छत्रपती शाहूराजे भोसले (Chhatrapati Shahuraje Bhosale)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

छत्रपती शाहूराजे भोसले – Chhatrapati Shahuraje Bhosale

१८ मे १६८२ या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराजमहाराणी येसुबाईसाहेब यांना पुत्ररत्न झाले . हाच संभाजीपुत्र पुढे थोरले शाहु महाराज इतिहास मध्ये अजरामर झाले.

त्याचवेळेस लाखो सेनासागराबरोबर औरंगजेब स्वराज्यावर चालुन आला होता . संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने औंरजेबाशी संघर्ष करत होते . नियतीने गलती केली आणि शिवपुत्र मुघलांच्या हाती पडला. त्यावेळी हा संभाजीपुत्र अवघा आठ वर्षाचा होता . रायगड पडल्यावर महाराणी येसुबाई व संभाजीपुत्र औरंगजेबाच्या कैदेत रहावे लागले .तरीही राजाराम महाराजांचा नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अविरत चालुच होता .

ते स्वातंत्र्ययुद्ध तब्बल २७ वर्ष चालुन , औरंगजेबाच्या शेवटच्या श्वासाबरोबर थांबले . दरम्यानच्या दिर्घ काळात ( १६८९ ते १७०७ ) शाहु हे मुघलांच्या कैदेतच होते . औरंगेजेबाच्या मृत्यूनंतर, तब्बल १८ वर्ष मोगलांच्या कैदेत असलेले संभाजीपुत्र शिवाजी उर्फ थोरले शाहु ह्यांची सुटका झाली. आणि खऱ्या अर्थाने शाहु महाराज इतिहास घडण्यास सुरुवात झाली

छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९) हे मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.

शाहू महाराजांचा छत्रपति कार्यकाळ १७०७-१७४९

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्त्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना धनाजी जाधवराव, बाळाजी विश्वनाथ, खंडेराव दाभाडे, सेखोजी थोरात, चिमणाजी दामोदर, सुभानजी आटोळे, पुरंदरे यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली, तेव्हा सय्यदहु सेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्या सोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, सरसेनापती खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रू वारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंच्या मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली; परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली.

छत्रपती शाहु महाराज इतिहास – History of Chhatrapati Shahu Maharaj

अजिंक्यतारा किल्ल्यावर शाहु १२ जानेवारी १७०८ या दिवशी छत्रपती जाहले . पण या १८ वर्षात शाहुंना घडविणार्या मातोश्री येसुबाईसाहेब यांचे आभाळाएवढे कर्तृत्व आम्ही लक्षात घ्यायला हवे . छत्रपती शाहू महाराजांचा काळ म्हणजे मराठा साम्राज्यातील सुवर्ण काळ मानला जातो. छत्रपती शाहूंच्या मुत्सदी राजकारणाने अनेक मराठी घराणी उदयाला आली.

सामान्यातला असामान्यत्व उफाळून आलं. शाहू महाराजांनी या घराण्यातील शूर पुरुषांचा कौशल्याने उपयोग करून घेतला, त्यांच्या गुणाची कदर केली, त्यांना उत्तेजन देऊ केले, वेळोवेळी त्यांची पाठ थोपटली.

याचाच परिणाम म्हणून हे पुरुष मोठमोठी धडाडीची राजकारण स्वतःच्या ताकदीवर पेलून, शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याचा रोपट्याला, स्वतःच्या रक्तमांसाच खतपाणी घालू लागले. बघता बघता या रोपट्याचा वटवृक्ष झाला.

तो फोफावला. त्याच्या पारंब्यानी संबंध हिंदुस्थानावर आपली छाया धरली. छत्रपती शाहूंनी अगदी विलासी आयुष्य जगले. मराठा साम्राज्याचे छत्रपती असूनही त्यांचे अगदी साधे राहणीमान होते.

छत्रपती शाहु महाराज यांचे सरदार – Sardar of Chhatrapati Shahu Maharaj

  • खंडेराव दाभाडे (सेनापती) : शाहूंच्या महान सेनेचे नेतृत्व करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, खंडेराव दाभाडे. उत्तरेमध्ये गुजरात व तत्सम प्रातांमध्ये पराक्रम व वचक ठेवण्याचं काम खंडेराव दाभाडे यांनी केलं.
  • बाजीराव प्रधान : शाहू महाराजांच्या विशेष मर्जीतले. पराक्रमी व धाडसी व्यक्तिमत्व. उत्तरेतील अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवत मराठा साम्राज्य वाढीला मोठा हात त्यांनी लावला.
  • राणोजी शिंदे : उत्तरेतील ग्वाल्हेर व जवळील प्रांतामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार त्यांनी केला.
  • दमाजी गायकवाड : उत्तर हिंदुस्थानामध्ये पराक्रम व मर्दुमकी गाजवली. खंडेराव दाभाडे यांच्या नंतर गुजरात व राजस्थान भागामध्ये त्यांनी वचक ठेवला.
  • पिलाजीराव जाधवराव (मुख्य सल्लागार) : छत्रपती शाहूंच्या प्रत्येक मोहिमेचा “मुख्य सूत्रधार”. भारतभर मराठा रियासतीच्या चालू असलेल्या हरेक मोहिमवर लक्ष ठेवण्याचे व योग्य सल्ला देण्याचे काम पिलाजीराव जाधवराव करत. छत्रपती शाहूंच्या दरबारामध्ये त्यांना विशेष स्थान होत.
  • मल्हारराव होळकर : माळव्याचे सुभेदार म्हणून संपूर्ण हिंदुस्थानात ओळख. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत फैलावण्यासाठी होळकरांचे मोठं योगदान आहे. उत्तरेमध्ये मल्हारबाबांचा मोठा दबदबा होता.
  • फतेसिंह भोसले : दक्षिणेमध्ये मराठी साम्राज्याचा विस्तार भोसले घराण्याने केला. छत्रपती शाहूंच्या विशेष मर्जीतले, फतेसिंह भोसले. दक्षिणेतील भोसले घराण्याची भारताच्या सांस्कृतिक ठेव्यातल भरगोस योगदान सर्वश्रुत आहे.
  • उदाजी पवार : धारच्या पवार घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. उत्तरेतील हरेक मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग व पराक्रम.

Related Post

हिंदवी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी शिवाजी भोसले (Chatrapati Sambhaji Maharaj)

महाराणी येसूबाई संभाजी भोसले – Maharani Yesubai Sambhaji Bhosale

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )