंधित तालुका कृषी अधिकारि यांचे कडील काम सुरु करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर सबंधित कृषी सहाय्यक/ कृषी सेवक/ कृषी पर्यवेक्षक/ कृषी अधिकारी यांचेकडून शेतामध्ये मंजूर गट नंबर, सर्वे नंबर मध्ये तांत्रिकदृष्ट्या जागा निवड करण्यात आलेल्या ठिकाणी मंजूर आकारमानाचे शेततळे आखणी करून घेण्यात यावे, अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे लाभार्थ्याने शेततळ्याचे खोदकाम करून घावे, आणि खोदकामातून निघालेल्या मातीचा भरणा शेततळ्याच्या पृष्ठभागाच्या शेजारी कृषी अधिकाऱ्यांनी आखून दिलेल्या जागेवर बंध स्वरुपात टाकावा.
शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यवर लाभार्थ्यांनी सबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक राहील. तसेच त्याबरोबर लाभार्थीने राष्ट्रीय बँक किंवा इतर बँक खात्याचे पासबुकाचे पहिल्या पानाचे झेरॉक्स जोडावी.
लाभार्थी शेतकऱ्याने शेततळ्याचे काम पूर्ण झाल्याचे लेखी कळविल्या नंतर सबंधित कृषी अधिकारी कामाची प्रत्यक्ष मोजमाप करून घेऊन मापदंडाच्या नुसार देय असलेली अनुदानाची रक्कम निधी उपलब्धतेच्या आधारावर योजनेच्या अंतर्गत निधी प्राप्त झाल्यावर 30 दिवसाच्या आत सबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रक्कम थेट जमा केली जाईल

शेततळे योजना शासनाच्या नियम व अटी

  • कृषी विभागाचे सहाय्यक किंवा कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे बांधणे बंधनकारक राहील
  • शेततळे तयार करण्याचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील
  • लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच राष्ट्रीय बँक किंवा इतर बँकमधील खाते क्रमांक सबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्ससह सादर करावा
  • शेततळ्याच्या कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही
  • शेततळ्याच्या बांधावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी
  • शेततळ्याच्या दुरस्तीची आणि निगा राखण्याची जवाबदारी संबधित शेतकऱ्यांची राहील, पावसाळ्यात शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था शेतकऱ्यांनी स्वतः करावी
  • लाभार्थी शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे
  • शासनाच्या नियमाप्रमाणे मंजूर शेततळे तयार करणे बंधनकारक राहील, तसेच शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक आहे

शेतकऱ्यांसाठी नवीन आशा ती म्हणजे MILLET ( मिल्लेट ) ची शेती जाणून घ्या मिल्लेट ची शेती का गरजेची आहे.

शेततळ्यासाठी पात्रता

  • शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीतकमी 0.60 हेक्टर जमीन असावी
  • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्या करिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे किंवा पुनर्भरण करणे शक्य होईल
  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळे किंवा सामुदाईक रित्या शेततळे अशा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा
  • मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे
  • शेततळे योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवासी शेतकऱ्यांसाठी आहे

आवश्यक कागद पत्र

  • जमिनीचा 7/12 उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
  • आधारकार्ड
  • ८अ प्रमाणपत्र
  • स्वतःच्या स्वाक्षरी सहित भरलेला अर्ज 

मागेल त्याला शेततळे या योजनेचा ऑनलाईन अर्ज आणि नोंदणी

  • शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या या https://aaplesarkar.maharashtra.gov.in वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल, शासनाची या वेबसाईटवर योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. अधिकृत वेबसाईटवर भेट दिल्यावर प्रथम होम पेज उघडेल या होम पेजवर मागेल त्याला शेततळे या पर्यायावर क्लिक करावे.
  • इच्छुक अर्जदार थेट शासनाच्या या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकता https://egs.mahaonline.gov.in/Registration/Registration यानंतर यशस्वीपणे नोंदणी झाल्यानंतर अर्जदार शेतकरी मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, यासाठी शासनच्या अधिकृत आपले सरकार वेबसाईटवर जाऊन, आपले युजरआयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे. आणि इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जाची पावती डाऊनलोड करून स्वतः कडे ठेवावी.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )