अबोली लागवड । Aboli Lagwad | Aboli Sheti | अबोली लागवडीचे महत्त्व । अबोली लागवडी खालील क्षेत्र । अबोली पिकाचे उत्पादन । अबोली लागवडीस योग्य हवामान । अबोली लागवडीस योग्य जमीन । अबोली पिकाच्या उन्नत जाती । अबोली पिकाची अभिवृद्धी । अबोली पिकाची लागवड पद्धती । अबोली पिकास योग्य हंगाम । अबोली पिकास योग्य लागवडीचे अंतर । अबोली पिकास वळण । अबोली पिकास छाटणीच्या पद्धती । अबोली पिकास खत व्यवस्थापन । अबोली पिकास पाणी व्यवस्थापन ।अबोली पिकातील आंतरपिके । अबोली पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । अबोली फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।अबोली फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
अबोली लागवड । Aboli Lagwad | Aboli Sheti |
अबोलीची झाडे बहुवर्षायु असून ती झुडपासारखी वाढतात. खोडांवर अनेक फांद्या फुटून फांद्यांच्या टोकांवर फुले येतात. फुलांचा हंगाम संपल्यावर बी पक्व होऊन खाली पडते फुलांचे व्यापारी उत्पादन भाग-1 : पाठ्यपुस्तिका – 2:31
आणि त्यापासून पावसाळयात अनेक रोपे तयार होतात. अबोलीच्या फुलांना नारिंगी, पिवळ्या, गर्द नारिंगी अशा विविध छटा असून या फुलांचा आकर्षक रंग, हलकेपणा आणि टिकाऊपणा यांमुळे ही फुले अत्यंत लोकप्रिय आहेत.
अबोली लागवडीचे महत्त्व । Importance of Aboli Cultivation.
दक्षिण भारतातील फुलशेतीत अबोलीच्या फुलझाडाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अबोलीची फुले मुख्यतः वेण्या, गजरे आणि केशशृंगाराची आभूषणे बनविण्यासाठी वापरली जातात. काही ठिकाणी त्यांचा अन्य फुलांबरोबर हार बनविण्यासाठी वापर केला जातो. ही फुले सुगंधित नसली तरी त्यांचा आकर्षक रंग, हलकेपणा आणि टिकाऊपणा यांमुळे त्यांना भरपूर मागणी असते. महाराष्ट्राचा विचार केला असता कोकणात साधारणपणे प्रत्येक घराभोवती थोड्याफार प्रमाणात अबोलीच्या फुलझाडांची लागवड केलेली आढळून येते. व्यापारीदृष्ट्या अबोलीची लागवड करणे फायद्याचे आहे.
अबोलीचे उगमस्थान आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि भारत हे देश आहेत. महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील पालघर आणि वसई तालुक्यात अबोलीची लागवड आढळून येते.
अबोली लागवडी खालील क्षेत्र । अबोली पिकाचे उत्पादन । Area under Aboli cultivation. Aboli crop production.
भारतामध्ये अबोलीची लागवड आंध्र प्रदेश, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत काही प्रमाणात केली जाते. भारतात अबोलीच्या लागवडीखाली सुमारे 4,000 हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात कोकण भागात तसेच पुणे शहराच्या आसपास अबोलीची लागवड केली जाते.
अबोली लागवडीस योग्य हवामान । अबोली लागवडीस योग्य जमीन । Suitable climate for Aboli cultivation. Land suitable for Aboli cultivation.
अबोली हे उष्ण हवामानातील पीक असले तरी उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील दमट हवामानात चांगले येऊ शकते. परंतु धुके आणि कडक थंडी अथवा बर्फ पडणे या पिकास मानवत नाही. जेथे वर्षभर तापमान 30 अंश सेल्सिअस आहे अशा भागात अबोलीच्या झाडाची वाढ चांगली होते आणि उत्पादन चांगले येते. ह्या पिकासाठी पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी आणि पोयटायुक्त तांबडी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.0 ते 7.5 पर्यंत असावा. क्षार आणि चुनखडीयुक्त जमिनी अबोलीच्या लागवडीसाठी अयोग्य असतात.
अबोली पिकाच्या उन्नत जाती । Advanced varieties of Aboli crop.
फुलांच्या रंगावरून अबोलीच्या चार प्रमुख जाती आहेत.
नारिंगी :
ही फुले नारिंगी रंगाची असून आकर्षक टिकाऊ असतात.
गर्द नारिंगी :
या जातीची फुले गर्द नारिंगी रंगाची असतात. या जातीच्या झाडांना बिया धरत नाहीत.
पिवळी :
ही फुले नारिंगी-पिवळट रंगाची असून अतिशय आकर्षक दिसतात.
तांबडी :
या जातीची फुले तांबड्या रंगाची असतात. झाडे कणखर आणि सूत्रकृमी या किडीला प्रतिकारक असतात.
तामीळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर येथे अबोलीच्या दोन नवीन संकरित जाती विकसित केल्या आहेत. पहिल्या जातीची फुले ही पिवळसर-नारिंगी रंगाची असून ती जात कणखर आणि सूत्रकृमी व बुरशी यांना मोठ्या प्रमाणात प्रतिकारक आहे. दुसऱ्या संकरित जातीची फुले गर्द गुलाबी रंगाची असतात. महाराष्ट्रात मात्र नारिंगी, गर्द नारिंगी आणि पिवळ्या फुलांच्या जातीच लोकप्रिय आहेत.
अबोली पिकाची अभिवृद्धी । अबोली पिकाची लागवड पद्धती । Aboli crop growth. Cultivation method of Aboli crop.
अबोलीची अभिवृद्धी बियांपासून किंवा शेंडा छाट कलमे करून केली जाते. लागवडीसाठी गादीवाफ्यावर मे-जून महिन्यांत रोपे तयार करावीत. अबोलीच्या एक हेक्टर लागवडीसाठी सुमारे 5 ते 6 किलो बियाणे लागते. 4 ते 5 पाने असलेली रोपे शेतात लावण्यासाठी योग्य असतात. अबोलीच्या काही जातींना बिया धरत नाहीत. तसेच पर परागीकरणामुळे बियांपासून मातृवृक्षासारखी रोपे मिळत नाहीत. अशा वेळी शेंडा छाट कलमाने रोपे जून-जुलै महिन्यांत तयार करावीत. अंबोलीची लागवड, सपाट वाफ्यांत अथवा सऱ्यांवर करावी..
लागवडीसाठी जमीन 2 ते 3 वेळा नांगरून दर हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत घालून कुळवणी करावी. नंतर सपाट वाफे अथवा सऱ्यांवर रोपांची लागवड करावी.
अबोली पिकास योग्य हंगाम । अबोली पिकास योग्य लागवडीचे अंतर । Suitable season for Aboli crop. Suitable planting distance for Aboli crop.
सऱ्यांवर अबोलीच्या रोपांची लागवड करताना दोन सऱ्यांतील अंतर 60 सेंटिमीटर आणि दोन रोपांतील अंतर 30 सेंटिमीटर ठेवावे. सरीच्या एका बाजूस लागवड करावी. लागवड ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत करावी. रोपांची लागवड करण्यापूर्वी त्यांची मुळे 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बाविस्टीन या प्रमाणात मिसळून तयार केलेल्या बुरशीनाशकाच्या द्रावणात दोन मिनिटे बुडवून लावावीत. म्हणजे मर रोगामुळे रोपांचे नुकसान होणार नाही.
अबोली पिकास वळण । अबोली पिकास छाटणीच्या पद्धती । Aboli crop rotation. Aboli crop pruning methods.
दरवर्षी जून महिन्यात अबोलीच्या रोपांची छाटणी करणे आवश्यक आहे. छाटणी केल्यामुळे रोपांची उंची कमी होते आणि त्यांना भरपूर प्रमाणात जमिनीलगत फुटवे येतात. त्यामुळे फुलांचे उत्पादन वाढते. रोपांची छाटणी करताना ती उंचीच्या निम्म्या अंतरावर छाटावीत. तसेच रोगट आणि कमकुवत फांद्या मुळापासून काढून टाकाव्यात.
अबोली पिकास खत व्यवस्थापन । अबोली पिकास पाणी व्यवस्थापन । Manure Management of Aboli Crops. Aboli crop water management.
अबोली हे अनेक वर्षे वाढणारे फुलझाड असून त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी दर हेक्टरी दरवर्षी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश जमिनीतून द्यावे. स्फुरद आणि पालाश खतांची संपूर्ण मात्रा आणि एकतृतीयांश नत्र सुरुवातीला आणि उरलेल्या नत्राची मात्रा दोन समान भागांत विभागून दोन वेळा सप्टेंबर- ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत द्यावी.
अबोलीच्या पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार हिवाळयात 5 ते 7 दिवसांनी आणि उन्हाळयात 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावे. पावसाळयात रोपांजवळ पाणी साचू देऊ नये.
अबोली पिकातील आंतरपिके । Intercropping in Aboli crop.
अबोलीच्या पिकाची लागवड कमी अंतरावर केली जात असल्यामुळे अबोलीच्या पिकामध्ये आंतरपिके घेणे फायद्याचे ठरत नाही. परंतु नारळ आणि सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून अबोलीची लागवड करता येते.
अबोली पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of Aboli crop and their control.
अबोलीच्या पिकावर प्रामुख्याने मावा, खबले कीड, पांढरी माशी आणि पिठ्या ढेकूण या किडींचा उपद्रव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 17 मिलिलीटर
फोसेलॉन किंवा 12 मिलिलीटर मॅलॅथिऑन या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
अबोली पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of Aboli crop and their control.
अबोलीच्या पिकावर पडणाऱ्या प्रमुख रोगांमध्ये बुरशी आणि सूत्रकृमी यांच्यामुळे होणारी रोपांची मर हा महत्त्वाचा रोग आहे. ह्या रोगामुळे अबोलीच्या झाडाच्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात. पानगळ होते आणि मुळेही कुजतात. ही रोगट मुळे खोडासकट जमिनीतून काढून जाळून टाकावीत. रोगाची लक्षणे दिसल्यास जमिनीत बुंध्याजवळ 1% बोर्डो मिश्रण किंवा 0.3% ब्रासिकॉल या बुरशीनाशकाचे 50 मिलिलीटर द्रावण ओतावे.
सूत्रकृमींमुळे झाडाच्या मुळया विभागून टोकाकडे तंतुमुळांचे पुंजके तयार होतात. सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे अबोलीच्या झाडांची वाढ खुंटते, पाने वाकतात आणि लहान होतात. पाने लवकर पिवळी पडतात, फुलांचा आकार लहान होतो आणि फुलांचे उत्पादनही कमी होते. हळूहळू झाड मरते. सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी टेमिक (10%) किंवा दाणेदार फोरेट (10%), 25 ग्रॅम दरचौरस मीटर जागेत टाकावे. शक्यतो सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असलेल्या जमिनीत अबोलीची लागवड करू नये.
अबोली फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Aboli flowers.
अबोलीची रोपे लावल्यानंतर 4 ते 5 महिन्यांत त्यांना फुले येऊ लागतात. ही फुले वर्षभर मिळत असतात. परंतु जास्तीत जास्त उत्पादन हिवाळी हंगामात मिळते. पावसाळयात फुलांचे उत्पादन कमी असते. अबोलीची फुले तुऱ्यात येतात आणि सर्व फुले उमलण्यास 15 ते 20 दिवस लागतात. उमललेली फुले ही झाडावर 3 दिवस, तर तोडलेली फुले 2 दिवस चांगल्या प्रकारे टिकतात. अबोलीच्या पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी एक दिवसाआड दररोज सकाळी लवकर करावी. अबोलीच्या फुलांची तोडणी हे एक वेळखाऊ आणि जिकिरीचे काम आहे. फुलांचे उत्पादन दुसऱ्या वर्षापासून चांगले मिळते आणि दरहेक्टरी दरवर्षी सुमारे 3 ते 4 टन फुले मिळतात.
अबोली फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । Packaging and storage of Aboli flowers.
अबोलीची तोडलेली फुले कापडी पिशवीत किंवा पॉलिथीनच्या पिशव्यांत भरून बाजारात पाठविली जातात. काही ठिकाणी केळीच्या पानांत, 10 ग्रॅम फुलांची पाकिटे तयार करून ही पाकिटे बांबू किंवा खजुराच्या पानांच्या लहान करंड्यांतून किंवा खोक्यांतून बाजारात विक्रीसाठी पाठविली जातात. अबोलीची फुले ही वजनाने फार हलकी असतात आणि एका किलोत 15,000 ते 20,000 फुले येतात. अबोलीची फुले काढणीनंतर 2 दिवसांपर्यंत चांगली टिकतात.
सारांश ।
अबोलीच्या फुलांचा आकर्षक रंग, हलकेपणा आणि टिकाऊपणा यांमुळे वेण्या, गजरे यांसाठी अबोलीची फुले लोकप्रिय आहेत. अबोलीच्या फुलांचे नारिंगी, गर्द नारिंगी, पिवळा, तांबडा असे विविध रंग आहेत.
अबोलीची लागवड बियांपासून रोपे तयार करून किंवा छाट कलमे तयार करून केली जाते. रोपांची लागवड सरी-वरंब्यावर 30×60 सेंटिमीटर अंतरावर करावी. अबोलीच्या पिकाला दरवर्षी हेक्टरी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश
द्यावे. रोपांच्या लागवडीनंतर 4 ते 5 महिन्यांत अबोलीच्या झाडाला फुले येण्यास सुरुवात होते. अबोलीच्या पूर्ण उमललेल्या फुलांची एक दिवसाआड काढणी करावी. अबोलीची उमललेली फुले झाडावर 3 दिवस चांगली राहतात. तर तोडणी केलेली फुले दोन दिवस चांगली टिकतात. अबोलीच्या पिंकापासून हेक्टरी 3 ते 4 टन फुले मिळतात.