महाराष्ट्र चंदन कन्या योजना | Maharashtra Chandan Kanya Yojana 2022

Maharashtra Chandan Kanya Yojana, महाराष्ट्र चंदन कन्या योजना,Maharashtra Chandan Kanya Yojana in Marathi,Maharashtra Chandan Kanya Yojana Online Apply,

नमस्कार ! जय महाराष्ट्र !

महाराष्ट्र चंदन कन्या योजना :

Maharashtra Chandan Kanya Yojana – या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देत असून, त्याअंतर्गत राज्यातील मागासलेल्या भागातील मुलींना स्वावलंबी बनवून त्यांना जास्तीत जास्त शिक्षण मिळावे यासाठी प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे का की महाराष्ट्रात अश्या अनेक जागा आहे जिथे मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो, मुले शाळेत जातात पण मुलींना शाळेत पाठवले जात नाही, यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही 1 कुटुंबे आपल्या मुलींना गरीब आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत पाठवत नाहीत. अशा कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे यात जर पाहिले तर इयत्ता बारावीपर्यंत अनुदानित शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण नि:शुल्क आहे. बारावीनंतरचा खर्च अनेकांना झेपणारा नसतो. यामुळे ग्रामीण भागातील मुली बारावीनंतर शिक्षण सोडत असतात. या सर्व बाबींवर नियंत्रण मिळवित मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी योजनेच्या माध्यमातून आर्थिक अनुदान मिळणार आहे. २७ जुलैपासून योजना सुरू केली. त्यासाठी रितसर अर्ज मागविण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. सप्टेंबरपासून योजना कार्यान्वित होईल. पहिल्या टप्प्यात दोन ते तीन हजार शेतकरी योजनेसाठी नोंदणी करतील असा अंदाज आहे. १ ते १० वर्षे वयाची मुलगी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर फक्त २० चंदनाची झाडे लावायची आहे. ही झाडे १२ वर्षे सांभाळल्यावर म्हणजे १२ वर्षांत २० चंदनाची झाडे लावल्यावर मुलीचे शिक्षण तसेच लग्नासाठी एकरकमी १५ ते २० लाख रुपये संबंधित शेतकऱ्याला मिळतील. [Maharashtra Chandan Kanya Yojana]

योजने चे नावमहाराष्ट्र चंदन कन्या योजना
योजनेचा प्रकारराज्य सरकार योजना
मुख्य उद्देशमुलगी वाचवा मुलगी शिकवा
लाभार्थीग्रामीण भागातील मुली
अधिकृत वेबसाईट
योजने विषयी ठळक वैशिष्ट्य

महाराष्ट्र चंदन कन्या योजना चालू करण्याचे उद्धिष्ट :

महाराष्ट्र शासनातर्फे चंदन कन्या योजना सुरू करण्यात आली असून, [Maharashtra Chandan Kanya Yojana] या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना भविष्यात स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने, गरीब कुटुंब पालकांना त्यांच्या मुलींना शिक्षणाची जाणीव व्हावी, या उद्देशाने चंदन कन्या योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलीचे किमान वय 1 वर्ष ते 10 वर्षे असावे. पात्र उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 1 वर्षावरून 10 वर्षे ठेवण्यात आली आहे. राज्यातील मुलींना शिक्षण देण्यासाठी 1 वर्ष ते 10 वर्षे वयोगटातील ज्या कुटुंबातील मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. चंदन कन्या योजना सुरू झाली. राज्यातील मुलींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्र चंदन कन्या योजने चे फायदे आणि सुविधा :

  • मुलीच्या नावाने लागवडीसाठी कमीत कमी १०० चंदन झाडे तालुकास्तरावर रोपे मिळतील
  • मुलीचे आधार कार्ड नोंद करावे लागेल
  • लागवडीनंतर एक वर्षाने तुम्हाला जन्माचा दाखला द्यावा लागेल
  • चंदन झाडांची नोंद सातबारावर नोंद घेण्यासाठी तुम्हाला कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. त्याची मोफत नोंद होईल
  • मुलींच्या वडिलांचे आधार कार्ड द्यावे लागेल
  • झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी व  वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत परवानगी दिली जाईल
  • चंदन कन्या योजना नोंदणीसाठी सामाजिक वनीकरण विभागात तसेच कार्यालयात नोंदणी करावी लागेल
  • चंदन लागवड करणे व तोडणी करणे हे संपुर्ण कायदेशीर आहे चंदन लागवड केल्यास आपल्या शेतजमिनीच्या सातबारावरील इतर मालमत्ता हक्कात आपण लावलेल्या चंदन झाडाची नोंदणी करणे आवश्यक आहे
  • या नोंदीच्या आधारे चंदन झाड तोडणे योग्य झाल्यास वन विभागाकडून रीतसर अर्ज करून तोडणी व वाहतूक परवाना मिळवता येतो
  • नैसर्गिक संकट, आग, चोरी, नापीक याबाबत चंदन झाडांचा पिक विमा सुद्धा घेता येतो
  • ही महाराष्ट्र कृषी विभाग सामाजिक वनीकरण आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ यांची  लागवड अनुदान योजना आहेत {Maharashtra Chandan Kanya Yojana}

महाराष्ट्र चंदन कन्या योजनेसाठी [Maharashtra Chandan Kanya Yojana] आवश्यक कागदपत्र :

  • अर्जदाराचे आधार कार्ड ( वडिलांचे आधार कार्ड )
  • मुलीचे आधार कार्ड
  • जमिनीचा उतारा
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक झेरोक्स
  • मोबाईल नंबर

नमो शेतकरी सन्मान निधी योजना | महाराष्ट्र वृद्धावस्था पेंशन योजना

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )