जाणून घ्या कण्हेर लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Kanher Lagwad Mahiti Kanher Sheti) – Kanher Farming

कण्हेर लागवड । Kanher Lagwad | Kanher Sheti | कण्हेर लागवडीचे महत्त्व । कण्हेर लागवडी खालील क्षेत्र । कण्हेर पिकाचे उत्पादन । कण्हेर लागवडीस योग्य हवामान । कण्हेर लागवडीस योग्य जमीन ।कण्हेरीच्या उन्नत जाती । कण्हेर पिकाची अभिवृद्धी । कण्हेर पिकाची लागवड पद्धती । कण्हेर पिकास वळण । कण्हेर पिकास छाटणीच्या पद्धती । कण्हेर पिकास खत व्यवस्थापन । कण्हेर पिकास पाणी व्यवस्थापन । कण्हेर पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण । कण्हेर पिकातील तणांचे नियंत्रण । कण्हेरीच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । कण्हेरीच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

कण्हेर लागवड । Kanher Lagwad | Kanher Sheti |

कण्हेरीच्या फुलझाडाला पांढऱ्या, गुलाबी आणि लाल रंगांची फुले येतात. महाराष्ट्रात कण्हेरीची व्यापारी तत्त्वावर लागवड आढळून येत नाही. परंतु ओसाड माळरानात, जंगलात, बांधाच्या अथवा रस्त्याच्या कडेने कण्हेरीची झाडे उंच वाढलेली दिसतात. कण्हेरीच्या फुलांच्या आकर्षक रंगामुळे ही फुले लोकप्रिय आहेत.

कण्हेर लागवडीचे महत्त्व । Importance of Kanher cultivation.

कण्हेरीची फुले वर्षभर उपलब्ध होतात. कण्हेरीचे झाड वर्षभर फुलत असल्यामुळे धार्मिक स्थळांच्या सभोवताली, सार्वजनिक उद्यानांत कण्हेरीच्या लागवडीस भरपूर वाव आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा फुलांची कमतरता असते आणि बाजारात उपलब्ध असलेली फुले अतिशय महाग असतात, अशा वेळी फुलांचा किरकोळ व्यवसाय करणारे व्यापारी कण्हेरीच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर विक्री करताना आढळतात. अत्यंत कमी भांडवलात घरोघरी फुलांच्या पुड्या पुरविणाऱ्या फुलारी लोकांना पैसे मिळवून देणारे कण्हेरीचे फुलपीक वरदान ठरत आहे.
कण्हेरीच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी कण्हेरीचे मूळस्थान भारत देश आहे असे मानण्यात येते. महाराष्ट्रामध्ये या फुलपिकाची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जात नाही.

कण्हेर लागवडी खालील क्षेत्र । कण्हेर पिकाचे उत्पादन । Area under Kanher cultivation. Production of Kanher crop.

महाराष्ट्रामध्ये कण्हेरीच्या लागवडीखालील क्षेत्राबाबत तसेच उत्पादनाबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. साधारणतः एका पूर्ण वाढलेल्या कण्हेरीच्या झाडापासून 3 ते 4 किलो फुलांचे उत्पादन दर दोन दिवसांनी मिळू शकते.

कण्हेर लागवडीस योग्य हवामान । कण्हेर लागवडीस योग्य जमीन । Suitable climate for Kanhar cultivation. Land suitable for Kanher cultivation.

महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिसरात कण्हेरीची लागवड फायदेशीररित्या होऊ शकते. कण्हेरीच्या पिकाला उष्ण व कोरडे हवामान अधिक मानवते. या पिकाच्या व्यापारी लागवडीसाठी हलकी ते मध्यम प्रकारची जमीन उत्तम आहे. हलक्या मुरमाड, डोंगराळ जमिनीत लागवड केल्यास झाडे लवकर खराब होतात.

कण्हेरीच्या उन्नत जाती । Advanced varieties of Kanheri.

कण्हेरीच्या स्थानिक जातींचीच लागवड सर्वत्र आढळून येते. कण्हेरीच्या एकेरी, दुहेरी आणि तिहेरी पाकळ्यांच्या पांढऱ्या, गुलाबी तसेच रक्तपर्णी रंगाच्या स्थानिक जाती लोकप्रिय आहेत.

कण्हेर पिकाची अभिवृद्धी । कण्हेर पिकाची लागवड पद्धती । Growth of Kanher crop. Cultivation method of Kanher crop.

कण्हेरीची अभिवृद्धी प्रामुख्याने फाटे कलमे लावून केली जाते. त्यासाठी जून-जुलै महिन्यांत उत्तम जातीच्या, रसदार, 15 ते 20 सेंटिमीटर लांबीच्या काड्या काढून त्या गादीवाफ्यावर लावाव्यात. गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर 2 x 1 मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. फाटे कलम गादीवाफ्यावर लावल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. फाटे कलमांना इंडॉल ब्युटिरिक अॅसिड (आय.बी.ए.) या संजीवकाचा वापर केल्यास मुळे लवकर फुटतात.
लागवडीकरिता निवडलेल्या शेताची आडवी-उभी नांगरणी करून 2-3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. लागवडीकरिता मुळ्या फुटलेली कण्हेरीची रोपे खात्रीच्या ठिकाणाहून विकत आणावीत. लागवड शक्यतो पावसाळी हंगामात करावी. लावगडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. लागवड सपाट वाफे अथवा सरी-वरंब्यावर करावी. 5.2.6 हंगाम आणि लागवडीचे अंतर
पाण्याची सोय उपलब्ध असल्यास कण्हेरीची लागवड वर्षभरात केव्हाही केली तरी चालते. परंतु पावसाळयात लागवड केलेली कलमे वातावरणातील आर्द्रतेमुळे लवकर रुजतात. कण्हेरीचे झाड झुडपासारखे 2 ते 2.5 मीटर वाढते. फांद्या उभट वाढतात. त्यामुळे 3 x 3 मीटर किंवा 4×4 मीटर अंतरावर कण्हेरीची लागवड करावी.

कण्हेर पिकास वळण । कण्हेर पिकास छाटणीच्या पद्धती । Turning of Kanher crop. Methods of pruning Kanher crops.

कण्हेरीच्या झाडाला अधिक फांद्या येण्यासाठी झाडाची छाटणी करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये जाड आकाराच्या फांद्या तोडून टाकल्यास नवीन फांद्या फुटून भरपूर फुले येतात. तसेच वाळलेल्या फांद्यासुद्धा वेळोवेळी काढून टाकाव्यात. झाडाला झुडपासारखा डौलदार आकार द्यावयाचा असेल तर 3 फुटांवरच संपूर्ण झाड छाटून टाकावे. अशा ठेंगण्या झाडांची फुले तोडण्याकरिता झाडाच्या फांद्या वाकविण्याची गरज भासत नाही.

कण्हेर पिकास खत व्यवस्थापन । कण्हेर पिकास पाणी व्यवस्थापन । Fertilizer Management for Kanher Crops. Water management for Kanher crop.

कण्हेरीच्या रोपाची लागवड करताना खड्डयात एक घमेले कुजलेले शेणखत टाकावे. त्यानंतर झाड एक वर्षाचे झाल्यानंतर दरवर्षी दर झाडाला पावसाळ्याच्या सुरुवातीला 100 ग्रॅम नत्र अधिक 100 ग्रॅम स्फुरद बांगडी पद्धतीने द्यावे. खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे. कण्हेरीच्या झाडाला उन्हाळयामध्ये 3 ते 4 दिवसांनी तर हिवाळयात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये.

कण्हेर पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important pests, diseases and their control of Kanher crop.

कण्हेरीच्या झाडावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव क्वचितच दिसून येतो. किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसल्यास योग्य कीटकनाशकांची फवारणी करून त्यांचे नियंत्रण करावे.

कण्हेर पिकातील तणांचे नियंत्रण । Control of weeds in Kanher crop.

कण्हेरीच्या पिकामध्ये खुरपणी करून तणांचा नायनाट करावा. अन्यथा पिकाची वाढ खुंटून उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. खुरपणीमुळे जमिनीचा वरचा थर हलवला जाऊन तो भुसभुशीत होतो. त्यामुळे पिकाला खेळती हवा मिळते. जमिनीतील ओलावा कायम राहतो. तणांमुळे होणारा अन्नद्रव्यांचा अपव्यय टाळला जातो आणि एकूण उत्पादनात वाढ होते.

कण्हेरीच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Kanheri flowers.

कण्हेरीची लागवड केल्यानंतर एक-दोन महिन्यांत फुले येण्यास सुरुवात होते. परंतु लागवडीनंतर 2-3 वर्षांनी फुलांचे व्यापारी उत्पादन सुरू होते. कण्हेरीची फुले काढताना फार काळजी घ्यावी लागते. कारण अनेकदा फुले तोडताना कळयांचा घोसच तोडला जातो. त्यामुळे उत्पादनात घट येते. फुलांची तोडणी सकाळीच करावी.
कण्हेरीच्या पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून दर एक दिवसाआड साधारणतः 3 ते 4 किलो फुले मिळतात. उन्हाळ्यात उत्पादन थोडे कमी मिळते.

कण्हेरीच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । Packaging and storage of Kanheri flowers.

फुलांची काढणी केल्यानंतर फुले सावलीत साठवावीत. कण्हेरीच्या पांढऱ्या, गुलाबी अथवा रक्तपर्णी रंगांच्या एकेरी, दुहेरी व तिहेरी पाकळ्या असणाऱ्या जातींची प्रतवारी करून त्या वेगवेगळ्या टोपलीत अथवा बांबूच्या करंडीत भरून बाजारपेठेत विक्रीकरिता पाठवाव्यात.

सारांश ।

कण्हेरीची झाडे बहुवर्षायु असल्यामुळे आणि फुले वर्षभर मिळत असल्यामुळे कण्हेरीच्या लागवडीस भरपूर वाव आहे. कण्हेरीची लागवड फाटे कलमे लावून केली जाते. फुलांचे उत्पादन वाढविण्यासाठी कण्हेरीच्या झाडांची छाटणी करणे आवश्यक असते. लागवडीनंतर 2-3 वर्षांनी कण्हेरीच्या फुलांचे व्यापारी उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. कण्हेरीच्या एका झाडापासून एक दिवसाआड 3 ते 4 किलो फुले मिळतात.

जाणून घ्या मोगरावर्गीय पिकाची लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Mogravargiy Lagwad Mahiti Mogravargiy Sheti) – Mogravargiy Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )