।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
दुग्धव्यवसायावर बोलू काही | Let’s talk about dairy farming |
दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी दुभत्या गायींचे संगोपन आणि त्यांना योग्य आहार दिला जातो. गाईला दूध देण्यासाठी ती गाभण असायला हवी आणि तिच्या वासराला जन्म द्यायला हवा. वासरांना त्यांच्या आईपासून वेगळे केले जाते जेणेकरून ते दूध पिऊ नयेत आणि त्यांना वाढवले जाते जेणेकरून ते मोठे होतात आणि लवकरच गर्भवती होऊ शकतात. डेअरी फार्म सुरू होण्यासाठी खूप पैसा आणि भांडवल लागते, जे मांस ऑपरेशनपेक्षा जास्त आहे. तुम्ही डेअरी फार्म सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही कशात प्रवेश करत आहात आणि तुम्हाला त्यात कसे प्रवेश मिळवायचा आहे ते जाणून घ्या. तुम्ही शेतात वाढला असलात तरीही, तुमची स्वतःची साधने व्यवस्थापित करणे, दीर्घकाळ, काळजीपूर्वक नियोजन करणे. दुग्धोत्पादनामुळे अनेक गैर-विक्रीय आर्थिक फायदे मिळतात, ज्यामध्ये शेतातील खताचा इंधन किंवा सेंद्रिय खत म्हणून वापर होतो (अनेक शेती प्रणालींमध्ये खत हे पीक उत्पादनासाठी पोषक तत्वांचा एकमेव स्त्रोत आहे).
देशी / संकरीत गाईंचे फायदे
- संकरीत गाई लवकर वयात येतात व उत्पादनक्षम होतात.
- संकरीत गाईंच्या दुधाच्या विक्रीतून दर १० दिवसांनी पैसे मिळत असतात त्यामुळे दैनंदिन आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होत असते.
- शेतकऱ्याकडे रोखीचे भांडवल जास्त नसते. त्यांचे भांडवल म्हणजे घरातील राबणारी मंडळी व घरची वैरण त्यामुळे एखादी संकरीत गाय विकत घेऊन तिच्या दुधाच्या पेशावर त्या गाईंची किंमत फेडत असतात व जमले तर त्या गाईच्या उत्पादनावर दुसरी गाय विकत घेण्याचा प्रयत्न करतात
- जास्त गाई पाळून बेरोजगार मंडळींना व्यवसाय सुरू करता येतो.
- ५० टक्के संकरीत गाय असेल तर तिच्या एका वेतातील दूध २२५० लिटरच्या पुढे असावे व ६२.५ टक्के पेक्षा जास्त असेल तर तिचे दूध २७०० लिटरपेक्षा जास्त असावे. म्हणजे अशा गाईच्या मालकाला प्रत्येक महिन्याला एका गाईपासून किमान रु.१२५० ते रु. १५०० निव्वळ मिळतील.
- गाभणपणातील शेवटचे दोन महिने गाईचे दूध बंद केले जाते. त्यामुळे ह्या दोन महिन्याव्यतिरिक्त गाईपासून सतत उत्पन्न चालू असते.
- संकरीत गाय एक ते सव्वा वर्षात वित देत असते. त्यामुळे उत्पादनात नियमीत सातत्य राखता येते.
- कालवड जन्माला आल्यास दुधाव्यतिरिक्त अधिक फायदा होत असतो.
दुग्धव्यवसायातील मुलभूत बाबी
- जागा – गोठ्यासाठी पाण्याचा निचरा होणारी जागा निवडावी.
- पाणी – जनावरांना पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी व चारा उत्पादनासाठी पुरेसे पाणी असावे.
- वीज – जनावरांचा गोठा, कुट्टी मशिन, शीतयंत्र इ. साठी
- वीज पुरवठा नियमित असावा.
- जमीन – जनावरांना बाराही महिने पुरेसा हिरवा व सुका चारा उत्पादनासाठी पुरेशी जमीन असावी. बाजारपेठ – दुध, दुग्धजन्य पदार्थ तसेच जनावरे विक्रीसाठी जवळ बाजारपेठ असावी.
दुग्धव्यवसायातील आर्थिक बाब
- एका वेतात किमान दोन हजार लिटरपेक्षा जास्त दूध देणारी गाय / म्हैस गोठ्यात ठेवावीत.
- प्रजनन क्षमता व्यायलेली गाय / म्हैस पुन्हा ६० ते ९० दिवसानंतर माजावर येवून गाभण राहून त्याने ३५० ते ३९० दिवसात दुसरे वेत दिले पाहिजे.
- खाद्य – दुग्ध व्यवसायात ६० ते ७० टक्के खर्च खाद्यावर होतो. त्यामुळे खाद्याचे रूपांतर जास्त दुग्ध उत्पादनात करणारी जातीवंत जनावरे पाळावीत.
- गोठ्यातील जनावरे निरोगी असावी. त्यासाठी दरवर्षी लसीकरण करून घेऊन औषधोपचारावरील खर्च कमी करता येतो.
- गोठ्यामध्ये दुधाळ व गाभण जनावरांचे प्रमाण ५:१ असले पाहिजे.
- देखभाल करताना मालकांनी दररोज एक तरी फेरी गोठ्यात मारावी. त्यामुळे आजारी, माजावर असलेले जनावर ओळखून आर्थिक नुकसान टाळता येते.
मुक्त संचार गोठा पध्दतीचे फायदे : Advantages of open circulation system In Dairy Farming
१. शेण उचलावे लागत नाही.
२. फिरण्याचे स्वातंत्र्य असल्याने पाय व खुराचे आजार होत नाही.
३. स्तनदाहाचे प्रमाण अत्यल्प असते.
४. जनावरांना उन्हात अथवा सावलीत बसण्याचे स्वातंत्र्य असल्याने गरजेनुसार नैसर्गिक वातावरणाचा लाभ होतो.
५. पिण्यासाठी पाणी २४ तास उपलब्ध ठेवलेस तहान लागलेनंतर पाणी पिणे जनावरांना शक्य होते याचा फायदा दुग्धोत्पादन वाढीमध्ये दिसून येतो.
६. नैसर्गिक सर्व सुविधा मिळल्यामुळे गाई, म्हशी आनंदी राहतात ज्यामुळे म्हशीमधील पान्हा सोडणेची समस्यासुध्दा कमी होते.
७. मुक्त संचार गोठा पध्दतीमध्ये या गोठ्यात कोंबड्या पाळल्यास त्या जनावरांच्या अंगावरील व गोठ्यातील गोचीड / किटक खातात ज्यामुळे जैविक नियंत्रण होते.
दुग्धव्यवसायामध्ये वेळ, मनुष्यबळ व पैशाची बचत करणेचे दृष्टिने पशुपालकांनी मुक्त संचार गोठा पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
पशुधन प्रकार | भारतीय गाय | विदेशी गाय | म्हैस | शेळी |
माजावर येण्याचे वय (वर्षे) | २ ते २.५ | १.२५ ते २ | २.५ ते ३ | ९ ते १२ |
माज चक्र (दिवस) | १९ ते २२ | १९ ते २२ | २१ ते २३ | २० ते २१ |
माज राहण्याचा काळ (तास) | ८ ते २४ | ८ ते २४ | १२ ते ३६ | १६ ते १८ |
रेतनाची योग्य वेळ (तास) | शेवटचे ८ तास | शेवटचे ८ तास | शेवटचे ८ तास | शेवटचे १२ तास |
गाभण काळ (दिवस) | २८० | २८० | ३१० | १५० |
व्याल्यानंतर पुन्हा माजावर येण्याची वेळ (आठवडे) | ४ ते १२ | ४ ते १२ | १० ते ३६ | ४ ते ५ |
व्याल्यानंतर पुन्हा रेतनाची योग्य वेळ (महिने) | २ ते ३ | २ ते ३ | २ ते ३ | १ |
दोन वेतातील अंतर (महिने) | १४ ते १६ | १२ ते १४ | १६ ते २० | ८ ते ९ |
- दुधाळ गाय आकाराने मोठी असली तरी शरीराचा बांधा व्यवस्थित असावा. ( वयस्कर गाईचे आकारमान मोठे असते व बांधा सैल असतो. )
- गाईच्या अंगावर जास्त चरबी नसावी.
- त्वचा मऊ व तजेलदार असावी.
- मान लांब व सडपातळ असावी.
- पाठीचा कणा सरळ असावा.
- बरगड्या चपटया व रूंद असाव्यात.
- कमरेची हाडे रूंद व दणकट असावीत.
- मांडया पातळ, अर्ध गोलाकार असाव्यात.
- गाय शांत स्वभावाची असावी.
- डोके पुरेसे लांब व रूंद असावे.
- जबडा रूंद व मजबूत असावा.
- डोळे पाणीदार असावे. छाती भरदार व रूंद असावी.
- नाकपुड्या रूंद व श्वसन उत्तम असावे.
- चारही सड सारख्या लांबीचे असावेत.
- कास शरीराला घट्ट व मऊ असावी.
- जनावरे दुसन्या वेताची निवडावी.
संकरित गाय, म्हैस खरेदी करताना घ्यावयाची काळजी
- संकरित गाय खरेदी करताना फसगत होण्याची शक्यता जास्त असते.
- संकरित गाय खरेदी करताना शक्यतो ओळखीच्या व्यक्तिकडूनच खरेदी करावी.
- गाईची किंमतही तिच्या वयावर अवलंबून असते. पहिल्या किंवा दुसया वेताच्या गाईला चौथ्या किंवा त्या पुढील वेताच्या गाईपेक्षा जास्त किंमत द्यावी लागते.
- गाय खरेदी करण्यापूर्वी त्या गाईला काही व्यंग आहेत का त्याची पाहणी करावी.
- विकत घेणाच्या व्यक्तिकडून गाईची चारही सडे चांगली असण्याची व अंग बाहेर न पडण्याची खात्री घ्यावी.
- गाभण गाय असल्यास किती दिवसाने विणार आहे याची खात्री करून घ्यावी जर ती गाय दिलेल्या मुदतीत विली नाही व मुदतीपेक्षा जास्त महिने लागले तर पुढील होणारे नुकसान टळते.
- दुधातील गाय विकत घ्यावयाची असेल तर तिचे तीन वेळेचे दूध स्वत: काढून पाहावे व आपली खात्री करून घ्यावी जर एक वेळचे दूध पाहून गाय खरेदी केली तर आपली फसगत झाली असे समजावे. बरेच दलाल गाय तुंबवतात त्यामुळे एका वेळेला गाय जास्त दूध देत असते.
- १५ ते २० दिवसांत विणारी गाभण गाय शक्यतो खरेदी करावी म्हणजे दूध उत्पादन व्यवसाय किफायतशीर करता येतो. ताजी दुभती गाय विकत घेतल्यास ती आपल्या गोठ्यात गेल्यावर २ ते ३ लिटर दूध कमी देईल.
- गाय लंगडत नाही ना याची खात्री करावी.
- शक्य असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गाय खरेदी करा.
- गाय खरेदी केल्याबरोबर गाईचा विमा उतरविण्यास विसरू नका.
- दुभत्या ‘जनावरांचे वय दातावरून व शिंगावर असणार्या रिंगावरून ओळखता येते.
दुधाळ गायींची तुलनात्मक माहिती
अनु क्र. | गावठी गाय | अनु क्र. | संकरीत गाय |
१. | ४० ते ४२ महिन्यांची असताना पहिले वेत देते | १. | २२ ते २६ महिन्यांची असताना पहिले वेत देते |
२. | दुध देण्याचा काळ १५० ते १८० दिवस | २. | दुध देण्याचा काळ २४० ते ३०० दिवस |
३. | व्याल्यानंतर ६ ते ८ महिन्यानी पुन्हा गाभण राहते. | ३. | व्याल्यानंतर ३ ते ४ महिन्यानी पुन्हा गाभण राहते. |
४. | भाकड काळ ७ ते ८ महिने | ४. | भाकड काळ २ ते ४ महिने |
५. | दोन वेतातील अंतर १८ ते २० महिने | ५. | दोन वेतातील अंतर १३ ते १५ महिने |
६. | सरासरी रोजचे दूध उत्पादन ३ लिटर म्हणजे १८०दिवसांत ५४० लिटर | ६. | सरासरी रोजचे दूध उत्पादन ६.२५ लिटर म्हणजे ३०० दिवसांत १८७५ लिटर |
७. | वासरांची वाढ रोज २०० ते ३०० ग्रॅम | ७. | वासरांची वाढ रोज ५०० ते ७०० ग्रॅम रोज |
८. | दुध काढताना पाहवण्यासाठी वासरू आवश्यक | ८. | पान्हवण्यासाठी वासराची आवश्यकता नाही |
९. | बैलाचा शेतीला उपयोग | ९. | बैल वशिंड नसतानाही जास्त ताकतीचे काम सातत्याने करु शकतात. |
१०. | आरोग्याची काळजी नगण्य | १०. | गावठीच्या तुलनेत आरोग्याची काळजी आवश्यक |
११. | दुध देण्याच्या काळात सातत्य नसते | ११. | दुध देण्याच्या काळात सातत्याने दूध देते |
गोठ्याचे व्यवस्थापन
गोठयाची जागा
- गोठ्याची जागा मुरमाड असावी व शक्यतो निचरा होणारी असावी.
- गोठा बांधताना पूर्व-पश्चिम या दिशेने बांधावा.
- गोठ्याची जागा लगेच स्वच्छ करता आली पाहिजे व लगेच कोरडी झाली पाहिजे.
- गोठ्याची जागा जास्त उताराची नसावी. उतार जास्त असल्यास म्हशी घसरून पडून दगावण्याची शक्यता असते.
- गोठ्याच्या जागेला २ से. मी. चा उतार द्यावा.
- गोठ्याच्या जागेत सिमेंट काँक्रीट व विटांपासून १० से.मी. जाडीचा रफ कोबा करावा.
- प्रत्येक म्हशीला (५० चौ. फूट) जागा गोठयात लागणार आहे.
- जमिनीपासून छताची उंची १५ फूट ठेवावी.
गोठ्यातील गव्हाण
- जमिनीपासून गव्हाण उंची ३ फूट उंच, २.५ फूट रुंद व खोली १.२५ फूट असावी.
- गोठ्याच्या चारी बाजूने भिंत असावी. ती जमिनीपासून ५ फूट उंच असावी, त्याच्यावर छतापर्यंत लोखंडी जाळी लावावी.
- भिंतीच्या बाजूकडील गव्हाणीचा भाग फुगीर असावा म्हणजे चारा घसरून गव्हाणीत जमा होईल.
- गव्हाणीत टाकलेल्या चान्याची नासधूस, नासाडी होणार नाही अशा प्रकारची गव्हाण असावी.
गोठ्याची स्वच्छता
- दररोज सकाळी गोठा झाडून घ्यावा, गव्हाण स्वच्छ करावा शेण, मूत्र गोळा करून सर्व उकिरड्यावर टाकावे. उकीरडा गोठ्यापासून दूर अंतरावर पूर्वेस असावा.
- धार काढल्यानंतर म्हशींना गोठ्याबाहेर काढाव्यात व नंतर मुबलक पाण्याने गोठा धुवून काढावा.
- आठवडयातून एकदा गोठा निर्जंतुक औषधाने धुवावा.
- १०० लिटर पाण्यात ५० मि.ली. मेलाथियॉन टाकून या पाण्याने गोठा आठ दिवसातून एकदा धुणे आवश्यक आहे. गोठ्याच्या भिंतींना वर्षातून एकदा चुना लावावा.
- गोठ्यात गोचीड असल्यास आठ दिवसांतून एकदा ब्युटॉक्स औषध गोठ्यास फवारावे. (प्रमाण एक लिटर पाण्यात २ मि.लि.)
- गोठ्यात माशा जास्त झाल्या असल्यास दररोज सकाळी ९ वाजता गोठ्यात गोवन्यांचा धूप करावा.
- पिण्याच्या हौदात वर्षातून एकदा चुना लावून रंगविणे.
- पिण्याचा हौद दर आठ दिवसांनी आतून बाहेरून चांगला धुवावा. हौदावर झाकणाची व्यवस्था करावी.
- हौदात दर १५ दिवसांनी पोटॅशियम परमँगनेटचे पाणी थोडेसे गुलाबी होईल इतकेच खडे टाकावे.
जनावराचा प्रकार | तळजागा प्रति जनावर शेडची जागा (चौ.मि.) | खुली जागा (चौ. मि.) |
वासरे (८ आठवडे पेक्षा लहान) | १.०० | २.०० |
वासरे (८ आठवडे पेक्षा मोठी ) | २.०० | ४.०० |
कालवडी / पारडया | २.०० | ४-५ |
गाय | ३-५ | ७.०० |
म्हैस | ४.०० | ८.०० |
व्यायला झालेली गाय / म्हैस | १२.०० | २०-२५ |
खोंड | १२.०० | १२०.०० |
बैल | ३.५ | ७.०० |
- माजावर आलेले जनावर अस्वस्थ, बेचैन होते, वारंवार हंबरते.
- मायांगातून स्वच्छ पारदर्शक अंड्याच्या पांढऱ्या बलकासारखा चिकट पदार्थ लोंबकळताना दिसतो किंवा तो शेपटीला किंवा मागील मांड्याच्या भागाला चिकटलेला दिसतो.
- निरणाला सूज येते व ती लालसर रंगाची दिसते.
- माजावर आलेले जनावर दुसऱ्या जनावरावर उडते तसेच
दुसऱ्या जनावराला उडू देते. - जनावरांचे दूध कमी होणे.
कृत्रिम रेतनाचे महत्त्व
- गाय किंवा म्हैस नकळत गाभण राहिलेली असल्यास कळून येते.
- गाभण असल्यास काही गाई / म्हशी खोटा माज दाखवितात. अशा गाईंना वळू दाखविल्यास त्या गाभ टाकण्याचा संभव असतो. कृत्रिम रेतनाचे हा धोका टळतो.
- गाईच्या गर्भाशयात वरून न दिसणारे काही दोष निर्माण झालेले असल्यास त्यावेळीच कळून येतात व त्यावर इलाज करता येतो.
- कृत्रिम रेतनाचे जातीवंत विलायती अथवा देशी वळूच्या बीजाचा वापर होत असल्याने जातीवंत वासराची पैदास होत असते.
- वळूच्या वंशावळीची नोंद असल्याने पुढची पिढी आपल्याला पाहिजे त्या वळूपासून किंवा त्याच्या बीजापासून सुधारता येते व आपल्या गाईची वंशावळ ठेवण्यास सुलभ होते.
- कृत्रिम रेतनात अनेक जातींचे व निरनिराळ्या वंशावळीचे बळू उपलब्ध असल्याने आपल्याला पाहिजे त्या वळूचे वीर्य सहज मिळू शकते.
- चांगल्या जातीवंत वळूच्या वीर्याचा वापर अनेक गाईवर करता येतो.
- वीर्य पाहिजे त्याठिकाणी पोहोचते करता येते.
- वीर्याची साठवणूक करता येत असल्याने जास्तीत जास्त त्याचा वापर करता येतो.
- कृत्रिम रेतनाने वळूच्या वीर्याची आधीच परिक्षा करून फक्त चांगले असलेले वीर्य वापरण्यासाठी निवडता येते.
- कृत्रिम रेतनाने जनावरांची सुधारणा लवकर व जलद गतीने होत असते.
गर्भधारणा केल्यानंतर गाय केव्हा विणार ? (अंदाजे तारीख ) गर्भकाळ २७५ ते २८० दिवस
कृत्रिम रेतनाची तारीख | विण्याची तारीख | कृत्रिम रेतनाची तारीख | विण्याची तारीख |
०१ जानेवारी | ०८ ऑक्टोंबर | ०८ जुलै | १२ एप्रिल |
०७ जानेवारी | १४ ऑक्टोंबर | १५ जुलै | १९ एप्रिल |
१४ जानेवारी | २१ ऑक्टोंबर | २२ जुलै | २६ एप्रिल |
२१ जानेवारी | २८ ऑक्टोंबर | २९ जुलै | ०३ मे |
२८ जानेवारी | ०४ नोव्हेंबर | ०५ ऑगस्ट | १० मे |
०४ फेब्रुवारी | ११ नोव्हेंबर | १२ ऑगस्ट | १७ मे |
११ फेब्रुवारी | १८ नोव्हेंबर | १९ ऑगस्ट | २४ मे |
१८ फेब्रुवारी | २५ नोव्हेंबर | २६ ऑगस्ट | ३१ मे |
२५ फेब्रुवारी | ०१ डिसेंबर | ०२ सप्टेंबर | ०७ जुन |
०४ मार्च | ०८ डिसेंबर | ०९ सप्टेंबर | १४ जुन |
११ मार्च | १५ डिसेंबर | १६ सप्टेंबर | २१ जुन |
१८ मार्च | २२ डिसेंबर | २३ सप्टेंबर | २८ जुन |
२५ मार्च | २९ डिसेंबर | ३० सप्टेंबर | ०५ जुलै |
कृत्रिम रेतनाची तारीख | विण्याची तारीख | कृत्रिम रेतनाची तारीख | विण्याची तारीख |
०१ एप्रिल | ०५ जानेवारी | ०७ ऑक्टोंबर | १२ जुलै |
०८ एप्रिल | १२ जानेवारी | १४ ऑक्टोंबर | १९ जुलै |
१९ एप्रिल | १९ जानेवारी | २१ ऑक्टोंबर | २६ जुलै |
२२ एप्रिल | २६ जानेवारी | २८ ऑक्टोंबर | ०२ ऑगस्ट |
२९ एप्रिल | ०२ फेब्रुवारी | ४ नोव्हेंबर | ०९ ऑगस्ट |
०६ मे | ०९ फेब्रुवारी | ११ नोव्हेंबर | १६ ऑगस्ट |
१३ मे | १६ फेब्रुवारी | १८ नोव्हेंबर | २३ ऑगस्ट |
२० मे | २३ फेब्रुवारी | २५ नोव्हेंबर | ३० ऑगस्ट |
२७ मे | ०१ मार्च | २ डिसेंबर | ०६ सप्टेंबर |
०३ जून | ०८ मार्च | ९ डिसेंबर | १३ सप्टेंबर |
१० जून | १० मार्च | १६ डिसेंबर | २० सप्टेंबर |
१७ जून | २२ मार्च | २३ डिसेंबर | २७ सप्टेंबर |
२४ जून | २९ मार्च | ३० डिसेंबर | ०३ ऑक्टोबर |
०१ जुलै | ०५ एप्रिल |
- दुभती जनावरे माजावर आल्यानंतर कृत्रिम रेतन करावे व त्याची नोंद करावी.
- कृत्रिम रेतन केल्यानंतर २१ दिवसांनी गाय माजावर येते किंवा नाही ते पहावे.
- परत माजावर आली तर कृत्रिम रेतन करून घ्यावी किंवा माज केला नाही तर ती गाभण पोट असे समजावे.
- गाभण गाईची २.५ ते ३.० महिन्यानंतर पशुवैद्याकडून गाय गाभण असल्याची खात्री करावी.
- गाभण काळातील ७ व्या महिन्यापासून गर्भातील वासराची दुप्पट वाढ होत असते त्यामुळे गाभण गाईची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
- गाभण काळात गाईला पुरेसा हिरवा चारा, वाळलेला चारा व पशुखाद्य नियमित द्यावेत तसेच पशुखाद्यातून नियमित ४० ग्रॅम मिनरल मिक्चर द्यावे.
- गाईचे दूध बंद झाल्यापासून ते परत दूध चालू होईपर्यंत या काळाला भाकड काळ म्हणतात. हा काळ ६० ते ८४ दिवसांचा असतो.
- गाभण काळात गाईला दररोज थोडा वेळ चालण्याचा व्यायाम द्यावा.
- गाभण काळात जास्त उतार असणान्या गोठ्यात गाय बांधू नये.
- गाभण काळात कधी कधी गाईच्या सडातून चीक बाहेर येत असतो. तो पिळून काढून कासेवरचा दाब कमी करावा.
- गाभण काळाच्या शेवटच्या आठवड्यात गाईला इतर जनवरांपासून वेगळे ठेवावे.
- शेवटच्या दिवसात गाईकडे विशेष लक्ष ठेवावे.
दुधाळ गाईचे व्यवस्थापन
- गाय व्याल्यानंतर प्रथम तिचा मागचा भाग गरम पाण्याने धुवून काढा.
- उर्जा भरून काढण्यासाठी १ आठवडा दररोज ३ किलो उकडलेली बाजरी त्यात ५०० ग्रॅम गुळ, १०० ग्रॅम शेपा, २०० मिली गोडेतेल व ५० ग्रॅम सुंठ मिसळून द्यावे.
- गाईची वार (जार) ७ तासात पडेल, जर पडली नाही तर पशुवैद्याच्या मदतीने वार काढावी.
- २१ दिवसानंतर गाय पुर्ण क्षमतेने दूध देईल. त्यावेळेपासून दुधाच्या प्रमाणात तिला आहार द्यावा.
- गाईला दिवसातून एक वेळा स्वच्छ धुवावे.
- गाय व्याल्यानंतर ६० ते ६५ दिवसांनी माज करेल त्यावेळेस पशुवैद्याला बोलावून कृत्रिम रेतन करून घ्यावे.
- गाईचा गोठा स्वच्छ व गोचिडमुक्त असावा.
- गाईला दिवसातून किमान ३ वेळा स्वच्छ पाणी पाजावे.
- गाय गाभण राहिल्यापासून ७ व्या महिन्यात गाईला आटवावे.
- आटवल्यानंतर प्रत्येक सडात पेन्डेस्ट्रिनच्या ट्युबा सोडाव्यात.
- गाय व्याल्यानंतर तिला नियमित हिरवा व वाळलेला चारा तसेच दररोज २ किला खुराबक व ४० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे.
- गाय विण्यापूर्वी आठ दिवस इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे व विण्यापर्यंत तिच्याकडे लक्ष ठेवावे.
गाय पान्हा का चोरते ?
- कधी कधी पहिल्या वेताच्या गाईत हा दोष आढळतो.
- गाय व्याल्यानंतर लगेच वासरू मेले तर,
- शरीरात संप्रेरकांचा असमतोल असेल तर,
- खनिजांची कमतरता,
- गाईला मारल्यास,
गाई-म्हशींसाठी पाण्याची गरज
- गाई- म्हशीना पाणी कमी पाजल्यास त्याची दुग्धोत्पादन क्षमता असतानाही घटेल हे लक्षात ठेवावे. व त्याकरिता त्याना दिवसातुन निदान ५ ते ६ वेळा पाणी पाजावे.
- स्वच्छ व थंड पाणी गाई- म्हशींना पिण्यासाठी २४ तास उपलब्ध असावे.
.
पाण्याचे तापमान १६ ते २६ डीग्री सेंटिग्रेड असावे. - गाई- म्हशी पाण्याच्या टाकी / पाण्याच्या गव्हाणीपेक्षा त्यांच्यासाठी खास बनविलेल्या पाणी पिण्याच्या भांड्यामधून पाणी पिणे पंसत करतात.
संकरित जनावरांना वातावरणातील सरासरी तापमान 30 डीग्री सेंटिग्रेड असताना लागणारी पाण्याची गरज खालील प्रमाणे असते.
(फक्त पिण्यासाठी आवश्यक पाण्याची गरज दर्शविली आहे.)
शरीराचे वजन (किलो) | पाणी (लिटर) | शरीराचे वजन (किलो) | दुधातील गाई |
५० | ५-६ | ४०० | २७ ते ३० लिटर + ३ लिटर प्रतिकिलो दुग्धउत्पादनास |
१०० | १६-१७ | ५०० | ३२ ते ३५ लिटर + ३ लिटर प्रतिकिलो दुग्ध उत्पादनास |
२०० | २६-२७ | – | – |
३०० | ३७-४० | – | – |
५०० | ४६-५० | – | – |
म्हशींसाठी पाण्याची गरज
प्रकार | पिण्यासाठी पाणी (लिटर) | धुण्यासाठी लिटर | एकुण पाण्याची गरज (लिटर) | |
हिवाळा | उन्हाळा | |||
रेडकु | १२ | २९ | १५ ते २३ | २७ ते ४२ |
रेडी | २८ | ५४ | २८ ते ४५ | ४७ ते ९९ |
भाकड म्हैस | ४५ | ५५ | २४ ते ३६ | ७० ते ९० |
दुधातील म्हैस | ६० | ६५ | २४ ते ३६ | ८० ते १०२ |
दुधातील स्निग्धांश कमी होण्याची कारणे
- गाईची अर्धवट धार काढणे त्यामुळे बरेच दूध कासेत राहाते व असे दूध वासराला पिण्यासाठी मिळते. अशा दुधात स्निग्धांश जास्त असतो.
- धारा काढण्यामधील अंतर सारखे नसल्यास स्निग्धांश कमी होतो.
- गाईच्या सुरूवातीच्या वेतात स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते. परंतू वयस्कर गाईच्या दुधात टक्केवारी कमी असते.
- गाईच्या आहारात प्रथिनांचा अभाव असल्यास स्निग्धांश दुधात कमी येते.
- गाईच्या आहारात खनिजे नसल्यास स्निग्धांश कमी होते.
- गाय व्याल्यानंतर सुरूवातीच्या काळात स्निग्धांशाची टक्केवारी कमी असेत व शेवटच्या दोन महिन्यांत स्निग्धांशची टक्केवारी वाढलेली असते.
- जास्त दूध देण्याच्या गाईच्या दुधात स्निग्धांशाची टक्केवारी कमी असते.
- गाईला जर स्तनदाह हा आजार असल्यास दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण घटते.
- आहारात वाळलेला चारा नसेल तर दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण घटते.
- आहारात ऊर्जेचे प्रमाण कमी असल्यास स्निग्धांशाचे कमी होते.
- ऊसाचे वाढे किंवा ऊस गाईला खाऊ घातल्यास स्निग्धांश कमी होते. परंतू त्याचबरोबर योग्य प्रमाणात खुराक व खनिजे दिल्यास दुधातील स्निग्धांश कमी होत नाही.
- गाईला कोवळा चारा जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास स्निग्धांश कमी होते.
लहान वासरांचे संगोपन
- गाय प्रसूत होताना वासराची नाळ जर तुटली नाही तर ती उकळत्या पाण्यात निर्जंतूक केलेल्या कात्रीने किंवा ब्लेडने बेंबटापासून दोन इंचावर कापावी व निर्जंतूक केलेल्या दोऱ्याने बांधावी हे करत असताना नाळ व दोरा टिंक्चर आयोडिनमध्ये बुडवावा.
- जन्म झालेल्या वासरास शक्य तेवढ्या लवकर चीक पाजावा.
- वासराला वजनाच्या १० टक्के चीक पाजावा. पहिल्या महिन्यात वासराला वजनाच्या १० टक्के दुसऱ्या महिन्यात वजनाच्या ८ टक्के व तिसऱ्या महिन्यात वजनाच्या ५ टक्के दूध पाजावे.
- शक्य असल्यास वासराला सुरू वातीपासून वरचे दूध पाजण्याची सवय लावावी.
- पहिल्या १५ दिवसाच्या आत डॉक्टरांकडून शिंगाचे कोंब जाळून घ्यावे.
- वासराला पहिल्या तीन महिन्यांपर्यत २५० ग्रॅम दररोज काफ स्टार्टर व नंतर ६ महिन्यांपर्यंत वासराला दररोज ५०० ग्रॅम काफ स्टार्टर द्यावे.
- वासराला सुकविलेला लसूण घास दिल्यास वासराची वाढ चांगली होते.
- वासराला पहिल्या दोन महिन्यांच्या आत कृमीनाशकाची मात्रा द्यावी व नंतर प्रत्येक ३ महिन्यांनी कृमीनाशके देत जावीत.
- वासराला पहिल्या तीन महिन्यांच्या आत लाळ खुरकूत रोगाविरूद्धची लस टोचावी. पहिल्या वर्षात तीन वेळा (४ महिन्यांच्या अंतराने ) लसीकरण करावे.
- वासराचे तीन महिन्यांनी दूध बंद झाले असल्यास वासराची पाण्याची गरज वाढते. अशा वेळेस वासरू पिऊ शकेल तेवढे पाणी पाजावे.
- वासराला तीन महिन्यांपर्यंत कमी प्रतीचा वाळलेला चारा खाऊ घालू नये.
- वासराला तीन महिन्यांपर्यंत युरिया प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालू नये.
- वासराला वजनाच्या प्रमाणात आहार द्यावा. २.५ ते ३ टक्के प्रति १०० किलो शरीराचे वजन याप्रमाणे आहार द्यावा.
- प्रत्येक महिन्यांला वासराचे वजन करावे. वासराची वाढ योग्य आहे की अयोग्य आहे. हे आपणास समजेल.
पशुखाद्य व चारा व्यवस्थापन
वयोगट | दूध / चिक (लि) | हिरवा चारा (कि. ग्रॅ) | वाळलेला चारा (कि. ग्रॅ) | खुराक (कि.ग्रॅ) |
१ ते ६ दिवस | १ ते १.५ | – | – | – |
६ ते ३० दिवस | १ ते २ | ०.१०० | ०.१०० | ०.५० |
१ ते ३ महिने | १ ते १.५ | ०.५०० | ०.२०० | ०.१०० |
३ ते ६ महिने | ०.५ ते २ | १ ते ४ | १ ते २ | ०.३०० |
६ ते १२ महिने | – | ५ ते १२ | १ ते २ | ०.५०० |
१ ते २ वर्ष | – | ८ ते १५ | २ ते ३ | १ |
२ ते ३ वर्ष | – | १५ ते २० | ५ ते ६ | १.५ ते २ |
३ वर्षापुढे / दुधाळ जनावरे | – | २० ते २५ | ५ ते ८ | ४ ते ६ |
वय | हिरवा चारा (किलो) | वाळलेला चारा (किलो) | खुराक (किलो) |
२ ते ४ वर्षे | १५ ते २० | २ ते ४ | १ |
२ वर्षापुढे | १५ ते २० | २ ते ५ | १ |
२ वर्षापुढील | २० ते २५ | ३ ते ६ | १ ते १.५ |
संतुलित खाद्य
- संतुलित पशूखाद्यात शरीर पोषणासाठी, दूध उत्पादन वाढीसाठी व आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य प्रमाणात अन्नघटक मिसळलेले असतात.
- पशूखाद्यात १८ टक्यांपेक्षा जास्त तंतूमय पदार्थ नसावेत व ६० टक्क्यांपेक्षा कमी एकूण पंचवीस पदार्थ नसावेत.
- पशूखाद्याचा बल्क कमी असतो परंतु जास्त पाचक अन्नघटक विपुल प्रमाणात असतात.
- चान्यापेक्षा जास्त उपयुक्त अन्नघटक असल्याने दूध उत्पादनास निश्चित वाढ होते.
- पशूखाद्यात वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश असावा.
- पशूखाद्य बनविताना उत्तम प्रतीच्या खाद्य पेंडी व धान्य वापरावे.
- उत्तम पशूखाद्यात १५ ते १७ टक्क्यांपर्यंत पचनीय प्रथिने व ६५ टक्क्यांवर एकूण पचनीय पदार्थ असावेत.
- पशूखाद्य बनविताना बुरशीयुक्त किंवा किडे, अक्रया झालेले खाद्यपदार्थ वापरू नयेत.
- पशूखाद्यात वापरण्यात येणान्या धान्यापासून म्हशीला उर्जा मिळत असते व खाद्या पेंडीपासून प्रथिने मिळत असतात.
- पशूखाद्य बनविताना धान्याचा व पेंडीचा भरडा केला जातो तो भरडा बारीक (३ मि.मी. जाडीचा) केलेला असल्याने खाद्याचे पचन व्यवस्थित व लवकर होते.
- १०० किलोग्रॅम खाद्य तयार करण्यासाठी २ किलोग्रॅम खनिज मिश्रण, १ किलोग्रॅम मीठ व ३० ग्रॅम व्हिटॅमीन ए. डी. – ३ वापरावे.
- पशूखाद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मोलॅसेस (मळी) स्वच्छ वासविरहीत असल्यास खाद्याला चांगला वास सुटतो.
- पशूखाद्य भुकटीच्या स्वरूपात व गोळीच्या स्वरूपात बनविता येते.
- मोठमोठ्या गोठ्यात किंवा तबेल्यात अद्यापही पारंपारिक पद्धतीने खाद्य बनविले जाते.
- पारंपारिक पद्धतीचे खाद्य ते गोठ्यात तयार करतात.
- असे खाद्य बनविताना जो फॉर्म्युला ते वापरतात त्यातील सर्व घटक कुंडीत ५ ते ६ तास भिजत ठेवतात व नंतर म्हशींना देतात.
- खाद्यातील सर्व घटक चांगले भिजलेले असल्याने व सर्व खाद्यपदार्थ एकजीव झाल्याने म्हशी असे खाद्य आवडीने खातात.
- म्हशींना असे खाद्य खाण्याची सवय झाल्याने त्यांना गोळीच्या स्वरूपातील खाद्य दिल्यास त्या लवकर खाण्यास तयार नसतात.
- कुंडीतील खाद्यात एक दोष मात्र निश्चित आहे, तो म्हणजे पाण्यात विरघळणारे अन्नघटक तसेच कुंडीच्या पृष्ठभागावर राहतात व त्यांचा उपयोग म्हशींना होत नाही.
- कुंडीत तयार केलेले पशूखाद्य जास्त काळ ठेवल्यास बुरशी तयार होण्याची शक्यता असते.
- खाद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अस्वच्छ असल्यास पाण्यामधून अपायकारक जंतू म्हशीच्या शरीरात जाण्याची शक्यता असते.
- पारंपारिक खाद्य बनविताना खालील फॉर्म्युल्याने बनवावे.
- १) कपाशी, सरकी पेंड ४०% २) तूर, मुग, हरभरा चुनी ३०% ३) गव्हाचा कोंडा १५% ४) बारीक मका भरडा १३% ५) खनिज मिश्रण १% ६) मीठ १%
- यामध्ये ३० ग्रॅम जीवनसत्व ए.डी. – ३ चा वापर करावा.
प्राणी आणि त्याचे रोग | गाय | म्हैस / रेडा | बैल | शेळी/मेंढी | वासरे |
१) घटसर्प | मे-जून | मे-जून | मे-जून | मे | मे-जून |
२) फऱ्या | मे-जून | मे-जून | मे-जून | जुलै | मे-जून |
३) बुळकांडी | एप्रिल / सप्टेंबर | एप्रिल / सप्टेंबर | एप्रिल / सप्टेंबर | – | एप्रिल / सप्टेंबर |
४) लाळ खुरकत | एप्रिल / ऑक्टोबर | एप्रिल / ऑक्टोबर | एप्रिल / ऑक्टोबर | ऑक्टोबर | एप्रिल |
५) फाशी | मे | मे | मे | मे | मे |
६) पीपीआर | – | – | – | मे-जून | – |
७) देवी | – | – | – | एप्रिल / डिसेंबर | – |
८) न्युमोनिया | – | – | – | जानेवारी | – |
९) आंत्रविषार | – | – | – | मे/जून | – |
१०) सीसीपी | – | – | – | जून | – |
- आजारी जनावरांचे शारीरिक तापमान कमी किंवा वाढलेले दिसून येते. ह्रदयाचे ठोके वाढलेले किंवा कमी होतात.
- दूध देणारी जनावरे दूध कमी देतात व अनियमित देतात.
- जनावरांच्या पायाला दुखापत झाली असेल तर लंगडत चालतात. नाक सुकलेले किंवा नाकातून स्त्राव स्त्रवत राहतो.
- आजारी जनावरे कमी प्रमाणात चारा खातात व कमी पाणी पितात.
- लघवी करतांना हळूहळू थेंब थेंब लघवी करतात.
- लघवीचा रंग पिवळा गर्द किंवा लाल रंगाची लघवी करतात.
- शेण करताना अति घट्ट अथवा अति पातळ असते.
- शेणाचा दुर्गंधीयुक्त घाणेरडा वास येतो.
- डोळे लाल, डोळ्यातून पाणी किंवा पू वाहतांना दिसतो.
- शरीरावरील केस उभे व राठ दिसून येतात. त्याचप्रमाणे कातडी चमकदार दिसत नाही.
- जनावर बसतांना चारही पाय जवळ घेऊन बसल्यास पोटाचा त्रास होत आहे, असे दिसून येते.
- जनावरे मालकांना मारायला धावतात. जनावरे गोल गोल फिरतात.
- आजारी जनावरांची देखभाल करण्यापूर्वी जनावरात दिसून येणाऱ्या संपूर्ण बदलांचा अभ्यास करणे आवश्यक असते.
- प्रथम आजारी जनावराला निरोगी जनावरापासून वेगळे करावे. – आजारी जनावराला दुसऱ्या गोठ्यात बांधावे.
- आजारी जनावराचे डॉक्टरांकडून रोग निदान करून घेवून औषधोपचार चालू ठेवावा.
- आजारी जनावरांच्या चारा-पाण्यावर व खांद्यावर लक्ष ठेवावे.
- जनावरांना भरपूर ताजे व स्वच्छ पाणी पाजावे.
- आजारी जनावरांची खाद्याची भांडी व गोठा स्वच्छ ठेवावा.
- जनावरे दूध देणारे असतील तर त्याचे दूध शेवटी व वेगळे काढावे. ‘अशा जनावरांना पाचक व मऊ असे खाद्य द्यावे.
- जनावरांना मारझोड करू नये.
- जनावरांना जखमा झाल्या असतील तर जखमा पोटॅशिअम परमँग्नेटच्या पाण्यात धुवून घ्याव्यात व मलमपट्टी करावी.
- आजारी जनावरांची स्वच्छता ठेवावी व दूध काढणाऱ्या व्यक्तीने साबणाने हात वच्छ धुवावेत.
1. आजार – जंत
कारण : ■ शेण मिसळलेले अन्न जनावरांच्या पोटात गेल्यास ■ लहान वासरास जन्मल्यानंतर पुरेसा चीक मिळाला नाही तर जंत होण्याची शक्यता असते.
लक्षणे : ■ कातडी खरखरीत होते, अंगावर केस उभे राहतात. त्वचेचे (कातडीचे) विकास जडतात. ■ गळ्याखाली सूज येते. अधूनमधून पातळ, दुर्गंधीयुक्त जुलाब होतात. शेणाबरोबर कधी कधी जंतही पडतात.
उपाय : ■ पोटातील जंतासाठी गुरांच्या वजनानुसार प्रती ५० किलो वजनासाठी एक गोळी या प्रमाणात वमन (wormin) ह्या गोळ्या द्याव्यात.
2. आजार – गोचीड
कारण : ■ अस्वच्छतेमुळे गोठ्यात गोचीड वाढणे. ■ गोचीड जनावरांचे रक्त शोषून घेतात तेव्हा रक्तात रोगजंतू शिरणे.
लक्षणे : ■ जनावरांच्या शेपटीखाली, पायाच्या बेचक्यात, कासेवर, डोळ्यांच्या आजूबाजूला आणि एकूणच शरीरावर लहानमोठ्या गोचीड दिसतात.
उपाय : ■ गोचीड झालेली जनावरे गोठ्यापासून दूर बांधावी. त्यांना इतर जनावरांमध्ये मिसळून देऊ नये. ■ जनावरांच्या अंगावर गोचीड दिसल्यास ते ओढून काढून रॉकेलमध्ये टाकून नष्ट करावे. ■ जनावरांच्या तोंडाला मुसक्या बांधून, त्यांच्या अंगावर निंबाच्या पाल्याचा लेप लावावा. किमान तासभर तसाच ठेवावा आणि नंतर धुवून टाकावा.
3. आजार – पोटफुगी
कारण : ■ कोवळा चारा, खराब वैरण, सडलेले-कुजके धान्य, बुरशी आलेले धान्य जास्त प्रमाणात खाण्यात आल्यामुळे. ■ खराब पाणी पिणे किंवा चान्यामध्ये / खाण्यामध्ये अचानक बदल होणे.
लक्षणे : ■ जनावरांचे खाणेपिणे आणि रवंथक्रिया बंद होते. जनावर बेचैन आणि अस्वस्थ होते. ■ जनावराला श्वासोच्छवासाला त्रास होतो. ■ जनावराची डावी कूस फुगलेली दिसते. त्यावर हाताने वाजविल्यास ड्रमसारखा आवाज येतो. वेळेवर उपचार न झाल्यास जनावर दगावते.
उपाय : ■ ५९० मिलीलीटर गोड तेल, ३० मिलीलीटर टरपेंटाईन तेल आणि एक ग्रॅम हिंग यांचे मिश्रण करून जनावराला हळूहळू उसका लागू न देता पाजावे. ■ मोठ्या जनावराला ८० ग्रॅम आणि लहान जनावराला २० ग्रॅम या प्रमाणात टिम्पॉल पावडर पाण्यातून पाजावी.
4. आजार – अतिसार (हगवण)
कारण : ■ खाण्यापिण्यात अचानक बदल होणे. ■ दूषित अन्न-पाणी पोटात जाणे. ■ आतड्यात जंत होणे, आतड्यांना सूज येणे.
लक्षणे : ■ बऱ्याच काळ संडास होते आणि पाण्यासारखं पातळ शेण पडते. ■ काही वेळा शेणाला घाण वास येतो.
उपाय : ■ गाय- म्हैस यासारख्या मोठ्या जनावरास हगवण झाल्यास ३० ते ५० ग्रॅम नेवलॉन पावडरचा गोळा दिवसातून दोन-तीन वेळा भरवावा. ■ पावडर देताना त्यात दही, पाणी किंवा भाताची पेज मिसळून, त्याचा गोळा करून भरवावा. ५० ते १०० ग्रॅम खडूची भुकटी आणि १५ ते २० ग्रॅम कात, एकत्र पाण्यात मिसळून भरवावा. ■ साधीच्या रोगामुळे हगवण झाली असल्यास ती या औषधांमुळे थांबणार नाही. अशा वेळी जनावरांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
5. आजार – लाळ खुरकत
कारण : ■ लाळ खुरकत हा रोग तोंडखुरी, खुरकत या नावाने ओळखतात. ए.ओ.सी या विषाणूपासून हा रोग होतो.
लक्षणे : १०२ ते १०४ फॅरेनाईट पर्यंत ताप असतो. जनावराच्या तोंडातून लाळ गळणे, जिभेची साल गळणे इ. तसेच पायांना जखमा होतात. ■ जनावरे लंगडतात. जनावर अशक्त दिसते.
उपाय : ■ जनावरांना कोथिंबीर व लोणी एकत्र करून खाऊ घालावे. हळद व तुप एकत्र करून जिभेवर चोळावे. ■ पोटॅशिअम परमॅग्नेटच्या पाण्याने जीभ व पायांच्या जखमा स्वच्छ धुवाव्यात. ■ अशक्त जनावरांना कणकेची सोजी द्यावी. मऊ आहार द्यावा. ■ पायातील जखमांमध्ये बोरीक पावडर किंवा हिमॅक्स मलम लावावे. ■ जखमांमध्ये किडे झाल्यास टरपेन्टाईन किंवा निलगिरी तेल टाकून किडे बाहेर काढावेत. ■ पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने प्रतिजैवके उदा. पेनिसिलीन,स्ट्रेप्टोमायसिन,टेऱ्यामायसिन इ.तसेच वी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन द्यावे.
6. आजार – फांशी
कारण : हा रोग बॅसिलस अॅन्थॅसीस या जिवाणुमुळे होतो. हा रोग सस्तन प्राण्यांना होतो.
लक्षणे : ■ जनावराला ताप येणे, धरधरणे, पोटशूळ, पोटफुगी, तोंड, नाक, गुहद्वारांतून रक्तस्राव होणे इ. ■ या रोगामध्ये रक्त गोठत नाही व रक्ताचा रंग डांबरासारखा काळसर असतो.
उपाय : ■ आजारी जनावराचा गळा बांधून त्यास ३-४ दिवस पेनिसिलीन, स्ट्रेप्टोपेनिसिलिन किंवा टेरामायसीन, आक्सीस्टेकलीन, ओरिओमायसीन सारख्या औषधांची इंजेक्शन द्यावीत.
7. आजार – फऱ्या
कारण : हा रोग क्लोस्टिडियम शोव्हिया नावाच्या जिवाणूपासून होतो. पाणथडीच्या व दलदलीच्या रोगांचे जंतू राहतात. ■ कुरणात चरणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते.
लक्षणे : ■ रोगी जनावराला खुप ताप येतो. मांसल भागात विशेषत: फऱ्यावर, मानेवर किंवा पाठीवर सुज येते. ■ सुज दाबल्यावर करकर आवाज येतो. सुज आलेला भाग काळा दिसतो, जनावर काळवंडते शरीरक्रिया मंदावते व जावर दगावते.
उपाय : ■ जनावरास पेनिसिलीन, स्ट्रेप्टोपेनिसिलिन किंवा टेरामायसीन, आक्सीस्टेकलीन ओरिओमायसीन सारख्या औषधांची इंजेक्शन ३-४ दिवस रोग दुरुस्त होईपर्यंत द्यावी.
प्रतिबंधक उपाय : पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
8. आजार – घटसर्प
कारण : हा रोग पाश्च्युरेला मल्टोसिडा नावाच्या जिवाणू पासून होतो.
लक्षणे : ■ जनावराला खुप ताप येतो. घशास सुज येते. ■ जलद श्वासोच्छवास, डोळे लाल होणे, जीभ बाहेर येणे किंवा बाहेर पडणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
■ नाकातुन शेंबडासारखा खाव व तोंडातून लाळ वाहते. काही वेळेस रक्ताची हागवण येते. अंगावर सूज दिसून येते.
उपाय : ■ आजारी जावराला ताबडतोब पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने (Sulphamezathine33.5% solution) आणि अॅन्टिबायोटिक्स इंजेक्शन द्यावीत.
पशूपालकांनी प्रथमोपचारासाठी किमान औषधे ठेवावीत
१. जंतासाठी – फेज बेंडा साल, अल्बेडाझाल, पायझेन, बॅनमिंथ, प्रिपयझीन, पॅनाक्युअर.
२. स्वच्छता राखण्यासाठी – चुना, गॅमॅक्झीन.
३. ड्रेसिंगसाठी – कापूस बँडेज, चिकटपट्टी, हायड्रोजन पेरॉक्साईड, डेटॉल, साबण, पोटॅशियम परमँगनेट, टी बेझीन, टी आयोडीन, झिंक ऑक्साईड, बोरीक पावडर, अॅन्टीबायोटीक पावडर, लॉरेक्झेन मलम, सल्फा पावडर, निंबोळी, हिमॅक्स टॉपीक्युअर स्प्रे, एरंड तेल, सडात सोडण्याचे मलम, पेंडीस्ट्रीनट्युब, स्वेलनिल मलम, आयोडेक्स इत्यादी.
४. डायरियासाठी – सल्फा व ॲन्टीबायोटीक गोळ्या, केओलीन + खडू + काथ, नेबलॉन.
५. वार पाडण्यासाठी – रिल्पांटा पावडर.
६. भूक वाढविण्यासाठी – सोडाबायकार्ब, ग्लुकोज पावडर, हिमाल बत्तीसा पावडर, व्हिटॅमीन बी, कॉम्ल्पेक्स गोळ्या, रुमेटॉन, बायोबुस्ट.
७. पोटफुगीर – टरपेंटाईन + गोडेतेल, रिंपोल पावडर
८. वेदनाशामक (पेन किलर ) – एव्हील नोव्हालजीन, व्हेटालजीन
९. खोकल्यावर – कॅफलॉन पावडर
१०. किमान उपकरणे – थर्मामीटर, चिमटा, धारदार चाकू, औषधे पाजण्यासाठी बाटली, खूर कापण्याचा चाकू, कैची.
११. परोपजीवी जंतुनाशके – क्युटॅक्स, मॅलॅथऑन, फेनॉल.
काही महत्त्वाचे मुद्दे
- आपण गाय/म्हैस यापैकी एका जनावराची निवड करावी.
- दूध संकलन संस्थेला भेट देऊन दूधाचे फॅट व लॅक्टोमीटर गुणवत्ता तपासून दर कसे आहेत व पगार किती दिवसांनी मिळतो, इतर सोयी, खाद्य पुरवठा, बी-बियाणे, औषधे यांची सविस्तर माहिती घ्यावी.
- जनावर खरेदी करण्यासाठी शेतकरी आठवडे बाजार, सरकारी फार्म यांच्याशी संपर्क ठेवून सध्याची अंदाजे किंमत ठरवा, गोठा पाहून घ्यावा.
- गटामार्फत कर्ज उपलब्ध करावयासाठी बँक अहवाल तयार करा किंवा स्वतः भांडवल तयार करा.
- जनावराचा विमा उतरविण्यासाठी जवळचा विमा एजंट व पशुवैद्यक यांची भेट घ्या, कृषी अधिकाऱ्यांशी भेटा.
- गाय/म्हैस खरेदी करताना शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताचे असावे. नातेवाईक किंवा चांगली खात्री देणाऱ्या व्यक्तींकडून खरेदी करावी. दलाल किंवा व्यापारी यांच्यावर विश्वास ठेऊ नका. खात्री झाल्यावर जनावर खरेदी करा.
- खरेदीची पावती बनवा व ठराविक रक्कम देऊन बाकीची १५ ते ३० दिवसाच्या अंतराने देण्याचे कबूल करा.
- जनावरांचा विमा उतरवा व पशुवैद्यकाला दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा.
- गाय / म्हैस गाभण, व्यायला झाले, दूध देते या प्रकारानुसार हिरव्या चाऱ्याचे नियोजन करावे.
- नवीन जागेत आल्यामुळे जनावर घाबरत असेल तर त्याला आपल्या सवयी लावण्यासाठी त्याच्याजवळ जावे, तोंडावर, पाठीवर हात फिरवा.
- दुधाळ जनावरासाठी स्वच्छ पाणी, हिरवा व वाळलेला चारा व्यवस्थित प्रमाणात द्यावा. पशुखाद्यामध्ये एकदम बदल करू नका. मिनरल मिश्चरचा खाद्यात वापर करावा.
- गोठ्यात स्वच्छता ठेवा, धार काढताना स्वच्छ दूध निर्मिती मंत्राचा अवलंब करा.
- स्थानिक पशुवैद्यकाशी संपर्कात राहून त्यांचे वेळोवेळी सल्ला घ्या. काही माहिती विचारा, त्यांच्या सल्ल्यानुसार जनावराचे व्यवस्थापन करा.
- जनावरांबरोबर किंवा व्याल्यानंतर पारडी / कालवड असेल तर तिचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करा कारण ती भविष्याची लक्ष्मी आहे.
- जनावरासाठी चार वेळा पाणी पाजणे व एक वेळा धुणे फायदेशीर ठरते.
- गोठा नेहमी कोरडा स्वच्छ निर्जंतुक राहील याकडे लक्ष द्या, स्वच्छतेसाठी फिनाईल वापरा.
- गाय/म्हैस आजारी वाटल्यास टाळाटाळ करू नका लगेच पशुवैद्यकाला बोलावून उपचार करा.
- माजावर आलेले जनावर माजाचा काळ ओळखून पशुवैद्यकाकडून कृत्रिम रेतन भरून घ्यावे.
- कृत्रिम रेतन केल्यावर १८ ते २१ दिवसात जनावर पुन्हा माजावर आले नाही तर, ३ महिन्यांनी पशुवैद्यकाकडून तपासून गाभण असल्याची खात्री करावी.
- या व्यवसायात तंत्रज्ञान महत्वाचे असून उत्तम व्यवस्थापन ही आर्थिक यशाची गुरूकिल्ली आहे.
हायड्रोपोनिक्स तंत्राने करा चारा उत्पादन
कमी दिवसांत चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे हिरवा चारा उत्पादनासाठी पर्याय म्हणून पुढे येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर चारानिर्मिती करता येते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही चारानिर्मिती या तंत्रज्ञानाचा वापर करावा.
जनावरांच्या आहारातील चाऱ्याचा भाग 70 टक्के तर उरलेला 30 टक्के भाग हा पशुखाद्याचा असतो. चाऱ्यामध्ये प्रामुख्याने हिरवाचारा, वाळलेली वैरण, गवत, झाडपाला इ. चा समावेश होतो. हिरवा चारा हा जनावरांच्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हिरव्या चाऱ्याच्या अनुपलब्धतेमुळे जनावरांची वाढ, उत्पादन आणि पुनरुत्पादनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे शाश्वत पशुउत्पादनासाठी जनावरांना नियमित संतुलीत आहार पुरवणे गरजेचे आहे.
1) मातीशिवाय फक्त पाण्याचा किंवा पोषणतत्वयुक्त पाण्याचा वापर करून ट्रेमध्ये धान्याची उगवण व अंकुरणापासून तयार झालेल्या चाऱ्याचा हायड्रोपोनिक्स चारा असे म्हणतात. हा चारा 7-9 दिवसांत 20 ते 30 सें.मी. उंचीचा तयार होतो. त्यामध्ये शिल्लक राहिलेले बियाणे, मळ्या, खोड व पाने यांचा समावेश असतो. हा चारा अत्यंत पौष्टिक, उच्च पोषणतत्वे असणारा व पाचक असून, यामध्ये प्रथिने आणि पचनीय ऊर्जेचे प्रमाण जास्त असते.
2) हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन घेण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून शेड उभारणी करावी. त्यासाठी 90 टक्के शेटनेटचा वापर करावा. शेड उभारणीसाठी बांबू किंवा लाकडे किंवा लोखंडी पाइप किंवा जी. आय. पाइपचा वापर करावा. गोठ्यामध्ये रिकाम्या जागेतही हे करता येईल. ट्रे ठेवण्यासाठी रॅकची व्यवस्था करावी. जमिनीवर पाणी सांडून घाण होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेडमध्ये झाऱ्याने अथवा नॅपसॅक पंपाने अथवा स्वयंचलित पद्धतीने मायक्रो स्प्रिंकलर्सचा वापर करून पाणी देण्याची व्यवस्था करावी.
हायड्रोपोनिक्स मका चारा उत्पादन पद्धती
- या तंत्रज्ञानाने मका, गहू, बार्ली, ओट इ. तृणधान्याची वाढ करून चारानिर्मिती करता येते.
- चारा निर्माण करण्यासाठी मका बियाणे चांगले असावे. त्याची उगवण 80 टक्केपेक्षा कमी नसावी.
- 3 x 2 फूट आकाराच्या ट्रेसाठी दोन किलो मका लागतो.
- सुरवातीला मका स्वच्छ धुऊन घ्यावा.
- धुतलेला मका 12 ते 24 तास पाण्यात भिजत ठेवावा. त्यानंतर पाणी काढून टाकावे.
- बियाणास मोड येण्यासाठी गोणीत / पोत्यात 24 ते 30 तास ठेवावे.
- पोत्यामध्ये/ गोणीमध्ये 24 ते 30 तासांनंतर मक्याला मोड येतात. मोड आलेला मका ट्रेमध्ये समान पसरवून तो ट्रे रॅकच्या मांडणीवर ठेवावा.
- ट्रेवरील मक्यावर ठराविक अंतराने झाऱ्याने अथवा नॅकसॅक पंपाने अथवा स्वयंचलित पद्धतीने मायक्रोस्प्रिंकलर्सचा वापर करून पाणी द्यावे. पाणी देण्याचा वेळ व कालावधी वातावरणावर अवलंबून असेल. (साधारणतः सध्याच्या वातावरणानुसार 2 ते 3 तासांच्या फरकाने 1 ते 2 मिनिटे पाणी द्यावे. उष्ण वातावरणात 1 ते 2 तासांच्या फरकाने 1 ते 2 मिनिटे पाणी द्यावे.)
- वरील पद्धतीने 7 ते 9 दिवसांत 20 ते 30 सें. मी. उंचीचा हिरवा मका चारा तयार होईल.
- साधारणतः 20 x 20 फूट (400 चौ. फूट) जागेत 10 जनावरांसाठी चारा तयार करता येतो.
- एक किलो मका बियाणापासून 7 ते 8 दिवसांत 5 ते 6 किलो हिरवाचारा तयार होतो.
- एक किलो चारा उत्पादनासाठी साधारणपणे 2 ते 3 लिटर पाणी लागते. * हा चारा अतिशय लुसलुशीत, पौष्टिक, चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने
खातात. - हा चारा मोठ्या जनावरांना 10 ते 20 किलो प्रती जनावर याप्रमाणे खाद्य आणि सुक्या चाऱ्यासोबत दिला जावा.
- ट्रेमध्यँ बियाणे टाकल्यापासून 7 ते 9 व्या दिवशी चारा काढून जनावरांना द्यावा. चारा जास्त दिवस ट्रेमध्ये ठेवू नये.
- ट्रेमधील मका चाऱ्याची लादी (शिल्लक राहिलेले बियाणे, मुळ्या, खोड व पाने ) बाहेर काढून लहान तुकडे करू जनावरांना खाण्यास द्यावे.
- एक किलो चारा उत्पादनासाठी साधारणतः तीन रुपये खर्च येतो.
हायड्रोपोनिक्स चाऱ्यातील पोषणमूल्ये.
हा चारा अत्यंत लुसलुशीत, पौष्टिक व चवदार असून, त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, एन्झाईम आणि सूक्ष्म अन्नघटकांचे प्रमाण भरपूर असते.
या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असून, धान्य किंवा इतर चाऱ्यापेक्षा जास्त पचनीय (90 ते 95 टक्के) असतो. तसेच धान्यापेक्षा दीड पटीने जास्त प्रथिने वाढतात.
धान्याची उगवण होताना एन्झाईम सक्रिय होऊन धान्यातील पिष्ठमय पदार्थ, प्रथिने आणि स्निग्ध घटकांचे जनावरांना लवकर उपलब्ध होतील अश्या सोप्या स्थितीमध्ये रूपांतरीत करतात.
दुधाची गुणवत्ता व उत्पादकतेत सुधारणा करते.
हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी
- हायड्रोपोनिक्स शेडमध्ये दमट आणि ओलसर वातावरणामुळे बुरशी, जीवाणू वाढण्याची शक्यता असते, हे लक्षात घ्यावे.
- चांगल्या प्रतीच्या बियाणांचा वापर करावा. उगवण चांगली असावी.
- बियाणे चांगले धुऊन घेऊनच पाण्यात भिजत ठेवावे.
- ट्रेमधील चाऱ्याच्या मुळ्या चारा उचलून पाहू नये.
- प्रत्येक वेळी ट्रे चांगले धुऊन व वाळवूनच वापरावेत. ट्रे धुण्यासाठी कपडे धुण्याचा सोडा किंवा क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर करावा.
- संपूर्ण शेड नेहमी स्वच्छ ठेवावे. शेड व इतर साहित्य धुण्यासाठी क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर करू शकतो.
- शेडध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
- योग्य प्रमाणात बियाणांचा व पाण्याचा वापर करावा.
- तुटके/ फुटके बियाणे असेल तर निवडून बाजूला काढावे.
- शेवाळयुक्त किंवा घाण पाण्याचा वापर करू नये.
- ‘ट्रेमधून पाण्याचा चांगल्याप्रकारे निचरा होण्यासाठी रॅकमध्ये ट्रेची मांडणी करताना ट्रे ला एका बाजूला हलकासा उतार द्यावा.
- चारा ट्रेमध्ये जास्त दिवस ठेऊ नये.
हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन तंत्रज्ञानाचे फायदे
- कमीत कमी पाण्यात जास्त चारानिर्मिती शक्य होते. हायड्रोपोनिक्स पद्धतीने एक किलो चारा उत्पादनासाठी 2 ते 3 लिटर तर पारंपरिक पद्धतीने 60 ते 80 लिटर पाणी लागते. ट्रेमधून वाया जाणारे पाणी एकत्र करण्याची सोय करून इतर झाडांना वापरता येते. कमी पाणी लागत असल्याकारणाने दुष्काळी भागात हे तंत्रज्ञान वापरता येते.
- या चारा उत्पादनासाठी जागा फार कमी लागते. जमिनीची आवश्यकता नाही. 10 जनावरांसाठी लागणारा चारा 400 चौरस फूट जागेत तयार करता येतो.
- वातावरण कसेही असो, वर्षभर चारा उत्पादन शक्य होते.
- पारंपरिक चारा उत्पादनासाठी 45 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. परंतु, यात 7 ते 8 दिवसांत चारा तयार होतो.
- पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेने फार कमी मनुष्यबळ लागते (1-2 मजूर तास/ दिवस).
- दुष्काळी परिस्थितीत किंवा टंचाईकाळात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होते.
- तँयार चारा (उरलेले बियाणे, मुळ्या, खोड व पाने) जनावरे पूर्णपणे खातात. त्यामुळे चारा वाया जात नाही. पचनही चांगले होते.
- चारा वाढवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा व खतांचा वापर नसल्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक चारा तयार होतो.
- काढणीपश्चात आणि साठवणुकीत चाऱ्यातील होणारा पोषणमूल्यांचा ऱ्हास या चाऱ्यात होत नाही. कारण दररोज लागणारा चारा तयार केला जातो.