श्री मारुती स्तोत्र आणि अंजनीसुत प्रचंड (Maruti Stotra Aani Anjanisut Prachand) with Audio

श्री मारुती स्तोत्र (Maruti Stotra) Maruti Stotra Audio | अंजनीसुत प्रचंड (Anjanisut Prachand) | Anjanisut Prachand Stotra Audio | Maruti Stotra । Hanuman Stotra । मारुती स्तोत्र । श्री मारोती स्तोत्र । पवन पुत्र हनुमान स्तोत्र । सियावर रामचंद्र की जय | पवनसुत हनुमान की जय । अंजनीपुत्र हनुमान की जय । राम, लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की । बोला बजरंगबली की जय ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

🌺 श्री मारुती स्तोत्र (Maruti Stotra) 🌺

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना

महाबली प्राणदाता, सकळां उठवी बळें
सौख्यकारी दुःखहारी दुतवैष्णव गायका

दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा|
पातालदेवताहंता,भव्यसिंदूरलेपना |३|

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला पावनापरितोषका

ध्वजांगे उचली बाहो आवेशें लोटलापुढे
काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कांपती भये |५|

ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें |६|

पुच्छते मुरडीलेमाथा किरीटीकुंडलेबरी
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा |७|

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे,महाविद्युल्लतेपरी

कोटिच्याकोटी उड्डाणें झेपावे उत्तरेकडे
मंद्राद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळे|९|

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे |१०|

अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा होत जातसे
तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे

ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें
तयासी तुळणाकैंसी ब्रह्मांडी पाहतानसे

आरक्त देखिलें डोळा ग्रासिले सूर्यमंडळा
वाढतां वाढतां वाढें भेदिले शून्यमंडळा

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां |१४|

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें

हेधरापंधराश्र्लोकी लाभलीशोभलीबरी
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकला गुणें

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासिमंडणू
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नास

॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं
मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥

सियावर रामचंद्र की जय ।
पवनसुत हनुमान की जय !
अंजनीपुत्र हनुमान की जय !
राम, लक्ष्मण जानकी,
जय बोलो हनुमान की !
बोला बजरंगबली की जय ।

🪔 अंजनीसुत प्रचंड (Anjanisut Prachand)🙏

|| अंजनीसुत प्रचंड | वज्रपुच्छ कालदंड |
|| शक्ति पाहतां वितंड | दैत्य मारिले उदंड || १ ||

|| धगधगी तसी कळा | वितंड शक्ति चंचळा |
|| चळचळीतसे लिळा | प्रचंड भीम आगळा || २ ||

|| उदंड वाढला असे | विराट धाकुटा दिसे |
|| त्यजून सूर्यमंडळा | नभांत भीम आगळा || ३ ||

|| लुलीत बाळकी लिला | गिळोनि सूर्यमंडळा |
|| बहूत पोळतां क्षणीं | थुकिलाहि तत्‍ क्षणीं || ४ ||

|| धगधगीत बूबळा | प्रत्यक्ष सूर्यमंडळा |
|| कराल काळमूख तो | रिपूकुळासि दु:ख तो || ५ ||

|| रुपें कपी अचाट हा | सुवर्ण कट्ट कासतो |
|| फिरे उदास दास तो | खळास काल भासतो || ६ ||

|| झळक झळक दामिनी | वितंड काल कामिनी |
|| तयापरी झळाझळी | लुलित रोमजावळी || ७ ||

|| समस्त प्राणनाथ रे | करी जना सनाथ रे |
|| अतूळ तूळणा नसे | अतूळशक्ति वीलसे || ८ ||

|| रुपें रसाळ बाळकू | समस्त चित्त चाळकू |
|| कपी परंतु ईश्वरू | विशेष लाधला वरू || ९ ||

|| स्वरुद्र क्षोभल्यावरी | तयासि कोण सांवरी |
|| गुणागळा परोपरी | सतेजरूप ईश्वरी || १० ||

|| समर्थ दास हा भला | कपीकुळांत शोभला |
|| सुरारिकाळ क्षोभला | त्रिकूट जिंकिला भला || ११ ||

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण || ३ ||

🙏 🌹 ॐ श्री रामदूतायै नमः 🌹 🙏

सार्थ शनिस्तोत्र आणि त्याचा अर्थ ,शनी स्तोत्र पठणाचे फायदे (Shani Stotra)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )