shri Ram Avatar, प्रभू श्रीराम माहिती,श्रीराम फोटो । श्री राम पुन्हा देवता बनतात….( shri Ram Avatar ) । वराह अवतार । श्री रामांनी आपल्या इच्छेविरूद्ध देहाचा त्याग कसा दिला । श्री रामाच्या पूर्वजांची वंशावळ ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
भगवान श्रीराम यांच्या संदर्भातील अनेक कथा लोकांना माहित आहेत… श्रीरामांनी आपली मुलं लव्ह-कुश आणि पत्नी सीता यांची ऋषी वाल्मीकि यांच्या आश्रमात घेतलेली भेट, अग्नी परीक्षेनंतर सीतेने आपले जीवनाचा केलेला त्याग…..
श्री राम आपल्या मुलांबरोबर अयोध्येत परत आल्यावर राजवाड्यात त्यांच्यासाठी नवीन घर बांधले… परंतु सीता माता पृथ्वीत समर्पित झाल्यांनतर श्री रामांच्या उर्वरित आयुष्याचे काय झाले हे फार थोड्यांना माहिती आहे…..
भगवान श्री राम यांचे आयुष्य कसे संपले ते वाल्मिकीच्या रामायणातून नव्हे, तर पद्म पुराणात आहे.माता सीतेला गमविल्यानंतर श्री रामाने अनेक वर्षे अयोध्येत राज्य केले… त्यांनी आपल्या मुलांना राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी तयार केले…..
एक परिपूर्ण राजा…
आपल्या कारकिर्दीत श्री रामांनी अयोध्या मधील लोकांसाठी अनेक यज्ञ केले… अयोध्यातील लोक श्री रामांना अयोध्येचा सर्वश्रेष्ठ आणि आदर्श राजा मानत होते.श्री रामाचे आयुष्य असेच सुरु असताना, एके दिवशी एक ज्ञानी ऋषी श्रीराम यांना भेटायला येतात आणि एकांतात भगवान श्री राम यांच्याशी काही महत्वाची चर्चा करण्याबाबत परवानगी मागतात. भगवान श्रीराम ऋषींचे बोलणे ऐकण्यासाठी नम्रपणे जमिनीवर बसतात. ऋषींच्या सल्ल्यानुसार श्री रामांनी आपला भाऊ लक्ष्मण यांना सांगितले की आपण दारातच रहावे आणि या महत्त्वपूर्ण संभाषणादरम्यान कोणालाही आत येऊ देऊ नये…..
दरम्यान, भगवान श्री रामांना भेटायला आलेले ऋषी दुसरे कोणी नाही तर काल देव होते… काल देव श्री रामांना याची आठवण करून देण्यासाठी आले की पृथ्वीवरील त्यांचा ‘वेळ’ आता संपला आहे आणि आता त्यांनी मूळ निवासस्थान वैकुंठात परत यावे…..
श्रीराम आणि काल देव यांच्यातील गुप्त संभाषणादरम्यान महर्षि दुर्वासाचे आगमन होते… महर्षि दुर्वास आपल्या चंचल स्वभावासाठी परिचित होते. महर्षि दुर्वासांनी लक्ष्यमना कडेश्री रामांना त्वरित भेटण्यास परवानगी मागितली…..
लक्ष्मण महर्षि दुर्वासाना परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु महर्षि दुर्वास ऐकायला तयार नसतात, यांना लक्ष्मणचा राग येतो आणि असेही म्हणतात की, जर त्यांना आत जाऊ दिले नाही, तर ते लक्ष्मणला शाप देतील… लक्ष्मणला समजत नाही की, त्याने भावाच्या आदेशाचे उल्लंघन करावे कि शाप सहन करावा ?
लक्ष्यमनाला समजले की, ही सर्व परिस्थिती त्यांना शेवटचा मार्ग दाखविण्यासाठी एक संकेत होता… ते शरयू नदीत प्रवेश करतात आणि अनंत शेष रूप धारण करतात. दुसरीकडे राम विष्णूचा राम अवतार संपवण्याची तयारी करीत असतात, तेव्हाच त्यांना लक्ष्मणबद्दल समजते. तेसुद्धा शरयू नदीत अदृश्य देवतांसोबत चालत जातात आणि अशा प्रकारे त्यांचा राम अवतार संपतो…..
श्री राम पुन्हा देवता बनतात….( shri Ram Avatar )
शरयूमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच महाविष्णू त्यांच्या मूळ रूपात दिसतात, त्याच ठिकाणी लोक आधीच एकत्र आले होते… त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला.श्री राम विष्णू आणि लक्ष्मण आदिशेष झाले. जरी बहुतेकांचा असा विश्वास आहे की,श्री रामांचा अंत असा होता, तरीही काही लोकांचे मत वेगळे आहे. पुराणात असे नमूद केले आहे की, विश्वाचे पालनहार भगवान विष्णू आपले अस्तित्व संपवू शकत नाहीत. विश्वाचे विनाशक म्हणून हे काम फक्त शिवच करु शकतात…..
वराह अवतार…
तर्किक दृष्टीकोनातून समजून घेतल्यास श्री रामांचा अंतही विष्णूच्या पहिल्या अवतारांसारखा होता… कालिका पुराणात सांगितल्याप्रमाणे,आपली कर्तव्ये पार पाडल्यानंतर, श्री विष्णूंचा वराह अवतार कौटुंबिक संबंधांच्या मोहमायात अडकला. अशावेळी वराहाने स्वत: चा जीव संपवला नाही, त्याऐवजी देवता भगवान शिव यांची मदत घेण्यासाठी कैलासकडे वळले. देवदेवतांनी विनवणी केल्यावर शिव पक्षी आणि प्राण्यांचा बनलेला एक शरभ अवतार घेतात, जे वराहशी लढाई करून विष्णूला मुक्त करतात. तशाच प्रकारे भगवान शिवांच्या शरभ अवताराने नरसिंह अवतार नष्ट झाला होता…..
श्री रामांनी आपल्या इच्छेविरूद्ध देहाचा त्याग कसा दिला…?
भगवान श्री राम हे स्वेच्छेने आपले अस्तित्व सोडून देणारे पहिले अवतार होते, कारण त्यांनी आदर्श मनुष्याचे (पुरुषोत्तम) आयुष्य जगले… त्यांना लोकांसमोर धर्माचे एक उदाहरण ठेवायचे होते. एखाद्या रहस्यमय प्राण्याच्या हाताने हिंसक मृत्यू त्याच्या अवतारांसाठी योग्य नव्हता. म्हणून त्यांनी नदीत सामील होऊन हा अवतार संपवला.
श्री रामाच्या पूर्वजांची वंशावळ
श्रीरामाच्या पूर्वजांची वंशावळ व त्याविषयीची माहिती हिंदू अध्यात्मिक साहित्य विष्णु पुराण, ब्रह्म पुराण आणि श्रीमद्भागवतम ह्यांत दिली आहे…..
०० – ब्रह्मा…
०१ – ब्रह्माचा पुत्र मरीची…
०२ – मरीचीचा पुत्र कश्यप…
०३ – कश्यपचा पुत्र विवस्वान…
०४ – विवस्वानचा पुत्र वैवस्वत मनु. (याच्याच काळात जलप्रलय झाला…)
०५ – वैवस्वत मनुचा तिसरा पुत्र इक्ष्वाकु. (याने अयोध्याला राजधानी व इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली…)
०६ – इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी…
०७ – कुक्षीचा पुत्र विकुक्षी…
०८ – विकुक्षीचा पुत्र बाण…
०९ – बाणाचा पुत्र अनरण्य…
१० – अनरण्याचा पुत्र पृथु…
११ – पृथुचा पुत्र त्रिशंकु…
१२ – त्रिशंकूचा पुत्र धुंधुमार…
१३ – धुंधुमारचा पुत्र युवनाश्व…
१४ – युवनाश्वाचा पुत्र मान्धाता…
१५ – मान्धाताचा पुत्र सुसंधी…
१६ – सुसंधीचे २: ध्रुवसंधी व प्रसेनजित…
१७ – ध्रुवसंधीचा पुत्र भरत…
१८ – भरताचा पुत्र असित…
१९ – असितचा पुत्र सगर…
२० – सगरचा पुत्र असमंज…
२१ – असमंजचा पुत्र अंशुमान…
२२ – अंशुमानचा पुत्र दिलीप…
२३ – दिलीपचा पुत्र भगीरथ. (यानेच गंगा पृथ्वीवर आणली..)
२४ – भागीरथचा पुत्र ककुत्स्थ…
२५ – ककुत्स्थचा पुत्र रघु. (अत्यंत तेजस्वी, न्यायनिपुण, पृथ्वीवरचा पहिला ज्ञात चक्रवर्ती. म्हणूनच इक्ष्वाकू कुळ हे “रघुकुळ” म्हणुन प्रसिद्ध झाले..)
२६ – रघुचा पुत्र प्रवृद्ध…
२७ – प्रवृद्धचा पुत्र शंखण…
२८ – शंखणचा पुत्र सुदर्शन…
२९ – सुदर्शनचा पुत्र अग्निवर्ण…
३० – अग्निवर्णचा पुत्र शीघ्रग…
३१ – शीघ्रगचा पुत्र मरु. (याच्या सत्तेने आताचे अरबस्तान, मारुधर, मरुस्थान किंवा मरूभूमी म्हणून ओळखले जायचे…)
३२ – मरुचा पुत्र प्रशुश्रुक…
३३ – प्रशुश्रुकचा पुत्र अम्बरीष. (राजाने कायम संन्यस्त असावे, याचा परिपाठ यांनीच घातला…)
३४ – अम्बरीषचा पुत्र नहुष. (यांच्यापासुन कुरुवंश सुरु होतो)
३५ – नहुषचा पुत्र ययाति…
३६ – ययातिचा पुत्र नाभाग…
३७ – नाभागचा पुत्र अज…
३८ – अजचा पुत्र दशरथ…
३९ – दशरथाचे चार पुत्र, राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न…..
ब्रह्माच्या ४० व्या पिढीत श्रीराम जन्मले…