शेतकऱ्याने गांडूळ खत निर्मिती कशी करावी आणि यातूनच गांडूळ खत विक्री व्यवसाय करणे शक्य आहे

गांडूळ । गांडूळाचे खाद्य । गांडूळ खतासाठी पाण्याचं नियोजन । गांडूळ खत निर्मिती । आधुनिक आणि सुधारित गांडुळ खत निर्मिती । गांडूळ खतासाठी गांडुळ कशी उपलब्ध होतील । गांडूळ खत तयार होण्यासाठी किती दिवस लागतात ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

गांडूळ

शेतकरी मित्रानो आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती घेणार आहोत. सध्या शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत. तर एकीकडे सेंद्रिय शेतीच्या उत्पादित वस्तुंना चांगले उत्पन्न मिळत आहे त्यामुळे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पहिला तर भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येणार आहेत. गांडूळ खत हा सेंद्रिय शेती मधलाच एक घटक आहे. गांडूळ खत हे शेतकरी स्वतः तयार करू शकतो त्यासाठी बाहेरून गांडूळ खत विकत आणण्याची गरज नाही.गांडूळ खता मुळे पिकाच्या उत्पादन खर्चात खूप बचत होते तसेच शेताचा पोत देखील सुधारतो. त्याच बरोबर गांडूळ खत निर्मितीकडे शेतीपूरक जोडधंदा म्हणून ही पाहू शकतात.गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याची जी विष्ठा ( मल ) शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वत:च्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते.

गांडूळाचे खाद्य :

  • गोबरगॅस स्लरी / प्रेसमड / शेणखत / घोडयाची लीद / लेंडी खत / हरभ-याचा भुसा / गव्हाचा भुसा / भाजीपाल्याचे अवशेष / सर्व प्रकारची हिरवी पाने इतर ओला कचरा पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.
  • वाळलेला पालपाचोळा व शेणखत समान मिसळले असता गांडूळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
  • हरभ-याचा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३ : १० किंवा ६ : २० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.

गांडूळ खतासाठी पाण्याचं नियोजन ?

एका बेडमध्ये ५ किलोच्या आसपास गांडूळ सोडु शकतो. एकदा गांडूळे शेणात टाकल्यानंतर आपल्याला पाण्याच नियोजन करण खुपच महत्वाच आहे कारण आपण जर पाणी जास्त प्रमाणात वापरलं तर त्यामुळे त्या शेणातील गांडूळांची हालचाल होत नाही व ती गांडुळे मरून जातात पाण्याचं नियोजन हे आपल्याला फक्त १५ दिवसासाठीच करायचं आहे,आपण दररोज १५ ते २० लिटर पाणी मारू शकतो, ते पण आवश्यक ते नुसार त्या शेणाला पाणी घालायचं आहे एकदा खत तयार होण्यास सुरवात झाली की आपल्यला त्या खताला पाणी घालयचं नाही आणि जर आपण पाणी घातलं तर ते खत शेणात पुन्हा मिसळत व परत गांडुळे ते खत खात नाहीत.

गांडूळ खत निर्मिती:

गांडूळ खत निर्मितीसाठी जागा निवडत असताना सावली असले अशी जागा निवडावी. एकाद्या झाडाखाली, छपरामध्ये, गांडूळ खताचा बेड असावा. जिथे बेड असेल तेथील जमीन निब्बार असावी. जेणेकरून गांडूळ जमिनीमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. किंवा प्लास्टिकचे रेडिमेड बेडही मिळतात त्याचादेखील आपण वापर करू शकतो.
१० फूट लांब ३ फूट रुंद आणि २ फूट उंच असा बेड तयार करावा. सुरवातीला त्यामध्ये पालापाचोळा, उसाचे पाचट गवत ६ इंचाचा थर करावा. त्यावर एक ते दीड फूट शेणखत टाकावे. आता यावर २ ते ३ किलो गांडूळ सोडावे आणि त्यावर पोत्याने झाकून १० ते २० लिटर पाणी रोज मारावे. पोती झाकताना वापसा राहील याची काळजी घ्यावी. सात ते आठ दिवसात गांडूळाची विष्टा दिसायला लागेल. याचाच अर्थ आपला गांडूळ खात तयार होत आहे. अश्या पद्धतीने ३० ते ३५ दिवस पाणी मारत राहावे.

गांडूळ खत कोरडे झाल्यानंतर त्या गांडूळ खाताला छोट्या भागात विभागून चाळून घ्यावे. आणि हे खात गोणी मध्ये भरून ठेवावे आणि लागेल तसे वापरावे. जर गांडूळ खताचा व्यवसाय करणार असाल तर महाराष्ट्र सरकार अनुदान देत असते त्याचबरोबर योग्यवेळी मार्गदर्शनही करते.

आधुनिक आणि सुधारित गांडुळ खत निर्मिती :

जुन्या गांडुळ खत निर्मिती मध्ये शेण आणि पाला पाचोळा किंवा वाया जात असलेले पदार्थ आणि भाजीपाला तसेच कुजलेले पदार्थ याचा वापर होत होता. या पद्धतीने निर्माण केलेले गांडुळ खत सर्वांना परिचयाचे आहे. शिवाय गांडुळ खत निर्मितीसाठी वापरल्या जाणार्या घटकांमध्ये बदल केल्यामुळे त्यापासून मिळणार्या गांडुळ खतामध्ये विविध अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, हे संशोधनांत सिद्ध झाले आहे.
आधुनिक गांडूळ खत निर्मिती पद्धतीमध्ये आता साखर कारखान्यातील उसाची प्रेस मढ, शेण आणि उत्कृष्ट जातीचे गांडुळ म्हणजे औस्ट्रेलियन जातीचे गांडुळ वापरून हे गांडुळ खत बनवण्यात येते.आपल्या शेतकऱ्यांना या गांडुळ खतात आधीच्या गांडुळ खतापेक्षा १० पट अन्नद्रव्ये घटक जास्त मिळतात आणि यामुळे कोणत्याही प्रकारची फळे, फुले, भाजीपाला, कडधान्याचे पिके घेताना शेतकर्यांना खूप फायद होतो. अनेक शेतकर्यांच्या शेतात याचे प्रात्यक्षीके घेण्यात आली.या नवीन आधुनिक पद्धतीत साखर कारखान्यातील उसाची प्रेस मढ वापरल्याने गांडूळाला पौष्टिक आहार मिळतो; जो आहार त्याला सुकलेल्या पाला पाचोळा किंवा कचऱ्यातून मिळत नाही. या नवीन आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या गांडुळ खत आपल्या शेत जमिनीसाठी आणि आपल्या कोणत्याही प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असलेले अन्नद्रव्ये घटक म्हणजे नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K), कॅल्शियम (Ca), मॅग्नेशियम (Mg), गंधक (S), लोह (Fe), मंगेनिज (Mn), जस्त (Zn), तांबे (Cu) यांचे प्रमाण देखील या आधुनिक गांडूळखत पद्धती मध्ये जास्त असते. या पद्धतीमधुन तयार झालेले ‘गांडुळ खत’ आणि ‘गांडुळ अर्क’ हे आपल्या शेतीसाठी एक वरदानच आहे.

गांडूळ खतासाठी गांडुळ कशी उपलब्ध होतील ?

  • गांडूळ खतासाठी उत्तम प्रजाती जसे कि – इओसिना फोटीडा, युड्रीलीस युजीनी, ऑस्ट्रेलीयन स्प्रिंग अर्थवर्म अशी गांडुळे निवडावीत.
  • देशी गांडुळ खत बनविण्यास वापरू नये कारण ती जास्त माती खातात व सेंद्रिय पदार्थ कमी खातात. त्यामुळे गांडुळ खत उत्तम प्रतीचे बनत नाही.
  • गांडुळ आपल्याला कुठल्याही कृषी विज्ञान केंद्रात ती उपलब्ध होऊ शकतात किंवा मग गांडूळांच्या अंड्यांनी युक्त असे कल्चर उपलब्ध झाल्यास आपण गांडुळ आपल्या बागेत उत्पादित करू शकतो.

गांडूळ खत तयार होण्यासाठी किती दिवस लागतात ?

गांडूळ खत तयार होण्यसाठी कमीत कमी २५ ते ३0 दिवसांचा कालावधी लागतो आणि आपल गांडूळ खत तयार झाल आहे की नाही हे ओळखायचे असेल तर जेव्हा बेड वरती त्या शेणाचे चहा पावडर इतक्या लहान आकाराचे दाने तयार होतील तेव्हा आपण समजु शकतो की आपलं गांडूळ खत हे तयार झाल आहे.तर ते गांडूळ खत आपण लगेच नाही काढणार आपण आधी एक वरच्या खताचा थर आधी हलवून घेणार आणि एक एक दिवस तसचं ठेवणार जेणेकरून वरचे सगळे गांडूळ खाली जातील आणि त्यांतरच आपण दुसऱ्या दिवशी तो हलवलेला थर काढून घेणार आणि अजून काही दिवस दुसरा गांडूळ खताचा थर तयार होण्यासाठी वेळ देणार तस पाहायला गेल तर १ बेड पूर्णपणे रिकामा होण्यसाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो तर जेव्हा आपण गांडूळ खताचा पहिला एक थर काढून घेतो तर तेव्हा सर्वप्रथम आपल्याला तो सगळा काढलेला थर एक ते दोन दिवस उन्हामध्ये ठेवायचा आहे व त्यानंतर चहापावडर इतका बारीक चाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच शेतात वापरावा किंवा बाजारामध्ये विक्रीसाठी काढायचा आहे

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )