कापूस , कपाशी । कापूस लागवड : (महाराष्ट्र कापसाचे पीक घेणारा जिल्हा कोणता) । पेरणीसाठी वाणांची निवड कोणती असावी तसेच कापसाच्या जातीची नावे कोणती ? ( कपाशीचे कोणते बियाणे चांगले आहे ) । कापूस लागवडी साठी जमीन कशी असावी । कापूस लागवडी साठी हवामान कोणते योग्य । कापूस पिकासाठी किती पाणी लागते आणि त्याचे व्यवस्थापन कसे असावे । कापूस पेरणी कशी करावी ? ( कापूस लागवड कधी करावी ) । कापूस पिकाची नांग्या भरणे । कापूस पिकांची विरळणी । कापूस पिकाची खुरपणी । कापूस पिकाची वेचणी । कापसाच्या पिकाचे उत्पादन । कापूस पिकाची अचानक मर होणे । कपाशीची पाने लाल होणे । बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी । बागायती कपाशीसाठी रासायनिक खते ( कापूस खत व्यवस्थापन ) ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
कापूस लागवड : (महाराष्ट्र कापसाचे पीक घेणारा जिल्हा कोणता)
कापूस हे खात्रीचे पीक असल्याने, बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असल्याने कापसाच्या लागवडीकडे शेतकरी वळू लागले. महाराष्ट्रात खानदेश, मराठवाडा, विदर्भ ह्या भागामध्ये कापूस हे पारंपारिक पीक असल्यामुळे कापसास कमी अधिक भाव मिळाला तरी हे पीक शेतकरी करीत असतात.
बागायती कपाशीसाठी सुधारित/संकरित वाणांची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी . महाराष्ट्रातील अधिकतर शेतकऱ्यांची पसंत हि बी . टी. संकरित कापूस वाण हि आहे . देशामध्ये सन २०२२-२३ पर्यंत ४००० पेक्षा अधिक बीटी वाण आहेत. कापसाच्या सुधारित जातीमध्ये -२, राशी -११, सावित्री, ब्रम्हा तसेच अलीकडे नांदेड -४४, अजित व महिको कंपनीच्या जाती प्रचलित आहेत.लांब धाग्याच्या सीओ -२ जाती प्रसिद्ध असून वरलक्ष्मी, सावित्री, एच-४,५,६ यातील शेतक-यांनी आपल्या गरजेनुसार वाणाची निवड करावी.
कापूस लागवडी साठी जमीन कशी असावी ?
सर्व साधारणपणे या पिकास काळी, भारी जमीन मानवते म्हणून जी जमीन कापसास मानवते त्या जमिनीस भारी काळी कापसाची जमीन ( Black Cotton Soil ) असे म्हटले जाते. परंतु जसजशा कापसाच्या लवकर येणार्या, भरपूर उत्पन्नाच्या संकरित जाती विकसित झाल्या, तसतसे हे पीक मध्यम, करड्या, हलक्या जमिनीमध्ये देखील अनेक राज्यांच्या विविध भागात घेतले जाऊ लागले आणि हे पीक बागायती झाल्याने चांगले उत्पन्नही येते.
कापूस लागवडी साठी हवामान कोणते योग्य ?
उष्ण व दमट हवामान कापूस पिकास मानवते. थंडीचे हवामान या पिकास मानवत नाही. ढगाळ हवामानामध्ये, पावसामध्ये पात्यांची गळ होत असल्यामुळे यामुळे प्रचंड नुकसान होते.
कापूस पिकासाठी किती पाणी लागते आणि त्याचे व्यवस्थापन कसे असावे ?
सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात पेरलेल्या कपाशीला ८०० ते ९०० मि.लि. पाणी लागते. कपाशीला पेरणीपासून पाते लागेपर्यंत तुलनेने कमी पाणी लागते. या काळात पिकाला जास्त पाणी देऊ नये, पीक फुलो-यात आल्यावर पाण्याची गरज वाढत जाते व बोंडे भरताना ती सर्वांत जास्त असते.कपाशीच्या उगवण, पाते लागणे, फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात जमिनीत ओलावा असणे जरुरीचे आहे. जमिनीच्या क्षमते नुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. दोन पाळ्यांत १५ ते २० दिवसांपेक्षा जास्त अंतर ठेऊ नये. जर पाण्याचा पुरवठा अपुरा असेल तर सरी आड सरी यापध्दतीने पाणी द्यावे.
कापूस पेरणी कशी करावी ? ( कापूस लागवड कधी करावी )
बागायती कापसाची पेरणी वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणी उशिरा झाल्यास वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान होऊ शकते किंवा त्यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येते. पेरणी झाल्यानंतर लगेचच ४ ते ६ इंच आकाराच्या सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व भरपूर पाणी द्यावे. नंतर प्रत्येक पिशवीवर २ ते ३ बिया लाव्याव्यात. या पिशव्यांचा उपयोग नांगे भरण्यासाठी करावा. तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेऊन त्यांचे किडीपासून सरंक्षण करावे व वरचेवर पाणी द्यावे. साधारणपणे एका एकराच्या नांग्या भरण्यासाठी २५० ते ३०० पिशव्या पुरतात.
पेरणी करताना सरीच्या मध्यावर २ इंच खोल खड्डा करावा व त्यात शिफारस प्रमाणे रासायनिक खते, बिया टाकून पूर्णपणे मातीने झाकावे व लगेच पाणी द्यावे.
कापूस पिकाची नांग्या भरणे :
साधारणपणे १० दिवसांत सर्व बिया उगवतात, ज्या ठिकाणी बी उगवले नसेल त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच, वाणाचे नांग्या भरण्यासाठी वापरावे वर उल्लेख केल्याप्रमाणे पॉलिथिन पिशव्यांतील रोपे २० ते २५ दिवसांच्या आतच लावावीत.
पंधरा दिवसांनंतर प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेऊन बाकीची उपटून टाकावीत.
कापूस पिकाची खुरपणी :
पेरणी नंतर दोन खुरपण्या व कोळपणी करुन ६० दिवसांपर्यंत पीक तणविरहीत ठेवावे
कापूस पिकाची वेचणी :
पहिली वेचणी दसरा ते दिवाळीच्या दरम्यान सुरू होऊन शेवटची वेचणी डिसेंबरपर्यंत पूर्ण होते. वेचणी पुर्ण झाल्यानंतर राहिलेल्या कैर्या काढून सुकवाव्यात. कॉटन थ्राईवर, क्रॉंपशाईनर,ही औषधे वापरल्यास बोंडांची वाढ झपाट्याने होते. बोंडामध्ये कापूस भरगच्च व वजनदार भरतो. त्यामुळे कापसाच्या वजनात वाढ होऊन उत्पादन अधिक प्रमाणात मिळते. तीनही वेचानीचा कापूस एकसारखा व चांगल्या प्रतीची मिळतो.
कापसाच्या पिकाचे उत्पादन :
बागायती कापसाचे एकरी १३ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते.व्यवस्थित काळजी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वेळेवर, योग्य वापर केल्यास बागायती कापसाचे एकरी २३ क्विंटलपर्यंत उत्पादन घेत येते.
कापूस पिकाची अचानक मर होणे
लक्षणे : दिवसाचे तापमान अधिक असल्याने व दिर्घकाळ टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहिल्यास पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणा-या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. झाडाच्या पाने, फुले व बोंडे यांना अन्नद्राव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो पाने पिवळी पडतात. पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते.
उपाय : वेळेवर पाणी द्यावे. (८-१० दिवसांच्या अंतराने) पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी जास्त करु नये. , पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेले पाणी लगेच काढून टाकावे. , विकृतीग्रस्त झाडांना लक्षणे दिसू लागताच १.५ किलो युरिया + १.५ किलो पालाश १०० लिटर पाण्यात मिसळून १५० ते २०० मि.लि. द्यावे. , त्यानंतर ८-१० दिवसांनी २ किलो डिएपी १०० लिटर पाणयात मिसळून हे द्रावण १५० ते २०० मि.लि. झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे व लगेच पाणी द्यावे.
कपाशीची पाने लाल होणे :
लक्षणे : कपाशीची पाने लाल होण्याचे मुख्य कारण नत्राची कमतरता होय. नत्र खतांच्या कमतरतेमुळे बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये पानातील हरित द्रव्यामधील नत्र वापरले जाते आणि पाने लाल होतात. तसेच मॅग्नेशियम ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आणि रस शोषणा-या किडींच्या प्रादुर्भावामुळे सुध्दा कपाशीची पाने लाल होतात.
उपाय : १) लाल्या प्रतिकारक वाणांची निवड करावी. २) शिफारसीत खतांच्या मात्रा द्याव्यात. त्यामध्ये २० टक्के नत्र लागवडीच्या वेळी, ४० टक्के नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि ४० टक्के नत्र लागवडीच्या ६० दिवसांनी द्यावे, मॅग्नेशियमसारखे सूक्ष्म अन्नद्रव्य (२० ते ३० किलो/हे) जमिनीत द्यावे. वाढीच्या काळात २ टक्के डिएपी खतांच्या दोन फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी
पीक साधारणपणे १ ते १.५ महिन्याचे असताना शेतात शेंडेअळीच्या प्रादुर्भाव आढळून येतो. किडग्रस्त शेंडे तोडून नाश करावा. , संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करुन नये , संश्लेषित पायरेथ्राईडच्या वापरानंतर दुसरी फवारणी अॅसिफेट/कार्बारील किंवा क्यॅुनॉलफॉसची करावी., अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी फवारावे. , सर्व प्रकारच्या बोंडअळीसाठी बी.टी, हे जैविके अणुजीवयुक्त किटकनाशक वापरावे.
बागायती कपाशीसाठी रासायनिक खते ( कापूस खत व्यवस्थापन )
संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश, तर सुधारित वाणांसाठी ८० किलो गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर द्यावे किंवा खते कमी असल्यास लागवडीच्या वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकावे व मातीत चांगले मिसळावे. वीस टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्र समान दोन आठवड्यात पेरणीनंतर ३० व ६० दिवसांनी द्यावे. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुध्दा गरज असते. ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमध्ये उपलब्ध असतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे बोंडाची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात.