देव घरात शंख कसा असावा ? आणि त्याचे आसन ( अडणी ) कसे असावे ?

shankh, शंख ,शंखाचे आसन कसे असावे ,देवघरात शंख कसा असावा

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

देव घरातील शंख :

शंख हा विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे. हा शंख भगवान विष्णूला समर्पित आहे. म्हणूनच लक्ष्मी-विष्णू (श्रीलक्ष्मी नारायण) पूजेमध्ये मूलत: शंख वाजविला ​​जातो.समुद्र मंथनातून पांचजन्य नावाचा शुभ्र शंखाची उत्त्पत्ती झाली, विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून ‘शंख’ तिचा सहोदर भाऊ होय. म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. विष्णूने आपल्या हातात शंख धारण केले.

महाभारत काळातील काही प्रसिद्ध शंखांची नावे :

महाभारतात युद्धावेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होता. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा खूपच मोठा असा शंख होता. जो तो वाजवायचा. तर युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता.

शंखाचे प्रकार :

शंखाचे दोन प्रकार आहेत. पहिला दक्षिणावर्ती (उजवा) शंख व वामावर्ती (डावा) शंख.

ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वत:कडे करून देवाकडे त्याचे अग्र केले म्हणजे त्याच्या पन्हाळीची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजे दक्षिणावर्ती (उजवा) शंख.दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किमती अधिक असतात. शंखाची योग्य ती परीक्षा करूनच तो खरेदी करावा. दक्षिणावर्ती शंखाचे पुन्हा वजन व आकारावरून नर व मादी असे भेद होतात. शंखाच्यादेखील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत.अथर्ववेदामध्ये सात मंत्रांनी युक्त अशा ‘शंखमणिसूक्ता’ मध्ये दक्षिणावर्ती शंखाची महती वर्णन केली आहे. दक्षिणावर्ती शंख अंतरीक्ष वायू, ज्योतिमंडल आणि सुवर्णाने युक्त आहे.समुद्रमंथनातून निर्माण झालेला हा शंख राक्षसी, वाईट शक्तींचा नाश करणारा आहे. रोगनिवारण करून आरोग्यसंपन्न आयुर्मान देणारा, जीवनाचे रक्षण करणारा तसेच अज्ञान व अलक्ष्मीस दूर करून ज्ञान व अखंड स्थिर लक्ष्मी देणारा आहे.

याविरुद्ध ज्या शंखाच्या पन्हाळीची पोकळी डाव्या बाजूला येते असा शंख म्हणजे वामावर्ती (डावा) शंख.

वाचा मंदिरात प्रदक्षिणा कशी घालावी ?

शंख पूजा कशी करावी :

शंखाचा निमुळता पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफूल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहावे.

पूर्वी गंध म्हणल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे, आत्ता ते नसते. तर आता निरनिराळ्या रंगांची मातीची गंधे मिळतात. त्यातिल शक्यतो पांढरे व पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये.

वाजवण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरून ठेवावा. तो देवपूजेकरता घेऊ नये. तो निव्वळ “शंखध्वनी” करण्याकरताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी.

शंख ठेवण्याचे आसन

शंख ठेवण्यासाठी जे आसन असते त्याला अडणी म्हणतात. अडणी ह्या कासवाच्या रुपात असतात. देवघरात असलेला शंख कासवाच्या पाठीवर ठेवायची पध्दत आहे. भगवान विष्णुचा साक्षात अवतार म्हणजे कुर्म ( कासव ). कासवाला विष्णुच वरदान आहे. कासव हा सत्वगुणप्रधान आहे, त्यामुळे त्याला स्वताची कुंडलिनी जागृत करता येते. भगवान विष्णुच्या अर्शिवादाने हा मंदिरात गाभा-याच्या समोर देवा कडे पाहात असतो. भगवान विष्णुने समुद्रमंथनात कुर्म अवतार घेतला तसेच विष्णुच्या हातात कायम शंख आहे. विष्णुभगवानाचा व कासवाचा जवळ संबंध आहे. देवघरात असलेली अडणी (कासवाची) ही देव‍ा कडे तोंड करुन ठेवावी. कासवाच तोंड हे देव‍ाच्या पायाकडे पाहणार असाव. तोंड वर असेल तर कुंडलिनी जागृत असलेला कासव असतो. कासवाची मादी ही आपल्या पिलांना दुध पाजत नाही.ती आपल्या पिल्लांना वात्सल्य भावनेने पाहीले की पिल्ल‍ांचे पोट भरते. त्य‍ा प्रमाणे आपण देवळात गेलोकी देवाने आपल्याकडे वात्सल्य नजरेने पाहावे व आपल्या वर कृपा अर्शिवाद असावी येवढ माफक अपेक्षा असावी. माझ्या संग्रहात असणा-या दोन अडणी हे सुंदर कोरीव काम केलेले आहे .एका अडणीच्या पायावर कोरीव नाजूक मोर कोरले आहेत तर दुसरीवर सहस्रकमल असून त्यावर शंख ठेवता येतो. दोन्ही अडणी वेगळ्या प्रकारच्या असून एक कुंडलिनी जागृत कासव (मानवर) तर दुसरी अडणीचा कासव देवाच्या पाय‍ाकडे पाहणारा आहे.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )