जेजुरीचा खंडोबा (Khandoba of Jejuri)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

जेजुरीचा खंडोबा (Khandoba of Jejuri)

खंडोबाची देवस्थाने (Temples of Khandoba)

महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची बरीच देवस्थाने आहेत… मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी एकंदर प्रमुख अशी अकरा स्थाने आहेत

  • १) जेजुरी (पुणे)
  • २) शेबुड (अहमदनगर)
  • ३) निमगाव दावडी (पुणे)
  • ४) सातारे (औरंगाबाद)
  • ५) पाली-पेंबर (सातारा)
  • ६) मंगसुळी (बेळगांव)
  • ७) मैलारलिंग (धारवाड)
  • ८) मैलार देवगुड्ड (धारवाड)
  • ९) मण्णमैलार (बल्लारी )
  • १०) मैलापुर-पेंबर (बिदर)
  • ११) नळदुर्ग-धाराशी (उस्मानाबाद)

जेजुरी

हे गांव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे… उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्या ६३ ओवऱ्या आहेत…..

नळदुर्ग

नळदुर्ग हे गांव सोलापूरच्या ईशान्येस साधारण ३० मैलावर आहे… असे सांगतात की या ठिकाणी खंडोबाची तीन स्थाने आहेत. शके १५३६ मध्ये एक स्थान किल्ल्यांत होते. असे कागदपत्रांत आहे…..
नळदुर्ग गावाच्या उत्तरेस दोनएक मैलांवर दोन स्थाने जवळ जवळच आहेत… अहिल्याबाईने बांधलेले देवालय आज प्रसिद्ध आहे. सुमारे तीन मैलांवर अणदूर गांवी खंडोबा वसतीस असतो असे भक्त मानतात…..

पाली

पाली हे गाव सातारा-कोल्हापूर रस्त्यावर सातार्यापासून १५ मैलावर आहे… सातारा तालुक्यांतील अतीत या गावाजवळ ते ५ मैलावर कर्हाड तालुक्यांत आहे. या मंदिर ओवरींत एक शिलालेख आहे. हे देवस्थान शके १६९४ मध्ये चैत्र वद्य १३, गुरुवार या दिवशी श्री. गणेश खंडो व श्री महिपत खंडो पारगावकर यांनी बांधले…..

मंगसुळी (Mangsuli)

मंगसुळीचे हे देवस्थान बेळगांव जिल्ह्यांत अथणी तालुक्यांत आहे… येथे अश्विन महिन्यांत मोठी यात्रा भरते आणि अश्र्विन शुद्ध द्वादशीस भंडारा होतो. या ठिकाणी वाघ्या साखळदंड तोडतो. व त्यावरुन भविष्यही वर्तविले जाते…..

सातारे (Satare)

हे गांव औरंगाबाद स्टेशनपासून २ मैलांवर आहे… येथे चंपाषष्ठीला फार मोठी यात्रा भरते…..

मैलारलिंग (Mylarling)

हे स्थान धारवाडपासून सुमारे २ मैलावर आहे… उंच टेकडीवरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे…..

देवरगुड्ड (Devargudd)

पुणे-बंगलोर मार्गावर पुण्यापासून साधारणपणे ४०० मैलावर देवरगड्ड हे स्टेशन आहे… तेथून डोंगरावरील हे देवस्थान ४ मैलावर आहे. हे देवस्थान चुन्या-मातीचे आहे. मंदिराची शिखरे खुजी वाटतात. या देवस्थानास शके १६३८ ते १७६७ पर्यंत अनेक देणग्या मिळाल्याचे शिलालेख व कागदपत्रे आहेत…..

खंडोबा अवतार चरित्रातील प्रमुख खंडोबा क्षेत्र: श्री क्षेत्र जेजुरी (Major Khandoba Kshetra in Khandoba Avatar Biography: Shri Kshetra Jejuri)

जेजुरी हे सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे… श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला. दक्षिणे मध्ये मणि मल्लाचा संहार केल्या नंतर आपली राजधानी ही येथेच वसवली. मार्तंड भैरवाच्या मुळ अवतार ठिकाणाला म्हणजेच सह्याद्री च्या या डोंगररागांना जयाद्री नाव लाभले. आणि काळाचे ओंघात त्याचे जेजुरी झाले. या मल्हारीस हळद प्रिय म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदचूर्ण उधळीत असतो, उत्सवा मध्ये तर सारा आसमंत व परिसर भंडाराने सुवर्णमय होतो म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी म्हटले जाते…..

श्री क्षेत्र पाली (Sri Kshetra Pali)

खंडोबा म्हाळसा यांची विवाह भुमी साक्षात खंडोबा म्हाळसा येथे विवाहबद्ध झाले, सातारा जिल्ह्यात तारळी नदी काठी वसलेला निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुललेला असतो, आजही पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह येथे संपन्न होतो, मुळात या गावचे नाव राजापुर येथे पालाई नावाची एक गवळण राहत होती तिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा येथे लिंगरूपाने प्रगट झाले तिच्या नावावरूनच या गावास पाल अथवा पाली हे नाव प्राप्त झाले…..

श्री क्षेत्र नळदुर्ग / अणदूर (Shri Kshetra Naldurg / Andur)

नळदुर्ग व अणदूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत, या दोन ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, अणदूर येथे खंडोबा वर्षातील १०.२५ महिने व नळदुर्ग येथे १.७५ महिने वास्तव्य करतात असे मानले जाते, या मुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते… श्री खंडोबा व बाणाई यांचा विवाह येथेच संपन्न झाला, येथील नळराजाची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती तिचे भक्ती मुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले, उस्मानाबाद – सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासुन ५८ किमी व सोलापूर पासुन ४८ किमी अंतरावर नळदुर्ग आहे, नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना ४.५ किमी वर दक्षिणेकडे अणदूर कडे जाणारा रस्ता लागतो, मंदिरांची झालेली स्थलांतरे, यात्रांचे बदलेल्या जागा व अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभुमि असणारी ही भुमि इतिहासाच्या पाउल खुणा घेउन नांदत आहे…..

श्री क्षेत्र मृणमैलार (Shri Kshetra Mrinmailar)

खंडोबा कर्नाटक मध्ये मैलार या नावाने ओळखला जातो… हे गाव येथील मैलार मंदिरा साठी प्रसिद्ध असल्याने या गावास मैलार हेच नाव प्राप्त झाले आहे. या गावास मृणमैलार या नावानेही ओळखले जाते. येथील मंदिरातील मैलाराची मुर्ती माती पासुन बनवलेली आहे अशी लोक श्रद्धा आहे या मुळे मृणमैलार असेही म्हणतात. हा परिसर खंडोबा व मणि मल्ल दैत्य युद्ध भुमि आहे व याच ठिकाणी मार्तंड भैरवने मणि मल्ला चा वध केला व लिंग रूपाने वास केला येथे ऋषीमुनी नी मातीच्या मैलाराची मुर्ती बनवली तीच ही मुर्ती असल्याचे स्थानिक लोक सांगतात. मृणमैलार कर्नाटक राज्यातील बल्लारी जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या हाडगल्ली पासुन ४० किमी अंतरावर आहे. गुंतल व राष्ट्रीय महामार्ग क्रं ९ वरील राणीबेनुर येथून ३४ किमी आहे…..

श्री क्षेत्र देवरगुड्डा (Sri Kshetra Devargudda)

देवरगुड्डा हे कर्नाटकातील मधील गाव मैलार मंदिरासाठी म्हणजेच खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे या गावाचे मुळनाव गुडगुड्डापूर म्हणजेच टेकडीवरील गाव पण येथील मंदिरामुळे देवाचे टेकडी वरील गाव म्हणून देवरगुड्डा झाले… खंडोबाने ज्या मणि मल्ल राक्षसांचा वध केला त्या राक्षसांचे राजधानीचे हे गाव त्यांचे मृत्यू समयीचे विनंती वरून देवाने त्यांचे प्रेतासन करून येथे वास केला अशी जनश्रुती आहे. टेकडीवर वसलेले हे गाव सुंदर आहे देवरगुड्डा कर्नाटक राज्यात असुन राष्ट्रीय महामार्ग ९ वर धारवाड कडून बंगलोर कडे जाताना मोतीबेनुर गावाचे पुढे ९ किमी अंतरावर रस्त्याचे पुर्व बाजुस देवरगुड्डा कडे जाण्यासाठी कमान दिसते येथून ८ किमी अंतरावर देवरगुड्डा आहे राणीबेनुर – गुंतल रस्त्यावर देवरगुड्डा असल्याने या मार्गावरून ही येथे पोहचता येते…..

श्री क्षेत्र आदिमैलार (Shri Kshetra Adimailar)

आदिमैलार हे कर्नाटक मधील खंडोबाचे प्रसिद्ध क्षेत्र कर्नाटक मध्ये खंडोबा मैलार या नावाने ओळखला जातो, खंडोबा विषयक आद्य ग्रंथ ‘ मल्हारी महात्म्य ‘ याची ही जन्म भुमि या ग्रंथात शेवटी या क्षेत्राचे वर्णन करण्यात आलेले आहे… ज्या ऋषी मुळे शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला त्यांची ही तपोभूमी या मुळे या क्षेत्रास आदिमैलार म्हटले जाते आदिमैलार कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बिदर पासुन २० किमी अंतरावर आहे हे मंदिर सपाटीवर असुन गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोहचता येते. मंदिरास प्रशस्थ आवार असुन कोटाचे पुर्वद्वार भव्य आहे..

जेजुरीच्या खंडेरायाला हळद उधळण्यामागे आहे भगवान शंकराची गोड कहाणी (The sweet story of Lord Shiva behind the spreading of turmeric on the Khanderaya of Jejuri)

आपला भारत देश हा सण, उत्सवांचा आणि विविध रंगांचा देश! कोणत्याही उत्सवात हळद कुंकू हे सगळ्यात महत्वाचा भाग असतात… पूजा करताना देवाला सर्वप्रथम हळदी कुंकू वाहिले जाते. मग बाकी फुले, वस्त्रे येतात पण पहिला नंबर हळदी कुंकवाचा. पण तुम्हाला हे माहित आहे का, काही देवांना फक्त हळद वाहिली जाते. हळद कुंकवासोबत येते तेव्हा ती हळद असते पण जेव्हा उधळली जाते तेव्हा भंडारा होते…..

पिढ्यानपिढ्या आपण गाणी ऐकत आलो आहोत, वाघ्या मुरळी भंडारा उधळी… कधी जेव्हा बिरोबा, मंगोबा अशा गावातील देवांच्या पालख्या निघतात तेव्हा भंडारा उधळला जातो… त्या भंडाऱ्याचा एक विशिष्ट वास असतो तो आसमंतात दरवळून जातो…..

आदमापूर येथे बाळूमामांचा उत्सव असतो, तेव्हा अशीच भंडाऱ्याची उधळण होते… सारा आसमंत पिवळाधम्मक होऊन जातो. तसेच खंडोबाची जी जी देवस्थाने आहेत त्या सर्व ठिकाणी पालखी सोहळा होतो त्या प्रत्येक वेळी भंडारा उधळला जातो. ढोल, कैताळ वाजवतात, त्याच्या तालावर लोक नृत्य करतात. एकंदरीत उत्सव वातावरण उत्साही करून टाकतो…..

श्रद्धेने देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुजारी कपाळाला चार बोटे भंडाऱ्याची लावतातच… स्त्री पुरुष अबाल वृद्धांना हा भंडारा लावला जातो. आणि लोकही श्रद्धेने तो कपाळावर लावून घेतात…..

जेजुरीचा खंडोबा लाखो भाविकांचे आराध्य दैवत! पुण्यापासून दिड तासाच्या अंतरावर असलेलं जेजुरी हे गाव म्हणजेच खंडोबाचे अत्यंत जागृत स्थान आहे… नवलाख पायरी असलेला गड सोन्याची जेजुरी असं या जेजुरीचं वर्णन केलं आहे त्या जेजुरीत भंडारा उत्सव वर्षातून तीन वेळा साजरा होतो. या भंडारा उत्सवात संपूर्ण गडावर भंडारा उधळला जातो. त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाची छटा पसरते. अगदी आकाश सुद्धा पिवळे धम्मक होऊन जाते. ही रंग छटा अगदी सोन्यासारखी दिसते म्हणून जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हणतात…..

हा भंडारा उधळताना भाविक ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असे गर्जत असतात… मल्हार हे खंडोबाचे अजून एक नाव. मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा त्याने पराभव केला. म्हणून त्याला मल्लारी असेही म्हणतात. भंडारा उत्सव होणारे जे महत्वाचे दिवस आहेत त्यापैकी एक दिवस म्हणजे सोमवती अमावस्या. या भंडारा उत्सवात देवाची पालखी निघते आणि त्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक तिष्ठत उभे असतात. पालखीत बसून देव कऱ्हा नदीत स्नानाला जातात. या पालखीत खंडोबा, त्याची पत्नी म्हाळसा यांना बसवलेले असते. जेजुरीच्या मंदिरातून ही पालखी निघते ती थेट कऱ्हा नदीकडे नेली जाते. आणि या पालखीला खांदा देण्याचा मान केवळ रामोशी धनगर समजला आहे…..

या पालखी सोहळ्यावेळी केल्या जाणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे अवघा आसमंत पिवळा जर्द होतो… उंचावरून हे दृश्य अतिशय विहंगम असते. आपल्याकडे लग्नाच्या आदले दिवशी जो हळदी समारंभ असतो तसाच खंडोबा आणि म्हाळसा यांच्या भेटीवेळी भंडारा उधळून केला जातो. बऱ्याच जाणकारांच्या मते खंडोबा हा सूर्याचा वंशज आहे…..

हा भंडारा उधळण्याचा सोहळा वर्षातून दोन किंवा तीन वेळा होतो… सोमवती अमावस्या जी सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात त्या अमावस्येला हा सोहळा होतो तर खंडोबाचे नवरात्र झाल्यानंतर चंपाषष्ठीला….!

खंडोबा हा ९ व्या शतकात होऊन गेलेला अवतार… याला महादेवाचा अवतार असं मानलं जातं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कितीतरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा हा नवसाला पावणारा देव आहे. त्याच्या दोन पत्नी म्हाळसा आणि बाणाई या पार्वती आणि गंगेचे रूप मानले जाते…..

महाराष्ट्र, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेशातील कितीतरी कुटुंबांचा कुलस्वामी असलेला खंडोबा हा मेंढपाळ, धनगर, शेतकरी आणि अनेक अठरापगड भटक्या जातीतील लोकांचेही श्रद्धास्थान आहे… अश्वारूढ असलेल्या खंडोबाची चार भुजाधारी मूर्ती आहे. त्याच्या एका हातात भंडारा पात्र आहे आणि दुसऱ्या हातात अतिशय भव्य तलवार जिला खंडा असं म्हणतात ती आहे. उरलेल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूल आहे. त्यामुळेच त्याच्या आरतीत त्याचे वर्णन खंडामंडीत असे केलेले आहे. शंकराचा अवतार असल्यामुळे खंडोबाला बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत…..

त्याला बाजरीचा रोडगा, वांग्याची भाजी आणि पातीच्या कांद्याचा नैवेद्य दाखवला जातो… काही कुटुंबात पुरणपोळीचा नैवेद्य पण असतो. जे मांसाहारी भक्त आहेत ते खंडोबाला बोकड कापून पण नैवेद्य दाखवतात…..

खंडोबाला भंडाराच का प्रिय आहे ? (Why is Khandoba so fond of Bhandara?)

याबाबत अशी आख्यायिका आहे, एकदा रात्रीने शंकराकडे आपल्या काळ्या रंगासाठी नाराजी व्यक्त करुन आपला स्वीकार करावा अशी प्रार्थना केली… तेव्हा शंकरांनी तिला वरदान दिले की, जेव्हा मी मार्तंड भैरवाचा अवतार घेईन, तेव्हा तुला मस्तकी धारण करेन. त्या वरदानाने रात्र हळदीच्या रुपात पृथ्वीवर जन्मली आणि मणी मल्ल दैत्यांचा संहार केल्यानंतर मार्तंड भैरवाने हळद अर्थात भंडारा मस्तकी धारण केला. सर्व देवतांनी त्यावेळी भंडारा उधळून आनंद व्यक्त केला आणि याचसाठी जेजुरी येथे भंडारा म्हणून हळद उधळली जाते…..

नवविवाहित जोडप्याला खंडोबाच्या दर्शनासाठी हमखास आणले जाते… मराठीत त्याला वावरजत्रा असे म्हणतात. ज्या जोडप्याला मूल बाळ होत नसते, ते खंडोबाला मूल होण्यासाठी नवस बोलतात. आणि असं विश्वास आहे की, खंडोबाला बोललेला नवस कधीही निष्फळ होत नाही. आणि मुले झाल्यानंतर त्या मुलं बाळांना घेऊन सहकुटुंब केलेल्या खंडोबाच्या दर्शनाला कोकरजत्रा असे म्हणतात…..

ही जेजुरी हे खंडोबाचे प्रमुख पीठ मानले जाते… बाकी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि कर्नाटकात तीन ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, आणि तिथेही भाविक अशाच श्रद्धेने जातात आणि देवाच्या पायी नतमस्तक होतात…..

हे सारे पहिले की श्रद्धेला, उपासनेला जात धर्म काहीही नसते, म्हणून तर खंडोबाची अनेक मंदिरे जेजुरीच्या बरोबरीने अनेक ठिकाणी उभी आहेत… या साऱ्या परंपरा पाळत श्रद्धेचे अनंत देव्हारे लोक आजही त्याचे नांव भक्तिभावाने घेतात असेच वाटते.

Recent Post

श्री महादेवाचे रूद्र अभिषेक म्हणजे काय आणि रूद्र अभिषेक का करावे ? (Rudrabhishek Puja)

लग्नात मंगलाष्टकं का म्हणतात ? (Why are Mangalashtakam said at weddings?)

हिंदू देवी देवांच्या नैवेद्यासाठी पुरणच का नैवेद्य म्हणुन दाखवले जाते ?

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )