श्री शनिदेव प्रार्थना

श्री शनिदेव,शनिदेव

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

प्रार्थना : –

न्यायप्रिय म्हणुनी ज्याचा बोलबाला। अनुज यमधर्म असे जयाला। मंद मंद मार्ग ज्याने क्रमिलेला। प्रणिपात माझा त्या शनैश्चराला।।१।।

एका वेळी तीन राशी जो भोगी। मनुष्यास जो कर्तव्याची जाग आणी। अनुराग त्याचा माणसाने ना पाहिला। प्रणिपात माझा त्या शनैश्चराला।।२।।

अहंकारी जो कोणी असेल त्याला। दाखवी जागा येताच तयाचे राशीला। सत्य आणि न्याय अतिप्रिय ज्याला। प्रणिपात माझा त्या शनैश्चराला।।३।।

उज्जैनीचा राजा विक्रमादित्य होता। शक ज्याचे नावे चालत होता। अहंकाराने तयाचा कार्यभाग बुडाला। प्रणिपात माझा त्या शनैश्चराला।।४।।

कन्या राशीस येता गृहाची साडेसाती। विक्रमाचे फासे उलटे पडती। साडेसातीत त्यास बहु छळीयेला। प्रणिपात माझा त्या शनैश्चराला।।५।।

गुरुस वंदिते त्रिभुवन सारे। तयासी ही शनीने ना सोडले रे। सव्वा घटिका ही युग त्यास भासल्या। प्रणिपात माझा त्या शनैश्चराला।।६।।

शिवाने ही भिऊनी कैलास धरला। श्रीरामचंद्रास वनवास घडविला। स्यमंतकाचा कृष्णावरी आळ आला। प्रणिपात माझा त्या शनैश्चराला।।७।।

रावणाने नवग्रह पायदळी घेतले। नारदाने युक्तीने मुख त्यांचे फिरवले। दृष्टी पडताच लंकापतीचा नि:पात झाला। प्रणिपात माझा त्या शनैश्चराला।।८।।

अहंकार जो सर्वथा त्याज्य करतो। शनिदेव त्याचे कल्याण करतो। पूजा भक्तिभावे होऊनि नम्र, त्याला। प्रणिपात माझा त्या शनैश्चराला।।९।।

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )