नर्मदा परिक्रमा (Narmada Parikrama)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा भारत भूमीमध्ये नर्मदेपेक्षाही आकाराने व लांबीने मोठ्या नद्या असल्या तरी नर्मदेचे प्राचीनत्व आणि पुण्यप्रद असे श्रेष्ठत्व अनन्यसाधारण असल्यामुळे परिक्रमा ही केवळ नर्मदेचीच केली जाते. नर्मदा परिक्रमेचे आद्यप्रवर्तक म्हणजे सप्तचिरंजीवांपैकी एक असे श्रीमार्कण्डेय मुनी, ज्यांनी सुमारे सात हजार वर्षांपूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या वेळी त्यांनी केवळ नर्मदेचेच नव्हे तर तिला मिळणाऱ्या नऊशे नव्व्याणव (९९९) नद्यांचेही पात्र ओलांडले नाही, तर त्यांच्याही उगमस्थानांना वळसा घालून त्यांनी ही महापरिक्रमा सुमारे २७ वर्षांमध्ये पूर्ण केली. सप्तचिरंजीवांपैकी अश्वत्थामा तसेच श्रीमारुतीरायांचाही नर्मदा किनारी असतो अशी श्रद्धा आहे. आद्य श्रीशंकराचार्यांनी तर गुरूच्या शोधात गंगेकडे प्रस्थान केले होते पण नर्मदा हीच त्यांची तपोभूमी ठरली. संन्यासीधर्मानुसार नर्मदेच्या तटाने अविरत परिभ्रमण करत असतानाच त्यांनी ओंकारेश्वर पर्वतातील जी गुहा तपश्चर्येसाठी निश्चित केली तेथे त्यांचे गुरू आचार्य गोविंद भगवत्पाद यती हे त्यांची प्रतिक्षा करत होते. पुढे ज्या वेळी नर्मदेला पूर आला व गुहेत पाणी येऊ लागले तेव्हा तिला शांत करण्यासाठी श्रीशंकराचार्यांनी नर्मदाष्टकाची रचना केली. अमरकंटक हे तर माता पार्वतीचे आवडते स्थान असून भगवान शंकर आपल्या परिवारासह येथे वास्तव्य करतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच जेव्हा आपण नर्मदेची परिक्रमा करतो तेव्हा तिच्यासह शिवपार्वतीची परिक्रमाही संपन्न होते. अशी ही पतितपावनी नर्मदामैय्या सर्वथैव कल्याणकारी व मोक्षदायिनी असल्यामुळे नर्मदा नदीची साक्षात देवीच्या स्वरूपात पूजा (कन्यापूजन), आराधना (आरती व नर्मदाष्टक पठण) व परिक्रमेच्या माध्यमातून उपासना केली जाते. रुद्र परिक्रमा, जलहारी परिक्रमा आणि हनुमान परिक्रमा अशी तीन प्रकारे नर्मदेची परिक्रमा केली जात असली तरी बहुतांशी लोक रुद्रपरिक्रमाच करतात. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून आषाढ शुक्ल दशमी ह्या दरम्यान परिक्रमा केली जाते. आषाढ शुक्ल एकादशी (आषाढी एकादशी) पासून

कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मासात परिक्रमा करता येत नाही. जो साधक श्रध्देने व निष्ठेने परिक्रमा करतो त्याला त्याच्या योग्यतेनुसार प्रचिती येत असते. विशेषकरून परिक्रमेत मैय्या आपली मुलाप्रमाणे पालन करते, काळजी घेते अशा प्रकारचा अनुभव बहुतेक साधकांना येतो. परिक्रमेत कधी कधी आपत्प्रसंग येतात, कधी मार्ग चुकतो अशा वेळी ‘नर्मदे हर’ असा जप करताच कोणत्या ना कोणत्या रूपाने ती धावून येते अशी धारणा आहे.
नर्मदा परिक्रमा म्हणजे लौकिक तथा पारलौकिक जीवन जगण्याची कला शिकवणारे पारमार्थिक विद्यापीठच म्हणता येईल. ज्याप्रमाणे गंगेच्या सान्निध्यात गेल्यानंतर मनामधील पापपुण्यांच्या संकल्पना मुळापासून नष्ट होणे अपेक्षित आहे तसे नर्मदेच्या आसक्तीविरहित होणे अपेक्षित आहे. जसे की, कितीही कंगोरे असलेला दगड नर्मदेच्या प्रवाहात वाहत वाहत गुळगुळीत असा नर्मदेश्वर बनून पूजला जातो तसे परिक्रमा केल्यानंतर साधकाचे मोह, माया, लोभ हे कंगोरे बोथट होणे अपेक्षित आहे. परिक्रमेबाबत वस्तुनिष्ठ माहिती सहजपणे उपलब्ध होत नसल्यामुळे परिक्रमा खडतर आहे असा एक समज आहे. त्यामुळे परिक्रमेची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना संदेह होतो – ‘परिक्रमा करावी का न करावी.? ́ तथापि, परिक्रमेचा मूळ हेतू लक्षात घेऊन नर्मदामैय्याचे माहात्म्य उमजले तर ह्या प्रश्नाची उकल सोपी होते. अगदी काटेकोर कागदावर रेखाटलेली परिक्रमा करण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा एक ढोबळ आराखडा करून पुढील मार्गक्रमण नर्मदामैय्याच्या इच्छेनुसार होऊ द्यावे. परिक्रमेचा प्रारंभ अमरकंटक, नेमावर व ओंकारेश्वर ह्यांपैकी कुठूनही करता येतो. पण बहुतेक जण ओंकारेश्वरहून परिक्रमा सुरू करतात कारण ओंकारेश्वरला सांगता करणे सोपे ठरते. प्रथम क्षौर व स्नानादी संकल्पोक्त नर्मदापूजन करून व कन्यापूजन केले जाते. नंतर परिक्रमा आरंभ करण्यापूर्वी आवश्यक ते प्रमाणपत्र घेतले जाते. (जोड गणपती मंदिरामधील महंत परिक्रमेसाठी प्रमाणपत्र देतात, त्यासाठी दोन फोटो व आधारकार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे.) गाडीने परिक्रमा करणार असाल तर साधारणतः दीडशे ते दोनशे च किलोमीटरचे टप्पे घेणे योग्य ठरते.

परिक्रमा करताना क्रमशः बाजीराव पेशव्यांची समाधी रावेरखेडी करून पुढे तेली भट्टयाण येथील ११० वर्षांचे सियारामबाबा यांचा आशीर्वाद घ्यावा. गाडीने परिक्रमा करत असाल तर पहिल्या दिवशी तेली भट्ट्याणला मुक्काम करता येईल. नंतर साधारण २० किलोमीटरवर एखादा आश्रम असतोच. शालिवाहन, प्रकाशा करून शुलपाणेश्वराचे दर्शन घ्यावे. पुढे कुंभेश्वर व पोइचा येथे स्वामी नारायण मंदिर आहे. भालोद येथे अवश्य मुक्काम करता येईल. विमलेश्वरला पोहोचण्यापूर्वी हनुमान टेकरी येईल. येथील अन्नक्षेत्रामध्ये अवश्य प्रसाद घ्यावा. कारण विमलेश्वरला समुद्र पार करताना भरती-ओहोटीच्या वेळापत्रकानुसार किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. नंतर नावेतून उत्तर तटावर गेल्यानंतर भडभूत, नारेश्वर, चांदोद, तिलकवाडा ही ठिकाणे आहेत. तिलकवाडा येथे रामदासस्वामी स्थापित हनुमंत आहे. तसेच वासुदेव कुटीर आश्रम आहे. तेथे टेंबेस्वामींची मूर्ती आहे. येथे मुक्काम करता येईल. पुढे गरुडेश्वर लागते जेथे टेंबेस्वामींची समाधी आहे. नंतर कुबेर भंडारी, डोंगरे महाराजांचा मठ, मांडवगडचा किल्ला आहे. नंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी असलेले महेश्वर लागते. येथील नर्मदाघाट अप्रतिम आहे. सप्तमातृका मंदिर आहे. पुढे नेमावरला चिन्मय धाम येथे मुक्काम करता येईल. नंतर बुधनी, राजपुरा व नंतर अनघोरा हे गाव लागते. तेथून ब्रह्मांड घाट (बर्मान घाट) पुढे जबलपूर. या सर्व ठिकाणी मुक्कामाची व भोजनाची सोय आहे. पुढे जोगी टिकरिया लागते. इथे नर्मदामाईचे पात्र उल्लंघन होऊ शकते त्यामुळे सावध असावे. अगदी किनाऱ्यालगतच शाळा आहे जेथे मुक्कामाची सोय आहे. पुढे नर्मदामैय्याचे उद्गमस्थान, अमरकंटक लागते. इथे प्रथम उत्तर तटावरील सर्व स्थानांचे दर्शन घेऊनच पलीकडे माईच्या बगियात जावे. कारण एकदा का तुम्ही दक्षिण तटावर गेलात की पुन्हा उत्तर तटावर येता येत नाही. जवळच शोन (सोनभद्र) नदीचे उगम स्थान आहे. अमरकंटक येथे मृत्युंजय आश्रमात मुक्कामाची सोय होऊ शकते. दक्षिण तटावर परिक्रमा करताना आश्रम दूर अंतरावर आहेत. कारोपानी जंगलात चरकुटिया आश्रम असून येथे अन्नक्षेत्र आहे. पुढे डिंडौरी, मंडला येथेही आश्रम आहेत.

नरसिंहपूर नंतर एका ढाब्यावर भोजनाची • व्यवस्था होऊ शकते. पुढे पिपरिया नर्मदापूर (होशंगाबाद) च्या पुढे गेल्यानंतर कोकसरला गौरी-शंकर महाराजांची समाधी आहे. हरदा – या गावाजवळ लछोरा येथे आश्रम आहे. पुढे सिंगाजी महाराज करून ओंकारेश्वर येथे आल्यानंतर परिक्रमा संपन्न होईल. व परिक्रमेतील आचारसंहिता – परिक्रमा आरंभ करण्यापूर्वी संकल्प करावा. नर्मदापूजन करून ‘माईची कढाई’ अर्थात शिरा – हलवा असा प्रसाद दाखवून कन्या, साधू-सत्पुरुषांना तसेच अतिथींना द्यावा. शक्य असेल तर यथाशक्ती भोजन प्रदान करावे. दररोज नर्मदास्नान करावे. नंतर संध्यावंदन व नित्यपाठ करून नर्मदेचे पूजन करावे. पूजेमध्ये प्रतिकात्मकरित्या सोबत आधारासाठी घेतलेली काठी नर्मदाजलाची कुपी ठेवतात. परिक्रमेत चालताना सदैव ‘नर्मदे हर’ चा जप किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण करावे. प्रदक्षिणा कालावधीत दान घेऊ नये. तथापि, श्रध्देने कोणी भोजन देऊ इच्छित असेल तर अवश्य स्वीकार करावा. आदरातिथ्याचा स्वीकार करणे हा तीर्थयात्रीचा आद्यधर्म असतो. सदावर्तात शिधा दिला जातो. तो घेऊन आपण अन्न शिजवू शकतो. व्यर्थ वादविवाद, परनिंदा, चहाडी करू नये. वाणीवर संयम असावा. सदैव सत्यवचनी असावे. कायिक (शरीराद्वारे केले जाणारे) व मानसिक (मनाद्वारे केले जाणारे) तपाचा अंगीकार करावा. शौच, मार्जन, देव-द्विज-गुरू यांचे पूजन तसेच ब्रह्मचर्य व अहिंसा पालन यांचा अंतर्भाव कायिक तपामध्ये होतो; मौन, परानिष्टचिंतन न करणे, परद्वेष न करणे यांचा समावेश मानसिक तपामध्ये होतो. नर्मदेचे पात्र ओलांडू नये. तथापि, नर्मदेला मिळणारी एखादी नदी जर मध्ये येत असेल तर ती एकदाच ओलांडावी. चातुर्मासात परिक्रमा करू नये. केस कापू नयेत तसेच अगदी आवश्यक असेल तरच नखे कापावीत. नर्मदास्नान करताना साबणाचा प्रयोग टाळावा. परिक्रमा संपन्न झाल्यानंतर मुंडणादी कर्म करून विधिवत स्नान करावे. भगवान शंकराची अभिषेकपूर्वक पूजा करावी. तसेच पुनःश्च उत्साहपूर्वक व आपल्या सामर्थ्यानुसार नर्मदामैय्याची कढाई व कन्यापूजन करावे. कन्या, ब्राह्मण, साधू व अतिथी यांना यथाशक्ती भोजन देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा व संकल्पपूर्ती करावी.

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पश्चिमेकडे वाहत असताना ‘रामपुरा ते तिलकवाडा (गुजरात)’ ह्या दरम्यान ती उत्तरवाहिनी होते नंतर पुनःश्च पश्चिमेकडे वाहू लागते. जो कोणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदेची परिक्रमा करतो, त्यास संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते असा उल्लेख पुराणग्रंथांमध्ये आलेला आहे. त्यामुळे ज्यांना संपूर्ण परिक्रमा सर्वथैव अशक्य आहे असे भाविक उत्तरवाहिनी-नर्मदाप्रदक्षिणा करतात. उपसंहार नद्यांना ‘लोकमाता’ ही संज्ञा आहे. नदीचे नाव कोणतेही असले तरी ग्रामवासी तिला गंगाच म्हणतात. पूर्वीच्या काळी जेव्हा पायी यात्रा केली जाई तेव्हा आयुष्यात एकदा तरी गंगास्नान घडावे अशी मनीषा असे. पूर्वायुष्यात किंवा उत्तर आयुष्यात गंगास्नान करून आलेली व्यक्ती आपल्या नजीकच्या नदीलाच गंगा मानून भजत असे. त्यामुळे एखाद्याचे नदीवर प्रेम आहे, श्रद्धा आहे कशावरून लक्षात घ्यायचे. तर गंगा तसेच नर्मदा यांना तो ‘मैय्या’ म्हणून पुकारतोच पण त्याच्या गावातील नदी पाहताच मी ‘हर हर गंगे’ किंवा ‘नर्मदे हर’ चा जयघोष करतो. किंबहुना कोणत्याही वाहणाऱ्या जलप्रवाहामध्ये गंगा-यमुना-नर्मदा दिसतात. त्याच्या गावातील नदी तो स्वच्छ ठेवतो. पर्वकाळी तिच्या काठी स्नान करतो, आरती करतो. तिचा जलप्रवाह निर्मल ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. निदान स्वतःकडून तरी कोणताही वाहता जलप्रवाह दूषित होणार नाही याची काळजी घेतो. कारण कोणताही जलप्रवाह नदीच्या ओढीने वाहत जात असतो आणि नदी सागराच्या ओढीने वाहत जात असते. म्हणूनच सागरास ‘सरित्पती’ अर्थात ‘सरितांचा पती’ अशी संज्ञा आहे. तात्पर्य, नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने आपल्या लोकमातांचे अर्थात नद्यांचे माहात्म्य लक्षात घेऊन किमान आपल्याकडून तरी नदी प्रदूषित होणार नाही असा संकल्प प्रत्येकाने कैला तरी एका अर्थाने परिक्रमेचा हेतू सार्थ झाला असे म्हणता येईल.

नर्मदेच्या काठावरील तीर्थक्षेत्रे :

नर्मदेच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे असली तरी काही प्रमुख तीर्थक्षेत्रांची यादी येथे आहे. अमरकंटक, मंडला (येथेच राजा सहस्रबाहूने नर्मदा थांबवली होती), भेडा-घाट, होशंगाबाद (येथे प्राचीन नर्मदापूर शहर होते), नेमावर, ओंकारेश्वर, मंडलेश्वर, महेश्वर, शुक्लेश्वर, बावन गजा, शूलपाणी, गरुडेश्वर, शुक्रतीर्थ, कर्णेश्वर, अंनली, ओंकारेश्वर. , चांदोड, शुकेश्वर, व्यासतीर्थ, अनसूयामाई तप स्थळ, कांजेठा शकुंतला पुत्र भारत स्थळ, सीनोर, अंगारेश्वर, धायडी कुंड आणि शेवटी भृगु-कच्छ किंवा भृगु-तीर्थ (भदुच) आणि विमलेश्वर महादेव तीर्थ.

परिक्रमा करण्याचे सामान्य नियम :

  • रोज नर्मदाजीमध्ये स्नान करावे. अल्पोपहारासाठी फक्त रेवा पाणी प्या.
  • प्रदक्षिणा दरम्यान देणगी स्वीकारू नका. कृपया एखाद्याला भक्तिभावाने पाठवा कारण पाहुणचार स्वीकारणे हे यात्रेकरूचे कर्तव्य आहे. त्यागी संत अन्नही खातात नाही तर अमृत मानल्या जाणाऱ्या परमार्थ देतात.
  • अनावश्यक वादविवाद, टीका किंवा टीका करू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. नेहमी सत्यवादी रहा.
  • नेहमी शारीरिक तपश्चर्या करा – देव, द्विज, गुरु, प्रज्ञा, शौच, मर्जनम यांची पूजा करा. ब्रह्मचर्य, अहिंसा आणि शरीरासाठी तपश्चर्या उदात्त आहे.
  • मनः प्रसाद: सौम्य त्वं मौनमात्मा विनिग्रह. भव संशुद्धिर्तेतत् मानस तप उच्यते । , (गीता 17वा अध्याय) श्रीमद्वगवत गीतेची त्रिविध तपश्चर्या प्रत्येक मानवाने आयुष्यभर अंगीकारली पाहिजे. त्यामुळे परिक्रमावासीयांनी दररोज गीता, रामायण आदींचे पठण करत राहणे उचित आहे.
  • परिक्रमा सुरू करण्यापूर्वी नर्मदाजीमध्ये संकल्प घ्यावा. आईच्या कढईसारखा म्हणजे हलव्यासारखा प्रसाद बनवा आणि तुमच्या क्षमतेनुसार मुलींना, ऋषींना आणि पाहुण्यांना पाठवा.
  • नर्मदा तीरापासून दक्षिणेकडील प्रदक्षिणा 5 मैलांपेक्षा जास्त आणि उत्तर तीराची परिक्रमा साडेसात मैलांपेक्षा जास्त करू नये.
  • नर्मदा नदी कुठेही ओलांडू नका. ज्या ठिकाणी नर्मदा नदीत बेटे आहेत त्या ठिकाणी जाऊ नका, परंतु नर्मदा नदीला मिळणाऱ्या उपनद्या ओलांडणे आवश्यक असल्यास एकदाच ओलांडावे.
  • चातुर्मासात परिक्रमा करू नये. देवशयनी आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत सर्व गृहस्थ चातुर्मास पाळतात. मासातमासे वैपक्षाबाबत सांगायचे तर चार पक्षांतील संन्यासी यती अनेकदा असे करतात. नर्मदा प्रदक्षिणा येथील रहिवासीही दसऱ्यापासून विजयादशीपर्यंत तीन महिने करतात. त्यावेळी आपल्या क्षमतेनुसार आईची भरतकाम करा. काहीजण सुरुवातीला हे करण्यात आनंदी असतात.
  • जास्त सामान सोबत नेऊ नका. काही हलकी भांडी, ताट, वाट्या इत्यादी ठेवा. एक किंवा दोनदा खरेदी करता येतील अशा साध्या वस्तू घ्या.
  • तुमचे केस कापू नका. आपले नखे खूप वेळा कापू नका. वानप्रस्थीचे व्रत घ्या, ब्रह्मचर्य पूर्ण पाळा. चांगले आचरण ठेवा. मेकअपच्या दृष्टिकोनातून कधीही तेल वगैरे लावू नका. साबण वापरू नका. नेहमी शुद्ध माती वापरा.
  • परिक्रमा अमरकंटनपासून सुरू होऊन अमरकंटकमध्येच संपली पाहिजे. परिक्रमा पूर्ण झाल्यावर कोणत्याही ठिकाणी जाऊन भगवान शंकरजींना अभिषेक करून जल अर्पण करावे. पूजा आणि अभिषेक करा. मुंडनदी झाल्यावर आंघोळ करा आणि नंतर उत्साह आणि क्षमतेनुसार नर्मदा मैयाची भरतकाम करा. उत्तम ब्राह्मण, ऋषी, पाहुणे आणि मुलींनाही पाठवा, मग आशीर्वाद घ्या आणि तुमचा संकल्प सोडा आणि शेवटी नर्मदाजींना प्रार्थना करा.

Recent Post :

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )