छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वधू – तुळापूर (Tulapur)

तुळापूर मधील समाधी स्थानाचा पत्ता । तुळापूर Tulapur -नागरगाव । संभाजी महाराज समाधी स्थळ । श्री संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांची समाधी. । संभाजी महाराज्यांच्या मृत्यू नंतर कोणी केले अंतिम संस्कार । तुळापूर (Tulapur) चे हवामान । तुळापूर (Tulapur) ला जाण्याचे मार्ग । तुळापूर (Tulapur) येथे राहण्याची आणि जेवणाची वेवस्था ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

तुळापूर मधील समाधी स्थानाचा पत्ता :

Chatrapati sambhaji Maharaj Samadhi , Tulapur, Maharashtra 412216

तुळापूर Tulapur -नागरगाव (पुणे पर्यटन)

तुळापूर हे पुण्यापासून ३२ किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात आहे.आजचे तुळापूर असणारे हे गाव पूर्वी या गावाचे नाव ‘नागरगाव’ असे होते. शहाजीराजे व आदिलशाहीतील वजीर मुरारजगदेव यांनी या ठिकाणी हत्तीच्या वजनाच्या सोन्याच्या चोवीस तुळा दान केल्यामुळे या गावाला तुळापूर असे नाव पडले. तुळापूरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. आळंदीपासून येणाऱ्यांना १४ कीलोमीटरचा प्रवास करावा लागतो तर पुणे शहरातून ३० किलोमीटरवर हे ठिकाण आहे. येथे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांचा संगम झालेला आहे. श्रीक्षेत्र आळंदीहून वाहणारी इंद्रायणी नदी, भीमाशंकरच्या दाट जंगलातून उगम पावलेली भीमा व तीची उपनदी भामा या तीन नद्यांचा संगम तुळपूर येथे झाला आहे.

संभाजी महाराज समाधी स्थळ

पुरंदर किल्यावर महाराणी सईबाई व युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्म घेऊन छत्रपती संभाजी महाराज अत्यंत विद्वान सुसंस्कृत पंडीत म्हणून नाव लौकिक पावले. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच बुद्धभुषणम नावाच्या राजनितीवर आधारित ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली. वय वर्षे ९ असताना औरंगजेबाच्या दरबारात आपल्या पित्यासोबत जाऊन राजकारणाचे धडे शिकुन घेतले. शिवरायांच्या मृत्यूनंतर दुसरा छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला.

औरंगजेबासारखा महाबलाढ्य शत्रु संभाजी राजांवर चाल करुन आला. एकाच वेळी चार शत्रुशी लढत देत राहिला. संभाजी राजे यांनी १२० युद्धे जिंकली होती. त्यावेळी भारतात छत्रपती संभाजी महाराजांसारखा योद्धा नव्हता. छत्रपती संभाजी महाराज हे सरकार चालवण्यातही अत्यंत कुशल होते. ते कुशल संघटक होते. परंतु स्वराज्याचा कोणताही भाग अथवा गड शत्रुला मिळवून दिला नाही. मात्र संभाजी सारखा शुर, धाडसी, राजा कोकणात रत्नागिरी जवळ संगमेश्वर येथे पकडला गेला. त्यानंतर त्यांना तुळापूर येथे ठार मारण्यात आले.

येथील संभाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याखाली राजांचा अस्थिकलश शाहु राजांनी (संभाजीराजांचे पुत्र) तांब्याच्या कलश जतन करुन ठेवला आहे. तशा माहितीचा ताम्रपट उपलब्ध आहे. अशा प्रकारे पुरंदराच्या उत्तुंग शिखरावर जन्म घेतलेला हा महापराक्रमी राजपुत्र देशाकरिता, भुमिपुत्रांच्या रक्षणाकरिता, ह्या भीमा , इंद्रायणी,भामा,आंद्रा, सुधा या पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर याच ठिकाणी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी चिरनिद्रीस्त झाला.

याचवेळी प्राचीन संगमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला व राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांच्या शुभहस्ते ह्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत बाल शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांचे वडील शहाजीराजे व माँ जिजाऊ यांनी ह्याच संगमेश्वर महादेवाच्या साक्षीने दिली. शिवरायांनी बाल वयातच ह्या ठिकाणी आपले वडिल शहाजीराजे व माँ साहेब जिजाऊंना स्वराज्य स्थापनेचे वचन दिले.

या ठिकाणाला इतिहासा बरोबर नयन रम्य अशा निसर्गाची जोड देखील लाभली आहे. यामुळे या चित्तथरारक ऐतिहासिक घटनास्थळाचा इतिहास जाणून घेतल्यानंतर तो प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक काही काळ त्रीवेणी संगम समोर बसून सुखावतो.

श्री संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांची समाधी.

कवी कलश हे श्री संभाजी महाराजांचे चांगले मित्र आणि सल्लागार व काव्यसम्राट होते. त्यांनाही संभाजी महाराजांसह याठिकाणी ठार करण्यात आलं होतं. महाराजांच्या समाधीच्या अलिकडे कवी कलशांची समाधी आहे. एका चौकोनी छोट्या चौथऱ्यावर कवी कलशांचे बलिदान स्थळ असे लिहिलेले आहे. कवी कलश हे शंभू राजांचे बंधू, सखा आणि एक निष्ठावंत सेवक होते. आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली. मृत्यूच्या दारापर्यंत ही मैत्री कायम होती.

संभाजी महाराज्यांच्या मृत्यू नंतर कोणी केले अंतिम संस्कार ?

सध्याच्या काळात हा मुद्दा बराच वादग्रस्त झालेला आहे. मात्र आजपर्यंत सांगण्यात आलेला इतिहास हाच आहे की, वढू गावातील गोविंद महार (गायकवाड) यांनी महाराजांच्या शरीराचे तुकडे एकत्र करून एका चर्मकाराकडून शिवून घेतले आणि जंगलात नेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले. आज वढू गावात गोविंद महार यांची साधीशी समाधी बांधलेली आहे.

मात्र काहींच्या मते राज्यावर अशी बिकट परिस्थीती आलेली असताना सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन राजांचे अंतिम संस्कार केले होते. मात्र या सगळ्या घटनाक्रमात एका स्रीचे महत्त्व सर्वात जास्त म्हणता येईल ती म्हणजे जनाबाई. या स्त्रीनेच नदीवर कपडे धूताना औरंगजेबाच्या हशमांनी राजांचे शरीर नदीकिनारी फेकताना पाहिले होते. तिनेच गावातील लोकांना याची माहिती देऊन जागे केले आणि त्यामुळे पुढे राजांवर अंतिमसंस्कार होऊ शकले. वढू येथे महाराजांची समाधी आहे जिथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार झाले होते.

तुळापूर (Tulapur) चे हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.

तुळापूर (Tulapur) ला जाण्याचे मार्ग

पुण्यावरून जाताना दुचाकीने १ तासाचा आणि कार किंवा बस ने १.५ तासाचा रस्ता आहे

पुण्यामार्ग जायचे असल्यास पुणे -नगररोड -चंदननगर -वाघोली -लोणीकंद डावीकडे तुळापूर फाटा -फुलगाव -तुळापूर

मुंबई मार्गे येणार असाल तर कार किंवा बस ने ३.५ तासाचा रस्ता आहे

तुळापूर (Tulapur) येथे राहण्याची आणि जेवणाची वेवस्था

तुळापूर ग्रामपंचायतीने या ठिकाणी पर्यटकांची जेवण्याची गैरसोय होऊ नये म्हणून कॅन्टीन देखील उभारली आहे. या शिवाय लांब पल्यावरुन आलेल्या पर्यटकांसाठी शुंभुराजे भक्त निवास देखील या ठिकाणी बांधण्यात आले असून येथे मुक्काम देखील करता येतो. तसेच येथे बोटिंगचा मनसोक्त आनंद देखील घेता येतो. अशा या ऐतिहासिक साक्षीदाराला अवश्य भेट द्यावी.

हिंदवी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी शिवाजी भोसले (Chatrapati Sambhaji Maharaj)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )