।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
गांडूळ खत निर्मिती – Vermicompost production
शेतकरी बंधूंनो, आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती मिळवणार आहोत. २१ व्या शतकात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत. तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पहिला तर भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येणार आहेत. गांडूळ खत हा सेंद्रिय शेती मधलाच एक घटक आहे. गांडूळ खत हे शेतकरी स्वतः तयार करू शकतात त्यामुळे पिकाच्या उत्पादन खर्चात खूप बचत होते तसेच शेताचा पोत देखील सुधारतो. त्याच बरोबर गांडूळ खत निर्मितीकडे शेतीपूरक जोडधंदा म्हणून ही पाहू शकतात. चला तर मग, गांडूळ खत निर्मितीची माहिती घेऊ.
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वत:च्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.
गांडुळाची ओळख – Identification of earthworm
मराठीमध्ये गांडूळांना दानवे, वाळे, केचवे, शिदोड अथवा भुभाग इत्यादी नावाने संबोधतात. जगामध्ये गांडूळाच्या ३३२० जाती आहेत, तर भारतामध्ये ५०९ जातीची गांडूळे आढळून येतात. गांडूळाची लांबी कमीत कमी तीन सेमी पासून जास्तीत जास्त चार मीटरपर्यंत असते. गांडूळाच्या शरीरावर समान अंतरावर खाचा असून त्यांच्या शरीराचे अनेक भाग झालेले दिसतात, त्यांना समखंड असे म्हणतात. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळांच्या पुढच्या भागातील काही समखंड फुगल्यासारखे दिसतात, या भागाला मेखला अथवा पर्यायिका असे म्हणतात. गांडूळाच्या शरीराची पोकळी पूर्ण पणे रिकामी असून ती अवरणाने आच्छादलेली असते.
गांडूळ खताचे फायदे – Benefits of vermicompost
- मातीचा सामु न्युट्रल (उदासीन) म्हणजे ७ पर्यंत आणण्यास मदत करतात.
- संतुलीत वनस्पती अन्नद्रव्यांची अधिकाधिक उपलब्धता होते. मातीची पाणी निचरा होण्याची व शोषण क्षमता बळकट होते. मातीमध्ये अधिक प्रमाणात प्राणवायु व जैविक घटकांची क्रिया निरंतर चालू रहाते.
गांडूळाची नवीन प्रजाती : जय गोपाल जय गोपाल (पोरियोनिरस सेल्पनासिक) एक विदेशी गांडूळ प्रजाती असून ती ईसीनिया फेटिडा व युड्रिलस युजीनी पेक्षा अधिक उत्पादन देणारी प्रजाती आहे. २- ४६ सेल्सीयस तापमानास सुद्धा चांगल्याप्रकारे काम करतात. या प्रजातीद्वारे तयार झालेल्या
खतामध्ये ६७% प्रोटीन आणि सर्व प्रकारचे अमिनो आसिड असतात. गांडूळ खताची गुणवत्ता चांगली असते. या जातीमध्ये इतर जातीपेक्षा प्रत्येक आठवड्यात तयार होणाऱ्या ककूनची संख्याही जास्त असते.
गांडूळांचा जीवनक्रम – Life cycle of earthworms
जात | इसिनिया फिटेडा | युड्रेलिस युजेनी |
अंडी व्यवस्था | १० ते १२ दिवस | १२ ते १५ दिवस |
पिलाची अवस्था | २ महिने | २.५ महिने |
पूर्णावस्था | क्लायटेलम तयार झाल्या वर (फुगीर टणकभाग) | क्लायटेलम तयार झाल्या वर (फुगीर टणकभाग) |
रंग | गर्द लाल | तांबूस तपकिरी |
आयुष्यमान | ३ ते ४ वर्षे | १ ते दीड वर्षे |
लांबी | ३ ते ४ इंच | ४ ते ५ इंच |
ककुण (अंडी) देण्याची क्षमता | २ ते ५ प्रति आठवडा | १ ते २ प्रति आठवडा |
प्रति ककुनमधुन बाहेर पडणारी पिले | ५ ते १० | ५ ते ६ |
प्रजनन | वर्षभर | वर्षभर |
खाद्यातील योग्य तापमान | २५ ते ३५ अंश से.ग्रे. | २५ ते ३५ अंश से.ग्रे. |
ओलाव्याचे प्रमाण | ३० ते ३५ % | ३० ते ३५ % |
विष्ठेचे प्रमाण | रेतीच्या स्वरुपात | दाणेदार गोळ्यांच्या स्वरुपात |
गांडूळांचे खाद्य – Earthworm feed
गांडूळांना खाण्याकरिता त्यांचे आवडी-निवडीचे अन्न लागते, त्यामुळे गांडूळांची वाढ व प्रजोत्पादन झपाट्याने होते. झाडांची पाने, कापलेले गवत, तण, काडी कचरा, पाला पाचोळा, भाज्यांचे टाकावू भाग, कंपोस्टखत, शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडूळांचे आवडीचे आहेत.
गांडूळाचे शत्रू – Enemies of earthworms
- गांडूळ हा प्राणी स्वतचे रक्षण स्वतः करू शकत नाही, त्यामुळे त्याचे बेडूक, पक्षी, सरडे, साप, गोम, उंदीर, मुंग्या, कोंबड्या ह्या गांडूळाच्या शत्रू आहे.
गांडूळ उत्पत्तीचे तंत्र – Earthworm breeding technique
गांडूळ खताच्या निर्मितीसाठी चांगल्या जातीच्या गांडूळाची पुरेशी संख्या शेतकन्याजवळ असणे महत्वाचे आहे. त्यासाठी गांडूळ उत्पत्तीच्या आणि त्याच्या संगोपनाच्या अनेक पध्दती आहेत.
१) टाकी किंवा लाकडी खोक्यामधून गांडूळाची व व्हॅर्मीवॉशची उत्पत्ती
प्रथम टाकीत १० किलो गांडूळ खाद्य घालून ते ओले करावे व नंतर त्यात १००० गांडूळे सोडावीत.
१००० गांडूळापासून प्रत्येक १० दिवसांनी गांडूळाची सरासरी १००० अंडी मिळतील, त्यातून १० ते १५ दिवसांनी २ ते ३ हजार गांडूळांची पिल्ले तयार होतील.
२ ते ३ महिन्यात आपणास ५ ते ७ हजार गांडूळे मिळवता येतील.
प्रत्येक १० दिवसांनी बाहेर काढून घेतलेले खाद्य ढिग पध्दतीने साठवून त्यावर पाल्याचे अच्छादन करून ते ओलसर ठेवावे.
गांडूळ तयार करण्याची टाकी उंचीवर ठेवून तळाला उतार दिल्यास गांडूळांच्या खाद्यावर फवारलेले ज्यादा पाणी तळाला जमुन तोटीमधून सहजरित्या बाहेर येते, नंतर ते गांडूळपाणी काचेच्या अथवा प्लॅस्टीकच्या बाटलीत भरून ठेवावे, यालाच आपण व्हर्मीवॉस असे म्हणतो.
२.जमिनीच्या टणक भागावर अथवा फरशीवर ५० किलो गांडूळ खाद्याचा एक फूट उंचीच ढिग करुन तो पाण्याने ओलसर करुन त्यात १००० पूर्ण वयात आलेली गांडुळे सोडावीत व दीगावर
गांडूळखत युनिट उभारणीसाठी जागेची निवड – Selection of site for setting up vermicompost unit
- गांडूळखत तयार करण्यासाठी जागेची निवड करताना जमिन पाण्याचा निचरा होणारी असावी.
- पडीक अगर पोट खराब जागेचा वापर करावा.
- युनिट शेणखत अगर काडीकचरा उपलब्ध असलेल्या जागेजवळ आसावे.
- पाण्याची व्यवस्था जवळ असावी.
- गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते त्यासाठी छप्पर किंवा शेड आपल्या आवश्यकतेनुसार बांधावे. (८ फूट उंच, १० फूट रुंद ३० ते ४० लांब)
- युनिटच्या जवळ मोठी झाडे नसावीत.
गांडूळखत उत्पादन तंत्रज्ञान – Vermicompost production technology
१) गादी वाफा पध्दतीने गांडूळखताची निर्मिती
- गांडूळाची पुरेशी पैदास झाल्यावर शेवटचा टप्पा म्हणजे गांडूळ खताची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होय. त्यासाठी गादी वाफा पध्दती योग्य आहे.
- गांडूळाचे ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी ८ फुट उंच, १० फूट रुंद व ३० ते ४० फूट लांब शेड किंवा छप्पर आवश्यक असते. (लांबी आवश्यकतेनुसार)
- शेडमध्ये शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी.
बेड थरांची माहिती (बेड कसा भरावा)
गांडूळखत करत असताना कशाचा किती थर द्यावी याची महिती असणे खूप गरजेचे असते.
१) जमिन / शेडचा ठणक पृष्टभाग
२) सावकाश कुजणारे सेंद्रिय पदार्थों २” ३” जाडीचा घर (नारळाच्या शेंड्या, पालट, तुरीच्या तुराट्या, थसकट इत्यादी)
३) कुजलेले शेणखत २” ३” जाडीचा थर
४) गांडूळे (१०,०००)
५) कुजलेले शेणखत घर
६) शेण, पालापाचोळा वगैरे १२” जाडीचा थर ७) गोणपाट
अशा पध्दतीने बेड भरल्यास २-३ महिन्यात उत्तम प्रकारे गांडूळ खत तयार होते.
खड्डा पध्दत
खड्डा पध्दतीने गांडूळखत तयार करताना खड्याचे आकारमान १ मीटर रुंद व २० सेमी खोल असावे, तसेच खड्ड्याची लांबी आवश्यकतेनुसार ठेवावी. खड्ड्याच्या तळाशी ८ ते ९. सेमी उंचीचा किंवा जाडीचा काडीकचरा पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचट यांचा थर द्यावा त्यावर पाणी मारावे. त्यानंतर त्या धरावर ८ ते ९ सेमी जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीय खत यांचा द्यावा. थर पाण्याने ओला करुन या घरावर गांडूळे सोडावीत ह्यासाठी १००० किलो सेंद्रीय पदार्थासाठी १०,००० गांडूळे सोडावीत. त्यानंतर त्यावर ५ ते ६ सेमी. जाडीचा थर कुजलेले शेणखत / सेंद्रीय पदार्थ यांचा द्यावा. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिंपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडूळाची चांगली वाढ होवून गांडूळखत तयार होईल.
गांडूळखत वेगळं करणे – Separating vermicompost
तयार झालेले गांडूळखत आणि गांडूळे वेगळे करतात उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडूळे हिंगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडूळखत वेगळे करता येईल. शक्य तो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे वापर करू नये म्हणजे गांडूळांना ईजा होणार नाही.
गांडूळखत निर्मिती करताना बेडमध्ये उपयुक्त जीवाणू मिसळून जीवाणुयुक्त गांडूळखत निर्मिती करता येते. अॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जीवाणू व ट्रायकोडर्माचा प्रामुख्याने वापर केला जातो. वरील जीवाणू प्रत्येकी १ किलो १ टन खतासाठी या प्रमाणात घेवून शेणकाला करून बेडवर टाकावे व पाणी मारावे, गांडूळखत बेड ५०% तयार झाल्यावर जीवाणू टाकावे. जीवाणूंची संख्या भरपूर प्रमाणात वाढून जीवाणुयुक्त गांडूळखत तयार होईल. अशाप्रकारे विविध पिकासाठी है। खत हेक्टरी पाच टन प्रति वर्षी वापरल्यामुळे जमिनीचा पोत सुधारेल व पीकाचे उत्पादन व दर्जा वाढेल यात शंका नाही.