‘प्लेटलेट्स म्हणजे काय ? (What Is platelet) नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ? (how to increase platelet count In Naturally)

‘प्लेटलेट्स म्हणजे काय । What Is platelet । प्लेटलेट्सची कार्ये कोणकोणती असतात । What are the functions of platelets ? । मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या किती असते । What is the number of platelets in the human body ? । प्लेटलेट्स कमी होण्याची कारणे कोणकोणती असतात । What are the causes of low platelets ? । प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यावर कोणकोणती काळजी आपण घ्यायला हवी । What care should we take when the number of platelets decreases ? । शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला काय म्हणतात । What is the condition of low number of platelets in the body called ? । how to increase platelet count In Naturally । नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

‘प्लेटलेट्स म्हणजे काय ?’ (What Is platelet) हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.

हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत. प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत. पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.

प्लेटलेट्सची कार्ये कोणकोणती असतात ?

आपल्या रक्तवाहिन्यांमधुन जे रक्त वाहत असते ते प्रवाही राहणे खुप गरजेचे असते.आँक्सिजनचे वहन हे प्रमुख कार्य रक्तातुनच होत असते.तसेच रक्त हे आपल्या मानवी शरीरातील विविध अवयवांचे पेशीस्तरावर पोषण करण्याचे काम करत असते.

जेव्हा आपणास एखादी ईजा,जखम तसेच दुखापत होते तेव्हा तेव्हा अशा परिस्थितीत रक्तवाहिन्यांमधुन रक्त अधिक जास्त वाहुन गेल्यास जिवितहानी देखील होण्याची दाट संभावना असते.

अशा परिस्थितीत जखमी जागी फायबर आणि प्लेटलेट्स एकत्र येत असतात.आणि रक्तप्रवाह खंडित करत असतात.हेच एक कारण आहे की ज्यामुळे प्लेटलेट्सला मानवी शरीराचे कवचकुंडल म्हणुन देखील संबोधिले जाते.

मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या किती असते ?

मानवी शरीरात प्लेटलेट्सची सर्वसाधारणत: मात्रा ही दीड लाख ते साडेचार लाख इतकी असते.आणि ह्याच ठिकाणी ह्या संख्येच्या प्रमाणात अधिकता निर्माण झाली तर रक्ताची गुठळी होऊन रक्तवाहिनींमधील रक्तप्रवाहास अडथळा येत असतो. आणि याचमुळे आपणास हार्ट अटँक,स्ट्रोक असे विकार जडत असतात.हात तसेच पायांमधील रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण झाल्यावर शरीराचा तो अवयव तो भाग बधीर पडुन निकामी देखील होण्याची शक्यता असते.

प्लेटलेट्स कमी होण्याची कारणे कोणकोणती असतात ?

● डेंगुचा किंवा मलेरियाचा ताप येणे
● एखादा अनुवांशिक आजार असणे
● केमोथेरपी
● अल्कोहोलचे सेवण

डेंगु तसेच मलेरियाच्या तापामध्ये प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होत असते.त्यामुळे दोन दिवस ताप आल्यावर तसेच ह्या रोगांची लक्षणे आपणास आढळुन आल्यास तत्काळ वैदयकीय सल्ला घेऊन आपले ब्लड टेस्ट करून घ्यायला हवी.

प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यावर कोणकोणती काळजी आपण घ्यायला हवी ?

● लसुन खाणे टाळावे

● अधिक कसरतीचा व्यायाम करू नये

● जास्त दगदग करून घेऊ नये

● दात घासताना ब्रश लागणार नही याची काळजी घेणे

● अँस्प्रिन,कोल्डडँगसारख्या औषधांचे सेवण करू नये

● सुरी तसेच कातरीचा वापर काळजीपुर्वक करणे

● बदधकोष्ठतेचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे.

● वैदयकीय तज्ञांचा तसेच चिकित्सकांचा सल्ला घेणे.

प्लेटलेट्स कमी झाल्यास आपल्याला त्या बाहेरून घ्याव्या लागत असतात.इतर कुठलाही उपाय यावर अजुन खात्रीशीरपणे सांगता येईल असे सिदध झालेले नहीये. प्लेटलेट्ससाठी कुठल्याही प्रकारच्या मेडिसिन औषधे देखील नसतात.पौष्टिक आहाराचे सेवन करूनच आपण प्लेटलेट्सचे प्रमाण नियंत्रणात ठेवू शकतो.

शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला काय म्हणतात ?

शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीस थ्रोम्बोसायटोपेनिया असे संबोधले जात असते. कुठल्याही निरोगी व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्सची मात्रा १५०हजार ते ४५० हजार इतके असते.पण जेव्हा हे काऊंट दीडशे हजार मायक्रोलीटर पेक्षा खाली येत असते.तेव्हा यास लो प्लेटलेट्स असे म्हटले जाते. काही विशिष्ट प्रकारच्या मेडिसिन,अनुवांशिक रोग,कर्करोग,केमोथेरपी उपचार,अल्कोहोलचे अधिक सेवण करणे अशा परिस्थितीत किंवा डेंगु मलेरिया तसेच चिकनगुनियाचा ताप आल्यावर देखील ब्लड प्लेटलेट्स कमी होत असतात.

नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा….how to increase platelet count In Naturally

१.पपई

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.

२.गुळवेल

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

३.आवळा

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन ‘सी’ प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

४.भोपळा

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन ‘ए’ ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

५.पालक

पालक व्हिटॅमिन ‘के’चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन ‘के’ योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

६.नारळ पाणी

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

७. बीट

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )