पेरूची पाने – Benefits Of Guava Leaves

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

पेरू च्या पानांचे फायदे : (Benefits Of Guava Leaves)

पेरू औषधी गुणधर्माने समृद्ध मानला आहे. याच्या सेवनाने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. याला उलट्या रोखण्यासाठी असरदार मानतात, तसेच हृदयरोगापासून देखील बचाव होतो. तसे तर हे भारतात मिळणारे एक साधे फळ आहे, ज्याचे प्राचीन संस्कृत नाव अमृत किंवा अमृत फळ आहे. वाराणसी मध्ये ह्याला लोक अमृत नावानेच संबोधित करतात.

पेरू प्रमाणेच त्याची पाने ही देखील खूप उपयुक्त असतात. या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अँटी बेक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेन्टरी गुणधर्म असतात, जे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण करतात. चला जाणून घेऊ या पेरूच्या पानाचे फायदे.

पेरूच्या पानात अँटी बेक्टेरियल गुणधर्म असतात, अशा मध्ये त्याच्या पाण्याच्या सेवन केल्याने पोटाचे दुखणे दूर होऊ शकतात. तसेच हे उलट्यांपासून देखील आराम देतात. या साठी पेरूच्या ५-६ पानांना १० मिनिटे उकळवून घ्या आणि नंतर गाळून त्याचे पाणी प्या.

सांधे दुखी मध्ये देखील पेरूची पाने फायदेशीर आहे. या साठी पेरूची पाने वाटून त्याचे लेप बनवा आणि त्या लेपाला सांध्यांवर लावावे, या मुळे वेदनेपासून आराम मिळेल.

चेहर्‍यावर पडलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी या पानांची पेस्ट करून जेथे सुरकुत्या आहेत त्या भागात लावावी. कांही दिवसांतच सुरकुत्या कमी होऊ लागल्याचे दिसते. चेहर्‍यावरचे डाग कमी करण्यासाठी ही पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने दिवसातून दोन वेळा चेहरा धुतला तर डाग कमी होतात.

मुरूमांसाठी पेरूच्या पानांचा लेप चेहर्‍यावर लावावा. या पानांत अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात व त्यामुळे मुरूमे जातात.

तोंडाला वास येत असेल तर पेरूची पाने चावून थुंकावी. वास जातो. केस तेलकट अ्सतील तर पेरूची पाने गरम पाण्यात टाकून त्या पाण्याने केस धुवावेत. जास्तीचे तेल निघून जाते व केस चमकदार दिसतात.

पेरूची पाने पाण्यात टाकून प्यायल्याने हे मधुमेहासाठी फायदेशीर मानले जातात. वास्तविक हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतं. या शिवाय हे शरीरातील जटिल स्टार्च साखरे मध्ये बदलण्यापासून रोखतं, ज्यामुळे हे वजन कमी करण्यास मदत करतं.

पेरूच्या पानाचे पाणी दात दुखणं, हिरड्यांची सूज आणि तोंडाच्या छाला पासून आराम देण्याचे काम करतं. आपण याचे पाने उकळवून त्याचा पाण्याने गुळणे करा. असे केल्यास आपल्याला खूप आराम मिळेल.

तांब्याचं आयुर्वेदीक महत्त्व (Health benefits of Copper)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )