गणेश तेजोवर्धन स्तोत्र – Ganesh Tejovardhan Stotra

गणेश तेजोवर्धन स्तोत्र : (Ganesh Tejovardhan Stotra) । गणेश तेजोवर्धन स्तोत्र – Ganesh Tejovardhan Stotra Audia

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

गणेश तेजोवर्धन स्तोत्र : (Ganesh Tejovardhan Stotra)

॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्रीमत्स्वानंदेशाय ब्रह्मणस्पतये नमः । श्रीसिद्धिबुद्धिभ्यां नमः । श्रीमद्भ्रुशुड्यवाच ।

नमो नमस्ते गणनाथ ढुंढे । सदा सुशांतिप्रद शांतिमूर्ते । अपारयोगेन च योगिनस्त्वां । भजन्ति भावेन नमो नमस्ते ॥ १ ॥

प्रजापतीनां त्वमथो विधाता । सुपालकानां गणनाथ विष्णुः । हरोऽसि संहारकरेषु देव । कलांशमात्रेण नमो नमस्ते ॥ २ ॥

क्रियात्मकांना जगदम्बिका त्वं । प्रकाशकानां रविरेव ढुंढे । यत्नप्रदानां च गुणेशनामा । कलांशमात्रेण नमो नमस्ते ॥ ३ ॥

शरीरभाजां त्वमथोऽसि बिंदुः । शरीरिणां सोऽहमथो विभासि । स्वतोत्थकानां च सुबोधरुपः । कलांशमात्रेण नमो नमस्ते ॥ ४ ॥

विदेहकानामसि सांख्यरुपः । समाधिदानां च निजात्मकस्त्वम् । निवृत्तियोगेषु ह्ययोगधारी । कलांशमात्रेण नमो नमस्ते ॥ ५ ॥

गणास्त एते गणनाथनामा । त्वमेव वेदादिषु योगकीर्ते । सदा सुशांतिप्रद संस्थितोऽसि । भक्तेश भक्तिप्रिय ते नमो वै ॥ ६ ।।

गकारसिद्धिरपि मोहदात्री । णकारबुद्धीरथमोहधात्री । तयोर्विलासी पतिरेव नामा । गणेशश्र्वरस्त्वं च नमो नमस्ते ॥ ७।।

गकाररुपेण भवान् सगौणो । णकाररुपेण च निर्गुणोऽसि । तयोरभेदे गणनाथनामा । योगेश भक्तेश नमो नमस्ते ॥ ८ ॥

किं वदामि गणाधीश महिमानं महाद्भुतं । यत्र वेदादयो भ्रांता इव जाताः प्रवर्णने ॥ ९ ॥

पतितानामहं श्रेष्ठः पतितोत्तम एव च । तव नामप्रभावेण जातोऽहं ब्राह्मणोत्तमः ॥ १० ॥

किंचित्संस्कारयोगेन विश्रामित्रादयः प्रभो । जाता वै ब्राह्मणत्वस्य ब्राह्मणानिर्मलाः पुरा ॥ ११ ॥

अहं संस्कारहीनश्र्च जात्या कैवर्तकोद्भवः । तत्रापि पापसक्तात्मा त्वया च ब्राह्मणः कृतः ॥ १२ ॥

एवमुक्त्वा नतं विप्रं प्रांजलि पुरतः स्थितं । भक्तिभावेन संतुष्टस्तमुवाच गजाननाः ॥ १३ ॥

श्रीमद् गणेश उवाच वरान्वरेय दास्यामि यांन्यांत्वं विप्र वांछसि । त्वत्समो नैव तेजस्वी भक्तो मे प्रभविष्यति ॥ १४ ॥

तस्य तद्वचनं श्रुत्वा साश्रुनेत्रो महामुनिः । भ्रुशुंडी गद्गदा वाण्या तं जगाद गजाननम् ॥ १५ ॥

यदि प्रसन्नभावेन वरदोऽसि गजानन ।त्वदीयां भक्तिमुग्रां मे देहि संपूर्णभावतः । तथेति तमुवाचाथ गणेशो भक्तवत्सलः ॥ १६ ॥

॥ इति श्रीमुन्मौद्गलोक्तं श्रीमद्भ्रुशुंडीविरचितं श्रीगाणेशतेजो वर्धनस्तोत्रं संपूर्णम्

गणेश तेजोवर्धन स्तोत्र – Ganesh Tejovardhan Stotra Audia

॥ श्रीमत्स्वानंदेशार्पणमस्तु ॥

श्रीगाणेशतेजो वर्धनस्तोत्रं हे स्तोत्र मुद्गल पुराणांत आले आहे. भ्रुशुंडी ऋषींना तेजस्वी ब्राह्मणत्व मिळवावयाचे होते. असे तेज देणारी देवता गणेश. त्याची त्यांनी निस्सीम भक्ति केली. या स्तोत्र पठणाने आध्यात्मिक, शारीरिक, सांपत्तिक, मानसिक किंवा बौद्धिक तेजस्वीता लाभते. श्रीभ्रुशुंडी ऋषिनीं तेजस्वी ब्राह्मणत्व त्याना लाभावे म्हणून हे गणेशाचे स्तुतीपर स्तोत्र केले. ते म्हणतात सुशांती देणार्‍या शांतीमूर्ते (गणेशा) योगीजन अपार योगाने भावपूर्णरीतीने तुला भजतात. तुला नमस्कार असो. सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव याची सृजनशीलता; रक्षण/ पालन करणार्‍या विष्णुची पालकत्वाची शक्ति आणि संहार करणार्‍या शंकरांची संहारक शक्ति तुझ्यामुळेच आहे. तुला माझा नमस्कार असो. जगदंबेची क्रियात्मक शक्ति, रविचा प्रकाश, यत्न करणार्‍यांचा गुणेश तुच आहेस. शरीरापलीकडे ज्यांची प्रगती झाली आहे त्यांच्यासाठी तू बिंदुरुप, शरीरावर प्रेम करणारांसाठी सो हं चा बोध देणारा, स्वतःचा उद्धार इच्छिणारांसाठी सुबोधरुप आहेस तुला नमस्कार असो. विदेहीकांसाठी सांख्यरुप, समाधीस्तांसाठी निजात्मकरुप, व योग्यासांठी निवृत्तीरुप अशा तुला नमस्कार असो. ग काररुपी सिद्धि ही मोह निर्माण करणारी व ण काररुपी बुद्धि मोहांत पाडणारी त्यांचा पती तू गणेश ! हे ईश्र्वरा तुला माझा नमस्कार आहे. ग कार रुपाने आपण सगुण व ण कार रुपाने निर्गुण असलेल्या हे योगीजनांच्या भक्तेशा तुला नमस्कार असो.

हे गणाधीशा तुझा महाअद्भुत महिमा वर्णन करतांना वेद भ्रमित झाले, तेथे मी कसा वर्णन करु शकेन? सर्व पतितांत मी अति पतित व पतितांचा उद्धार करणरा सर्वांत उत्तम तू, तुझे नाम घेऊनच मी ब्राह्मण झालो. संस्कारहीन मी विश्र्वामित्रांसारखा तेजस्वी व निर्मल ब्राह्मणत्वास केवळ तुझ्या किंचित संस्काराने/कृपेने पोहोचलो. असे बोलून गणेशापुढे हात जोडून भ्रुशुंडी नत मस्तक झाले. त्यांच्या या स्तुतीने गणेशाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला. भ्रुशुंडी ऋषींनी त्याच्याच भक्तीचे वरदान मागुन घेतले.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )