संत ज्ञानेश्वरांनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरातच संजीवन समाधी का घेतली ? (Why did Sant Dnyaneshwar take sanjeevan samadhi in Siddheshwar temple of Alandi ?)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

देवाची आळंदी – Devachi Alandi

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे… संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे…..

आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे… संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७० (की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते…..

आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते… या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात…..

चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते… त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे…..

आळंदीचे महत्त्व कथन करणारी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रत्येकी दोन माहात्म्ये आहेत… मात्र, ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही…..

स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे… १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते…..

‘अलका माहात्म्य’ नावाचे दुसरे हस्तलिखितही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहे… यामध्ये ४६ पाने असून संतकवी बालमुकुंद केसरी या ग्रंथाचे लेखक आहेत. एकूण श्लोकसंख्या १३३ असून यामध्ये आळंदीचा उल्लेख आनंदवन- अलकावति- अलका या नावाने आहे. तर, इंद्रायणी नदीचा ‘कौबेरास्य महानदी’ म्हणजे कुबेरगंगा असा उल्लेख आहे. हे संतकवी १६ व्या शतकातील असावेत…..

‘ज्ञानलीलामृत’ हा कवी सदाशिव यांनी आळंदी माहात्म्य कथन करणारा मराठी ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे… हे हस्तलिखित आळंदीकरांनी ‘बापरखुमादेवीवरू’ मासिकाकडे प्रसिद्धीसाठी दिले होते. त्यातील बराचसा भाग मासिकातून क्रमश: प्रसिद्धही झाला होता. मात्र तो ग्रंथरूपात आलेला नाही. या ग्रंथाचे संक्षिप्‍त रूपांतर चित्रशाळा प्रेसने नोव्हेंबर १९६५ मध्ये प्रसिद्ध केले होते…..

एकोणीसाव्या शतकाच्या दुसर्‍या दशकात कीर्तनकार सदानंदबुवा कुलकर्णी यांनी ‘आमची आळंदी’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता… यामध्ये १८ अध्याय असून सुमारे दोनशे ओव्यांचा समावेश आहे. हे हस्तलिखित इरिना ग्लुश्कोव्हा यांनी पाहिले होते. या ग्रंथाची हाताने लिहिलेली नकल प्रत डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या संग्रहातून मराठी हस्तलिखित केंद्राकडे आली आहे…

संत ज्ञानेश्वरांनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरातच संजीवन समाधी का घेतली ? (Why did Saint Dnyaneshwar take sanjeevan samadhi in Siddheshwar temple of Alandi ?)

माऊलींनी समाधी घेण्यासाठी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराचीच निवड केली त्या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का….?

दिवाळी आटोपली की कार्तिक महिन्यात वारकऱ्यांना आळंदीचे वेध लागतात… संत ज्ञानेश्वरांनी याच महिन्यात आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली होती. सध्या संपूर्ण आळंदीमध्ये विठूनामाचा गजर ऐकू येत असून ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषानं अलंकापुरी दुमदुमली आहे…..

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या निमित्तानं चैतन्य कबीर महाराज यांनी आळंदीचे महत्त्व सांगितले आहे… कबीर महाराज म्हणतात, ‘ज्ञानेश्वर माऊली यांनी ||जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात || असे म्हणून या विश्वातल्या सर्व प्राणीमात्रांच्यासाठी त्यांना जे जे हवं तेथे मिळो अशी देवाकडे प्रार्थना करून पसायदान म्हटले होते. अशा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी येथे सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात माऊलींनी संजीवन समाधी घेतली. माऊलींनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरातच समाधी घेण्याचंही खास कारण आहे…..

काय आहे इतिहास..?

सिद्धेश्वर मंदिराचे पौरोहित्य ज्ञानेश्वर माऊलींची आई म्हणजेच रुक्मिणी देवी यांचे वडील हे करत होते… त्यांची आणि विठ्ठल पंतांची भेट याच मंदिरात झाली. आणि येथेच रुक्मिणी देवी आणि विठ्ठल पंतांचा विवाह देखील झाला. विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यास्त आश्रमात प्रवेश केला होता तेव्हा रुक्मिणीदेवींनी या मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजेच अजाण वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या.

विठ्ठलपंत पुन्हा गृहस्थाश्रमात आले… त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई अशी चार मुलं झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी याच मंदिराच्या प्रांगणात सर्व संतांच्या सक्षीनं इथं समाधी घेतली. ही समाधी घेण्यापूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या भावंडासोबत आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते, ‘ असेही कबीर महाराज यांनी स्पष्ट केले.

संत ज्ञानेश्वरांना भगवंताने म्हणजेच विठ्ठलानं माझी कार्तिकीची एकादशी साजरी केली जाते तसेच तुझी देखील कार्तिक कृष्ण एकादशी साजरी केली जाईल असा आशीर्वाद दिला होता… ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संत आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये आळंदीमधील सिद्धेश्वर मंदिरात समाधी घेतली. संत नामदेव यांनी या संजीवन समाधीचे वर्णन केले आहे… नामदेव लिहितात. उठवला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवरची || म्हणजेच, मंदिराचा नंदी आहे जागेवरून हलवला आणि तिथून संजीवनी समाधीच्या विवराचे मुख उघडले. आजही श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपल्या आशीर्वाद देतात. आपल्या मनोकामना पूर्ण करतात असा भाविकांचा विश्वास आहे…..

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य – The Secret of Mauli’s Sanjivan Samadhi

१९७२ चा काळ अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांचा सुकाळ होता… त्या वेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधी वर. संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली. त्यावेळी झालेली सविस्तर घटना, थोर शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितली ती अशी…..

त्यावेळी वारकरी सांप्रदायाची थोर व्यक्ती ह.भ.प मामासाहेब दांडेकर हे होते… त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला. आळंदीची समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मुलन चे लोक येत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, जर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली, तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या शरीरातील हाडे तरी सापडतील. मामासाहेबांसमोर खुप मोठा प्रश्न पडला होता… यांना रोखायचे कसे, त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले, माऊली पाहुन घेतील. दुसरा दिवस उजाडला. सकाळीच दोन अडिचशे माणसांचा ट्रक पुण्याहुन आळंदीला जाणार आहे, असे समजल्यावर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहचले होते…

शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतले होते… त्यातला एक होता गीगरम्यूलर काऊंटर, त्यात एक्सरे अल्फा, गॅमा, बीटा नावाचे जे किरण किंवा उर्जा असते, ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढु शकतो. ते मीटरवर दाखवले जाते. त्याला गीगरम्यूलर स्किंटीलेशन काऊंटर असे नाव आहे. तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पासून सहा फुट अंतरावर ठेवला. दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात… तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फारेड आहेत की नाही हे पहाता येते. तो ही मीटर समाधी जवळ ठेवला. तिसरा फ्रिक्केन्सी मीटर रडार हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला. तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डाॅक्टर, दोन तीन इंग्लीश माणसे, घोषणा देतच मंदिरा पर्यंत पोहचली… सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणी सांगितले, समाधी बद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा. आणी मग तुमचे काम करा. तो पर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेष्टणे आणली होती. एक जस्ताचे, एक पितळेचे आणी एक लोखंडाचे. शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले, या ठिकाणी तीन मीटर्सही ठेवले आहेत. समाधी वर एकेक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहावयाचे आहे. तुम्ही पहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही, बाहेर थांबू…..

त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली… त्यांना गाभा-यात घेतले आणी त्यांना माहिती देवुन मामा व शुक्ल साहेब गाभाऱ्याबाहेर निघुन आले. आम्ही सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला. लोखंडी, पितळी, जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रिडींग मीटर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्नच नाही. त्या लोकांपैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते, मग काटा रिडींग का दाखवीत आहे. रिडींग दाखविणारे चैतन्य स्फुरण स्पंदने कोठून येत आहेत, असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांना पडला. यामध्ये कसलाच जादुटोणा हातचलाखी नव्हती, हे त्यांच्या लक्षात आले… शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले संजीवन समाधी म्हणजे काय?

हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या ठिकाणी निश्चित पणे चैतन्य आहे… उर्जा आहे, स्पंदने आहेत. म्हणूनच त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. चैतन्य दिसत नसले, तरी त्याचे अस्तित्व असते. क्ष किरण दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच. त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दुर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधीच्या दर्शनाला येवु लागली. तीन परदेशी नागरिकांपैकी एकाने स्वत:ला आळंदीला वाहुन घेतले. पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही…..

वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु ह.भ.प मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन सांगताना म्हणाले, एखाद्या साधु संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तो पंचमहाभूतात्मक होतो… शरीर पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते. निर्देही होते याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायु हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रम्हांडातील पृथ्वी आप तेज वायु आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधी च्या जागी काहीही शिल्लक रहात नाही. त्या ठिकाणी शिल्लक रहाते, त्यांचे आत्मरूप चैतन्य उर्जा आणी स्पंदने , हे ऐकून तर किती गंभीर चुकी आपण करीत होतो याची जाणीव या सर्वांना झाली…..

ज्ञानेश्वर महाराजांच्या जय घोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला होता…..

संजीवन समाधी – Sanjivan Samadhi

संजीवन समाधी हा हिंदू धर्मातील देहत्यागाचा एक प्रकार आहे. ही प्राचीन प्रथा आहे, ज्यात स्वेच्छेने खोल ध्यानाच्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर नश्वर शरीराचा त्याग केला जातो. जिवंत समाधी आणि संजीवन समाधी या भिन्न संकल्पना आहेत…
आळंदी येथे ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली होती… संजीवन समाधीची स्थिती अत्यंत कमी योग्यांना साधता येते. संत ज्ञानेश्वर हे संजीवन समाधीचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहेत.

अद्वैत वेदांतानुसार, संजीवन समाधीमध्ये योगी त्याच्या केवळ चित्ताचाच पंचमहाभूतात विलय करीत नाही, तर त्याच्याबरोबर तो जीवनाचा म्हणजे प्राणाचा पंचमहाभूतांमध्ये विलय करतो… समाधीस्थितीत चित्तवृत्तीचा केवळ निरोध होत नाही, तर शेवटी चित्ताचा पंचमहाभूतात विलय होतो. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याचे ठरवल्यानंतर समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली होती…. संजीवन समाधीबद्दल, ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधांबद्दल सांगितले आहे…..

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या १३ व्या दिवशी, आळंदी येथे, ज्ञानेश्वर, तेव्हा एकवीस वर्षांचे असताना, त्यांनी संजीवन समाधीत प्रवेश केला… त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे. त्यांच्या निधनानंतर नामदेव व इतर उपस्थितांनी शोक व्यक्त केला. परंपरेनुसार असे मानले जाते की, नामदेवांनी विठोबाकडे ज्ञानेश्वरांना परत आणण्यासाठी प्रार्थना केली… त्यानुसार नामदेवांना भेटण्यासाठी ज्ञानेश्वरांना पुन्हा जिवंत करण्यात आले. डॅलमायर लिहितात की, “हे खऱ्या मैत्रीचे अमरत्व तसेच, उदात्त आणि प्रेमळ ह्रदयांच्या सहवासाची साक्ष देते…..”

अनेक वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की, ज्ञानेश्वर अजूनही जूनही जिवंत आहेत….

संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज देहू (Dehu)


Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )